21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 1

सुरवाती पासूनच देवाने मसिहाले पाठवण्याची योजना बनवली होती. मसिहाच्या बाऱ्यात प्रतिज्ञा सर्वात पयले आदम अन् हव्वा यायच्याकडे आली होती. देवाने वचन दिले की हव्वाले जे संतान होईन ते सापाचे डोके फोडीन. ज्या सापाने हव्वाले फसवले, तो सैतान होता. हया प्रतिज्ञाचा अर्थ असा होते की, मसिहा सैतानाले पुर्णपणे पराजित करीन.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 2

देवाने अब्राहामाले अशी प्रतिज्ञा केली होती कि, त्याच्या द्वारे जगातले सगळे कुळ आशिर्वादीत होतीन. पुढे भविष्यात मसिहा आल्यानंतर हया प्रतिज्ञाची पुर्तता होणार होती. तो मसीहा जगातल्या हरेक जातीच्या लोकायले पापापासून सोडविण अन् त्यायचे तारण करीन.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 3

देवाने मोशे संग प्रतिज्ञा केली होती, की भविष्यामध्ये तो मोशेसारखाच एका भविष्यवक्ताले पाठवणार. हा भविष्यवक्ता मसीहा असणार. हे मसिहाच्या बाऱ्यात दुसरी प्रतिज्ञा होती. जे काई काळानंतर पूर्ण होणार होती.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 4

देवाने दाविद राजले प्रतिज्ञा देली होती की त्याच्याच वंशातला एक जण देवाच्या लोकायवर सर्वकाळ राज्य करीन. त्याचा अर्थ असा होता, की मसिहा हा दाविदाच्याच घराण्यात जन्माले येणार हाय.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 5

देव यिर्मया भविष्यवक्त्या संग बोलला अन् त्याले म्हतलं की तो एक नवा करार करणार हाय. पण तो सिनायी पर्वतावर इस्राएली लोकायबरोबर केलेल्या करारासारखा नसेल. जवा तो लोकायसंग आपला करार करणार, तवा तो स्वताले व्यक्तिगत पणे प्रगट करणार. हरेक जन त्याच्यवर प्रीती करणार अन् त्याचा नियमाचे पालन करण्याची इच्छा करणार. नव्या करारामध्ये देव आपल्या आज्ञा लोकायच्या हृदयावर लिवणार, लोकं देवाले वैयक्तीकपणे ओळखतीन, ते त्याचे लोकं होतीन अन् देव त्यायच्या अपराधांची क्षमा करीन. मसिहा ह्या नव्या कराराचा आरंभ करीन.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 6

देवाच्या भविष्यवक्त्यायनं हे पण सांगतले होते, की मसिहा हा एक भविष्यवक्त्या असणार. भविष्यवक्त्या हा एक असा माणूस असतो की जो देवाचा संदेश ऐकून तो लोकायले सांगतो. देवाने प्रतिज्ञा देलेला मसिहा हा एक परिपूर्ण भविष्यवक्त्या असीन. म्हणजे तो देवाच्या संदेश चांगल्या प्रकारे आयकणार अन् तो लोकायले त्या संदेशच्या बाऱ्यात चांगल्या प्रकारे शिकवणार.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 7

इस्राएली लोकायनं केलेल्या पापाचे प्रायश्चित म्हणून, याजक देवाले होमाबली चढवत असत. याजक लोकायसाठी देवाकडे प्रार्थना पण करत असत. पण मसिहा हा एक परिपूर्ण महायाजक असणार होता, जो देवाले स्वत:चे परिपूर्ण बलिदान करणार होता. म्हणजे तो कधी पाप नाई करणार अन् जवा तो स्वताले बली होण्यासाठी देणार, तवा जगातल्या लोकायले दुसऱ्या बलीची आवश्यक्ता नाई असणार.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 8

राजा म्हणजे जो लोकायवर राज्य करतो अन् त्यायचा न्याय करतो. आपला पूर्वज दाविद याच्या सिंहासनावर बसणारा मसिहा हा एक परिपूर्ण राजा असेल. तो संपूर्ण जगावर सर्वकाळ राज्य करीन, अन् प्रामाणिकपणे न्याय करीन अन् योग्य निर्णय घेईन.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 9

देवाच्या भविष्यवक्त्यायनं मसिहाच्या बाऱ्यात पुष्कळ साऱ्या गोष्टी पयलेच सांगून ठेवल्या होत्या. मलाखी भविष्यवक्त्याने भविष्य केले होते, की मसिहा येण्याच्या अगोदर एक महान भविष्यवक्ता येईन. यशया भविष्यवक्त्याने भविष्यवाणी केली की मसिहा हा एका कुमारीच्या पोटी जन्म घेईन. मीखा भविष्यवक्त्याने भविष्यवाणी केली होती, की मसिहा बेथलेहेम नगरामध्ये जन्माले येईन.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 10

यशया भविष्यवक्ता म्हणाला, की मसिहा गालिल प्रान्तामध्ये राईन, निराशामध्ये असलेल्या लोकायले सांत्वन देईन, अन् बंदिवानायले सोडवून स्वातंत्र्याची घोषणा करीन. त्याने हेही सांगतले, की मसिहा बिमार, आंधळया, मुक्या, बहि-या अन् लंगडया लोकायले बरे करीन.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 11

यशया भविष्यवक्त्यानं हे पण भविष्यवाणी केली होती, की मसिहाचा विनाकारण द्वेश केला जाईन अन् त्याले नाकारले जाईन. इतर भविष्यवक्त्यायनं पण पयलेच सांगून ठेवलं होते, की मसिहाले मारणारे लोकं, त्याचे कपडे वाटून घेण्यासाठी चिठ्टया टाकतीन अन् मसिहाचा एक मित्रच त्याचा विश्वासघात करिन. जख-या भविष्यवक्त्यानं पयलेच सांगून ठेवले होते की मसिहाचा विश्वासघात करण्यासाठी त्याच्या मित्राले वेतन म्हणून चांदीची तीस सिक्के देले जातीन.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 12

भविष्यवक्त्यायनं मसिहा कशा प्रकारे मरीन याची पण भविष्य केले होते. यशयाने भविष्य केले होते की लोकं मसिहावर थुकतीन, त्याची थट्टा करतीन अन् त्याले फटके मारतीन. जरी त्याने काई पण वाईट केले नव्हते, तरी त्याले खिळे ठोकून भयंकर वेदनेचे पीडादायक मरण देतीन.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 13

भविष्यवक्त्यायनं हे पण सांगतले की मसिहा परिपूर्ण अन् निष्पाप असीन. तो सर्व लोकायच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून मरेल. त्याले मिळालेली शिक्षा मुनष्य अन् देवामध्ये मेळ घडवून आणिन. हया कारणास्तव देवाची इच्छा होती कि मसीहा मरावा.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 14

भविष्यवक्त्यायनं भविष्य केले होते की मसिहा मरेल अन् देव त्याले परत जीवंत पण करील. मसिहाच्या मृत्यू अन् मृत्यूमधून परत जिवंत होण्याच्या द्वारे, देव आपली योजना पूर्ण करीन. पापी लोकायचे तारण करुन एक नवा करार प्रस्थापित करीन.

21. देव मसिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते — चित्र 15

देवाने भविष्यवक्त्यायले मसिहाच्या बाऱ्यात अनेक गोष्टी प्रकट केल्या, पण त्या भविष्यवक्त्यायपैकी कोणाच्याही काळामध्ये मसिहा आला नाही. शेवटच्या भविष्यवाणीनंतर सुमारे 400 वर्षांने एकदम योग्य वेळ आल्यानंतर देवाने मसिहाले ह्या जगामध्ये पाठवले.

बायबल कथा :उत्पत्ति 3:15; 12: 1 -3; अनुवाद 18:15; 2 शमूवेल 7; यिर्मया 31; यशया 59:16; दानिएल7; मलाखी 4 : 5; यशया 7:147; मीखा 5 : 2; यशया 9:1-7; 35 : 3-5; 61; 53; स्तोत्र 22 : 18; 35 : 19; 69 : 4; 41 : 9 जख-या 11 : 12 - 13; यशया 50 : 6; स्तोत्र 16 : 10-11

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।