25. सैतान येशूची परीक्षा करतो.
येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर, लवकरच पवित्र आत्मा येशूले जंगलात घेऊन गेला, तती येशू चाळीस दिवस अन् चाळीस रात्र होता. त्यावाक्ती त्याने तती उपास केला, अन् सैतानाने येशूच्या पासी येऊन पाप करण्यासाठी त्याची परीक्षा केली.
पयले सैतानाने येशूले म्हतलं, “जर तू देवाचा पोरगा हायस, तर या गोट्याले भाकर बनव कि तू खाऊ शकावे.”
तवा येशूने सैतानाले उत्तर देले, ‘‘देवाच्या वचनामध्ये असे लिवले हाय, जिवंत रायण्यासाठी माणसाले फक्त भाकरीची आवश्यक्ता नाई हाय, पण त्यायले देवाच्या वचनाची आवश्यक्ता हाय जे देव बोलतो.’’
मंग सैतानाने येशूले सगळ्यात उंची मंदिराच्या शिरोभागी उभे केले, अन् सैतानाने येशुले म्हतलं, ‘‘जर तू देवाचा पोरगा हायस, तर अतुन खाली उडी मार, कावून कि असं लिवले हाय, की ‘देव तुले उचलण्यासाठी आपल्या देवदूतायले आज्ञा देईन, कि तुह्या पायाले गोट्याने ठेस लागू नये.’’
पण येशूने ते नाई केले जे सैतानाने त्याले करायला लावले होते, याच्या व्यतिरिक्त त्याने म्हतलं, ‘‘देव वचनातून आपल्या लोकायले आज्ञा देतो, ‘तू आपला प्रभू देवाची परीक्षा नको करू.’’
मंग सैतानाने येशूले जगातले सगळे राज्य दाखवले, त्याने हे दाखवले कि ते किती शक्तीशाली हाय, अन् ते किती संपन्न हाय, त्याने येशूले म्हतलं, मी तुले हे सगळं देईन, जर तू घुटने टेकून माह्याली उपासना करणार.’’
तवा येशूने म्हतलं, “अरे सैताना माह्या पासून चालला जा! देवाचं वचन लोकायले आदेश देते, कि फक्त आपल्या प्रभू देवाची आराधना कर, देवाच्या रुपात फक्त त्याच्याचं आदर कर.”
येशूने सैतानाच्या परीक्षेपासून हार मानली नाई, म्हणून सैतान त्याच्यापासून चालला गेला, तवा देवदूतायनं येऊन येशूची सेवा केली.
बायबल कथा:मत्तय 4:1 - 11; मार्क 1 : 12 -13 1; लूक 4 : 1-13
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।