22. योहानाचा जन्म

22. योहानाचा जन्म — चित्र 1

पूर्वीच्या काळत, देव आपल्या लोकायसंग देवदूतायद्वारे अन् भविष्यवक्त्यायद्वारे बोलला. पण नंतर 400 वर्षे तो लोकायसंग बोलला नाई. अचानक एक दिवस जख-या नावाच्या एका वयोवृध्द याजकाकडे एक देवदूत एक संदेश घेऊन आला. जख-या अन् त्याची बायको अलीशिबा, हे धार्मिक लोकं होते, पण त्यायले लेकरंबारं नव्हते.

22. योहानाचा जन्म — चित्र 2

देवदूतानं जख-याले म्हतलं, ‘‘तुह्या बायकोले पोरगा होणार हाय.’’ त्याचे नाव तुमी योहान असे ठेवा. तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, मसिहाले स्वीकार करण्यासाठी लोकायले तयार करीन!’’ जख-याने उत्तर दिले, ‘‘मी अन् माह्यी बायको आता खूप म्हातारे झालो आहोत अन् आता आम्हाले लेकरं होऊ शकत नाई! हे होईन हे कशावरुन मी समजू?’’

22. योहानाचा जन्म — चित्र 3

देवदूतानं जख-याले म्हतलं, ‘‘तुले हे सुवार्ता सांगण्यासाठी देवाने मले पाठविले हाय. तू माह्या वचनावर विश्वास ठेविला नाही, म्हणून बाळाचा जन्म होईपर्यंत तुले बोलता येणार नाई. तवाच, जख-या मुका झाला. तवा देवदूत जख-याले सोडून गेला. त्यानंतर जख-या घरी आला अन् त्याची बायको गर्भवती झाली.

22. योहानाचा जन्म — चित्र 4

जेव्हा अलीशिबा ही सहा महिन्यांची गरोदर होती, तवा तोच देवदूत अलिशिबाच्या नात्यातल्या मरीयेले अचानक प्रकट झाला. ती कुमारी होती अन् योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर तीचा साखरपुडा झाला होता. देवदूत म्हणाला, ‘‘तू गर्भवती होशीन, तूले एक पोरगा होईन. तू त्याचे नाव येशू ठेव. तो पराक्रमी देवाचा पोरगा असून सर्वकाळ राज्य करणार.’’

22. योहानाचा जन्म — चित्र 5

मरीयाने उत्तर देले, ‘‘हे कसे होणार, मी तर कुमारी हाय?’’ देवदूताने स्पष्ट केले, ‘‘पवित्र आत्मा तुह्यावर येणार, अन् देवाचे सामर्थ्य तुह्यावर छाया करणार. म्हणून ते बाळ पवित्र देवाचा पोरगा रायणार.’’ देवदूताने सांगितलेल्या गोष्टीवर मरीयेने विश्वास ठेवला.

22. योहानाचा जन्म — चित्र 6

देवदूताच्या भेटीनंतर लगेच मरीया अलीशिबाले भेटण्यासाठी गेली. मरीयेचे हे अभिवादन आयकताच अलीशिबाच्या पोटातल्या बाळाने आनंदाने उडी मारली. देवाने त्यायच्यासाठी जे काही केले होते त्याविषयी दोन्ही बायायनं एकत्र आनंद केला. अलीशिबाले भेटून तीन महिन्यानंतर मरीया आपल्या घरी परत गेली.

22. योहानाचा जन्म — चित्र 7

अलीशिबानं आपल्या पोराले जन्म देल्यानंतर, देवदूताने सांगितल्याप्रमाणे जख-या अन् अलीशिबानं त्याचे नाव योहान असे ठेवले. तवा देवाने जख-याले परत बोलण्याची अनुमति देली. जख-यानं म्हतलं, ‘‘देवाची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकायचे स्मरण ठेवले हाय! तु माह्या पोरा, तु देवाचा एक महान भविष्यवक्ता होशिन, जो आपल्या लोकायले त्यायच्या पापायची क्षमा कशी होईन हे सांगणार!’’

बायबल कथा :लूक 1

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।