26. येशू आपली सेवा सुरु करतो

26. येशू आपली सेवा सुरु करतो — चित्र 1

सैतानाच्या परीक्षेवर विजय मिळवल्यावर येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण होऊन, त्याच्या रायत असलेल्या गालील या ठिकाणी वापस आला. येशू प्रभू देवाच्या वचनाचे शिकवन देत खूप साऱ्या ठिकाणी जात होता. हरेक जण त्याच्याबद्दल चांगलेच बोलत असत.

26. येशू आपली सेवा सुरु करतो — चित्र 2

येशू नासरत नगरात आला, हे ते गाव हाय जती तो लहानपणी रायत होता. शब्बाथ दिवशी, तो आराधना करण्यासाठी त्या ठिकाणी गेला, पुढाऱ्यायनं त्याले यशयाह भविष्यवक्त्याचे पुस्तक वाचण्यासाठी देले, तवा येशूने पुस्तकातून एक भाग खालून लोकायच्या समोर वाचला.

26. येशू आपली सेवा सुरु करतो — चित्र 3

येशूने हे वाचले, “देवाने मले आपला आत्मा देला हाय, कि गरीब लोकायच्यासाठी सुवार्था सांगू शकू, त्याने मले यासाठी पाठवले हाय, बंदीवान लोकायले स्वतंत्र करू अन् फुटक्यायले परत दृष्टी देऊ, अन् त्यायले सोडवून देऊ ज्यायले दुसरे लोकं तुडवत हायत. हा तो वेळ हाय, जवा देव आपल्यावर कृपा करणार अन् आपली मदत करणार.”

26. येशू आपली सेवा सुरु करतो — चित्र 4

मंग येशू खाली बसला, हरेकाने त्याले निरखून पायले, त्यायले मालूम होतं कि जो पवित्रशास्त्रातून भाग त्याने वाचला तो ख्रिस्ताच्या बाऱ्यात होता. येशूनं म्हतलं, “ज्या गोष्टी मी आता तुमच्यासाठी वाचल्या हायत, त्या यावाक्ती पूर्ण होतं हायत.” तवा सगळे लोकं आश्चर्य करू लागले, अन् म्हणू लागले, काय हा योसेफाचा पोरगा हाय ना?

26. येशू आपली सेवा सुरु करतो — चित्र 5

तवा येशूनं म्हतलं, “हे खर हाय कि लोकं कोण्या अशा भविष्यव्क्त्यायले स्वीकार नाई करतीन, जो त्यायच्या नगरात वाढला अन् रायला हाय. एलिय्याह भविष्यवक्त्याच्या वक्ती, इस्राएल देशात खूप साऱ्या विधवा बाया होत्या, पण जवा साडे तीन वर्ष पाणी नाई पडले, तवा देवाने एलिय्याह भविष्यवक्त्याले इस्राएल देशात कोण्याहि विधवा बायायची मदत करण्यासाठी नाई पाठवले होते, याच्या व्यतिरिक्त देवाने एलिय्याह भविष्यवक्त्याले कोण्या दुसऱ्या देशात विधवा बायी पासी पाठवले.”

26. येशू आपली सेवा सुरु करतो — चित्र 6

येशू पुढे बोलतचं रायला, “अन् एलिशा भविष्यवक्त्याच्या काळात इस्राएल देशात खूप सारे लोकं कुष्ठरोगी होते, पण एलिशा भविष्यवक्त्याने त्यायच्या पैकी कोणाले पण बरे नाई केले, त्याने फक्त इस्राएल देशाचा शत्रू सेनापती नामानाले बरे केले.” पण जे लोकं येशूचं आयकत होते, ते सगळे यहुदी होते, म्हणून जवा त्यायनं त्याले हे म्हणत असतांना आयकले तवा ते त्याच्यावर खूप रागावले.

26. येशू आपली सेवा सुरु करतो — चित्र 7

नासरत नगराच्या लोकायन येशूले पकडले, अन् त्याले सभास्थानातून घासत बायर घेऊन गेले, ते त्याले मारून टाकण्यासाठी अन् खाली फेकण्यासाठी एका पहाडाच्या टोकावर घेऊन गेले, पण येशू गर्दीतून निघून, नासरत नगरातून बायर चालला गेला.

26. येशू आपली सेवा सुरु करतो — चित्र 8

मंग येशू गालील प्रांताच्या भागात गेला, अन् खूप मोठी गर्दी त्याच्या पासी आली. ते अशा साऱ्या लोकायले घेऊन आले जे बिमार, अन् अपंग, फुटके, पांगळे, बयरे, अन् मुके होते. तवा येशूने त्यायले बरे केले.

26. येशू आपली सेवा सुरु करतो — चित्र 9

याच्या व्यतिरिक्त असे काई लोकं येशूच्या पासी आले होते जे भुत लागलेले होते, येशूने त्या भुतायले त्यायच्या मधून निघण्याचा आदेश देला. ते भुत कल्ला करत होते, “कि तू देवाचा पोरगा हायस.” गर्दीतले लोकं चकित झाले, अन् त्यायनं देवाची स्तुती केली.

26. येशू आपली सेवा सुरु करतो — चित्र 10

मंग येशूने बारा शिष्यायले निवडले, ज्यायले त्याने प्रेषित म्हतले. त्या प्रेषितायनं त्याच्या सोबत प्रवास केला, अन् त्याने जे शिकवले ते शिकत रायले.

बायबल कथा:मत्तय 4 : 12 - 25; मार्क 1 : 14 - 15; 35 - 39; 3 : 13-21; लूक 4 : 14 - 30; 38 - 44

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।