20. बंदी होणे अन् सुटका होणे

20. बंदी होणे अन् सुटका होणे — चित्र 1

इस्त्रायलचे राज्य अन् यहूदाचे राज्य ह्या दोघानीपण देवाच्या विरुध्द पाप केले. देवाने त्यायच्यासंग सिनायी पर्वतावर केलेला करार त्यायनं तोडला. त्यायनं पश्चाताप केला पायजे अन् देवाकडे फिरले पायजे म्हणून देवाने त्यायच्याकडे भविष्यवक्त्यायले पाठवले, पण त्यायनं आज्ञा मानण्यासाठी नाकार देला.

20. बंदी होणे अन् सुटका होणे — चित्र 2

म्हणून देवाने त्या दोन्ही देशाले शिक्षा देली, त्यायच्या शत्रूंले त्यायचा नाश करु देला. अश्शूर हया दुष्ट अन् शक्तिशाली देशाने इस्त्रायल देशाचा नाश केला. अश्शूरी लोकायनं इस्त्रायलच्या अनेक लोकायले जीवे मारले, मौल्यवान वस्तूंची लूटालूट केली अन् देशाचा बराच भाग जाळून टाकला.

20. बंदी होणे अन् सुटका होणे — चित्र 3

अश्शूरी लोकायनं सर्व नेत्यायले, श्रीमंत लोकायले अन् कुशल कारागिरायले एकत्र करुन आपल्या देशामध्ये नेले. फक्त खूप गरीब इस्त्रायल लोक जे युद्धामध्ये मारले गेले नाई, त्यायलेच इस्त्रायलमध्ये ठेवले.

20. बंदी होणे अन् सुटका होणे — चित्र 4

तवा अश्शूरने इस्त्रायली लोकं रायत असलेल्या ठिकाणी दुसऱ्या देशाच्या लोकायले वस्ती करण्यासाठी आणले. दुसऱ्या देशाच्या लोकायनं नाश झालेल्या शहरायची पुनर्बांधणी केली अन् इस्त्रायली बायायसंग लग्न केलं. इस्त्रायली वंशातल्या ज्या लोकायनं दुसऱ्या देशाच्या लोकायबरोबर लग्न केलं, त्यायले शोमरोनी म्हणण्यात आले.

20. बंदी होणे अन् सुटका होणे — चित्र 5

यहूदा देशातल्या लोकायनं पायलं की, इस्त्रायल राज्यातल्या लोकायनं अविश्वास केल्यामुळे अन् आज्ञा मोडल्यामुळे देवाने कशाप्रकारे त्यायले दंडीत केले हाय. पण तरीही त्यायनं कनानी देवीदेवतायची मूर्तिपूजा केली. देवाने चेतावणी देण्यासाठी त्यायच्याकडे भविष्यवक्त्यायले पाठवले, पण त्यायनं त्यायचे आयकले नाई.

20. बंदी होणे अन् सुटका होणे — चित्र 6

सुमारे 100 वर्षांनंतर जवा अश्शूराने इस्त्रायल देशाचा नाश केला, तवा देवाने यहूदाच्या देशावर हल्ला करण्यासाठी नबूकदनेस्सर हया बाबेलच्या राजाले पाठवले. बाबेल हा एक शक्तिशाली देश होता. यहूदाचा राजा हा नबूकदनेस्सर राजाचा सेवक बनण्यासाठी तयार झाला अन् दरवर्षी मोठया प्रमाणात पैसे देण्यासाठी पण तयार झाला.

20. बंदी होणे अन् सुटका होणे — चित्र 7

पण काई वर्षांनंतर यहूदाच्या राजाने बाबेल विरुध्द बंड पुकारले. म्हणून बाबेलच्या लोकायनं परत येऊन यहूदा देशावर चढाई केली. त्यायनं यरुशलेम शहर ताब्यात घेतले, मंदिराचा नाश केला अन् शहरातली अन् मंदिरातली सगळी संपती घेऊन गेले.

20. बंदी होणे अन् सुटका होणे — चित्र 8

यहूदाच्या राजाच्या हया बंडखोरपणाबद्दल दंड म्हणून, नबूकदनेस्सर राजाच्या सैनिकायनं यहूदा देशाच्या राजाच्या पोराचा त्याच्या समोर वध केला अन् यहूदा राज्यच्या राजाचे डोळे फोडून त्याले आंधळे केले. त्यानंतर त्यायनं त्याले मरण्यासाठी बाबेलच्या जेलात ठेवले.

20. बंदी होणे अन् सुटका होणे — चित्र 9

नबूकदनेस्सर अन् त्याच्या सैनिकायनं यहूदाच्या देशातल्या जवळ पास सर्वच लोकायले बाबेलमध्ये आणले. फक्त खूप गरीब इस्त्रायल लोकायलेच शेती करण्यासाठी मागे ठेवले. हयाच कालावधित जवा देवाच्या लोकायले प्रतिज्ञा केलेल्या देशाले सोडून जाण्यासाठी सक्ति करण्यात आली, त्याले बंधुआई असे म्हणतात.

20. बंदी होणे अन् सुटका होणे — चित्र 10

जरी देवाने आपल्या लोकायले त्यायच्या पापांमुळे त्यायले बंदी होऊ देऊन दंडीत केले, तरीही तो त्यायले अन् त्यायले देलेल्या वचनाले विसरला नाई. देवाची आपल्या लोकायवर कृपादृष्टी होती अन् भविष्यवक्त्यायच्या द्वारे तो त्यायच्या संग बोलत होता. त्याने त्यायले प्रतिज्ञा देली की, सत्तर वर्षांनंतर तो त्यायले परत प्रतिज्ञा केलेल्या देशात घेऊन येईन.

20. बंदी होणे अन् सुटका होणे — चित्र 11

त्यानंतर सुमारे सत्तर वर्षाने फारसचा राजा कोरेश हयाने बाबेलचा पराभव केला अन् बाबेलच्या राज्याच्या जागी फारसचे राज्य आले. इस्त्रायली लोकं आता यहूदी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले अन् त्यायच्यापैकी पुष्कळ लोकं आपल्या आयुष्यभर बाबेलमध्येच रायले. फक्त थोडयाशा वयोवृध्द यहूदी लोकायलेच यहूदी देशाची आठवण होती.

20. बंदी होणे अन् सुटका होणे — चित्र 12

फारसचे साम्राज्य शक्तिशाली होते, पण त्यायनं पराभूत केलेल्या लोकायच्या बाऱ्यात ते दयाळू होते. कोरेश फारसाचा राजा झाल्यानंतर लगेच त्याने आदेश काढला की, जर कोणत्या यहूदी लोकायले यहूदा देशामध्ये परत जायचे असीन तर त्याले तसे करण्याची परवानगी हाय. त्याने त्यायले मंदिराचे पुन्हा बांधकाम करण्यासाठी पैसा पण पुरवला. अशा प्रकारे सत्तर वर्षाचा बंधुआई संपवून यहूद्यांचा छोटा समूह यहूदा देशातल्या यरुशलेम शहरात परत आला.

20. बंदी होणे अन् सुटका होणे — चित्र 13

यरुशलेममध्ये आल्यानंतर त्यायनं मंदिराचे पुनर्वसन केले अन् शहराच्या सीमा परत बांधल्या. जरी आता परेंत फारसी लोकं त्यायच्यावर शासन करत होते, तरी आता परत एकदा ते प्रतिज्ञा केलेल्या देशामध्ये राहू लागले अन् मंदिरामध्ये देवाची उपासना करु लागले.

बायबल कथा: राजे 17; 24-25 ; 2 इतिहास 36; एज्रा 1 - 10; नहेम्या 1 : 13

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।