24. योहान येशूले बाप्तिस्मा देते
योहान, जख-या अन् अलीशिबा यायचा पोरगा, मोठा होऊन एक भविष्यवक्ता बनला. तो जंगलामध्ये राहत असायचा, शहद अन् गावतातले हिरवे घोडे खात असायचा अन् त्याचे कपडे ऊंटाच्या केसापासून बनविलेले होते.
योहानाचे भाषण आयकण्यासाठी अनेक लोकं जंगलामध्ये जाऊ लागले. त्याने त्यायले प्रचार केला, ‘‘पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले हाय!’’
योहानाचा संदेश आयकून अनेक लोकायनं पश्चाताप केला अन् योहानाने त्यायले बाप्तिस्मा देला. अनेक धार्मिक पुढारी पण बाप्तिस्मा घेण्यासाठी आले, पण त्यायनं आपल्या पापांविषयी पश्चात्ताप केला नाई अन् आपले पाप कबूल केले नाई.
योहानानं त्या धार्मिक पुढा-यायले म्हतलं, ‘‘तुम्ही सापाच्या पिल्लांनो! पश्चात्ताप करा आणि तुमची वागणूक बदला. प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही, ते तोडले जाईन अन् आगीमध्ये टाकण्यात येईन. योहानाने भविष्यवक्त्यायच्या या वचनाची पूर्तता केली, ‘‘पाय, मी आपला दूत तुह्या सामोर पाठवत हाय, तो तुह्यासाठी मार्ग तयार करणार.’’
काही यहूदी लोकायनं योहानाले विचारलं, काय तु मसिहा हाय? योहानने म्हतलं, ‘‘मी मसिहा नाही हाय, पण माह्या मागून एकजण येत हाय. तो एवढा महान हाय की, त्याच्या जुत्याच्या बंद सोडण्याची पण माह्यी लायकी नाई.’’
दूस-या दिवशी येशू योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आला. योहानाने त्याले पाऊन म्हतलं, ‘‘पाहा! देवाचा कोकरु जो जगातल्या लोकायच्या पापायले उचलून घेऊन जाईन.’’
योहानने येशूले म्हतलं, ‘‘मी तुले बाप्तिस्मा देण्याच्या योग्य नाई. उलट मले तुह्या कडून बाप्तिस्मा घेण्याची आवश्यकता आहे. पण येशूने त्याले म्हतलं, ‘‘तु मले बाप्तिस्मा दे, कारण देवाच्या नजरीने हे करणे योग्य हाय.’’ तवा योहानाने त्याले बाप्तिस्मा देला, जरी येशूने काहीच पाप केले नव्हते.
जवा येशू बाप्तिस्मा घेतल्यानंतर पाण्यातून वर आला, तवा देवाचा आत्मा कबूतराच्या रुपामध्ये येऊन त्याच्यावर थांबला. त्याचवक्ती आकाशवाणी झाली, ‘‘तू माह्या परमप्रिय पुत्र हाय, तूह्या बाऱ्यात मी खूप संतुष्ट हाय.’’
देवाने योहानले सांगतलं होते कि, ‘‘तू बाप्तिस्मा दिलेल्या ज्या माणसावर पवित्र आत्मा उतरुन येईन, तोच माणूस देवाचा पुत्र असेल.’’ एकच देव हाय. पण जवा योहानने येशूले बाप्तिस्मा देला, तवा त्याने देवबापाले बोलत असताना पायलं, देवाचा पोरगा येशूले पायलं, अन् पवित्र आत्माले पायलं.
बायबल कथा:मत्तय 3; मार्क 1:9 - 11; लूक 3: 1 - 23
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।