23. येशूचा जन्म
मरीयेची सोयरिक योसेफ नावाच्या एका धार्मीक माणसाबरोबर झाली होती. मरीया गरोदर असल्याचे आयकून त्याले माईत झाले की, हे बाळ त्याचे नाई हाय. तो धार्मीक पुरुष असल्यामुळे मरीयेची बदनामी होऊ नये, म्हणून त्याने गुप्तपणे तिले सोडण्याची योजना केली. त्याने असे करण्याच्या पयले, एक देवदूत त्याच्या स्वप्नामध्ये आला अन् त्याच्यासंग बोलला.
देवदूताने म्हतलं, ‘‘योसेफ, मरीयेले तू आपली बायको म्हणून स्विकारण्यासाठी भेऊ नको. तिच्या पोटामध्ये असणारे बाळ हे पवित्र आत्म्यापासून हाय. ते एका पोराले जन्म देईन अन् त्याचे नाव येशू ठेव (अर्थात, ‘देव तारिण करतो’), कारण तो लोकायले त्यायच्या पापांपासून सोडवेल.’’
तवा योसेफनं मरीयेसंग लग्न केलं अन् आपली बायको म्हणून तिचा स्विकार केला, पण त्या बाळाचा जन्म होईपर्यंत तो तिच्यापाशी झोपला नाई.
जवा बाळाचा जन्म होण्याचा वेळ जवळ आला, तवा रोमी सरकारने सगळ्या इस्रायली लोकायले जनगणना करण्यासाठी आपापल्या गावी जाण्यासाठी सांगतले. योसेफ अन् मरीयाले नासरेथहून बेथलेहेम असा लांबचा प्रवास करावा लागला, कारण त्यायचा पूर्वज दाविद राजा हा बेथलेहेम गावाचा होता.
बेथलेहेम गावात पोहोचल्यावर, मरिया अन् योसेफले राहायले जागा मिळाली नाई. फक्त गाई-ढोरायच्या गोठयामध्ये जागा होती, ते त्यायले मिळाली. बाळाचा जन्म त्या गोठयामध्ये झाला अन् त्याच्या आईने त्याले गव्हाणीमध्ये ठेवलं. त्यायनं त्याचे नाव येशू ठेवले.
त्या रात्री, काही मेंढपाळ आपल्या मेंढराची जंगलामध्ये राखण करत होते. अचानक एक तेजस्वी देवदूत येऊन त्यायच्यासमोर प्रकट झाला, अन् ते खूप भेले. देवदूतानं त्यायले म्हतलं, ‘‘भिऊ नका, कारण मी तुम्हच्या साठी मोठ्या आनंदाची बातमी घेऊन आलो हाय. आज बेथलेहेम गावामध्ये तुमच्यासाठी मसिहा, अर्थात प्रभूचा जन्म झाला हाय!’’
‘‘जा अन् बाळाचा शोध घ्या, अन् तो तुम्हाले कपड्याने गुंडाळलेला, अन् गव्हाणीमध्ये ठेवलेला दिसेल.’’ अचानक, अभायामध्ये देवदूत देवाची स्तूती करत म्हणाले, ‘‘वर स्वर्गात देवाचा गौरव अन् पृथ्वीवर ज्या मनुष्यांवर त्याची कृपा झाली हाय त्यायले शांती!’’
मेंढपाळ लगेच येशूच्या जन्माच्या ठिकाणी पोहोचले अन् देवदूताने सांगितल्याप्रमाणे त्यायले ते बाळ गव्हाणीमध्ये ठेवलेले दिसले. हे पाऊन त्यायले खूप आनंद झाला. मरीयेले पण खूप आनंद झाला. आपण जे पाहिले अन् आयकले ह्या बाऱ्यात आनंद करत मेंढपाळ आपल्या मेंढरायकडे परत गले.
पूर्व दिशेले एक विशेष तारा ज्ञानी लोकायनं पायला. त्यायले समजले की, यहूदी लोकायचा एक नवा राजा जन्माले आला हाय. म्हणून त्याचे दर्शन घेण्यासाठी त्यायनं खूप मोठा प्रवास केला. ते बेथलेहेम गावात आले अन् जती येशू अन् त्याचे माय-बाप रायत होते ते घर शोधले.
जवा त्या ज्ञानी लोकायनं येशू बाळाले त्याची आई मरीया हिच्या बरोबर पायले, तवा त्यायनं त्याले नमन केले अन् त्याची उपासना केली. त्यायनं येशूबाळाले मौल्यवान भेटवस्तू देल्या. मंग ते आपल्या घरी परत गेले.
बायबल कथा:मत्तय 1; लूक 2
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।