27. दयाळू सामरी माणसाची गोष्ट

27. दयाळू सामरी माणसाची गोष्ट — चित्र 1

‌‌‌एक दिवस, यहूदी नियमशास्त्राचा एक पंडीत माणूस येशूच्या पासी आला, अन् तो लोकायले हे दाखवायले आला, कि येशू चुकीची शिकवण देऊ रायला हाय. म्हणून त्याने म्हतलं, “हे गुरुजी अनंत काळाचे जीवन मिळण्यासाठी मी काय करू?” तवा येशूने उत्तर देले, “देवाच्या नियमशास्त्रामध्ये काय लिवले हाय?”

27. दयाळू सामरी माणसाची गोष्ट — चित्र 2

त्या माणसाने म्हतलं, “त्या मध्ये असं लिवलं हाय, कि आपल्या देवावर आपल्या संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने अन् संपूर्ण शक्तीने अन् संपूर्ण बुद्धीने प्रेम कर, अन् आपल्या शेजाऱ्यावर आपल्या सारखे प्रेम कर.” तवा येशूने उत्तर देले, “तू एकदम बरोबर हायस, जर तू असं करणार तर तुले अनंत जीवन मिळणार.”

27. दयाळू सामरी माणसाची गोष्ट — चित्र 3

पण तो नियमशास्त्राचा पंडित स्वताले लोकायच्या समोर असं दाखवत होता कि मी धर्मी हावो. म्हणून त्याने येशूले विचारलं, “ठिक हाय, तर माह्या शेजारी कोण हाय?”

27. दयाळू सामरी माणसाची गोष्ट — चित्र 4

तवा येशूने त्या नियमशास्त्राच्या पंडिताले एक गोष्ट सांगून त्याले उत्तर देले,‌ “एक यहुदी माणूस होता, जो एका रस्त्याने यरुशलेम मधून यरीहो नगराले जात होता.”

27. दयाळू सामरी माणसाची गोष्ट — चित्र 5

“पण तवा काई डाकु लोकायनं त्याले पायलं, अन् त्याच्यावर हमला केला, त्यायनं त्याचं सगळं काई घेऊन घेतलं, अन् त्याले मरेपर्यंत मारलं, अन् मंग चालले गेले.”

27. दयाळू सामरी माणसाची गोष्ट — चित्र 6

“त्यानंतर लगेच, एक यहुदी याजक त्याचं रस्त्याने चालत आला. तवा ‌‌‌त्या याजकाने त्या माणसाले रस्त्यावर पडलेले पायले. जवा त्याने पायले तवा तो रस्त्याच्या दुसऱ्याबाजूने समोर गेला, अन् त्याने त्या माणसाले न पायल्या सारखे केले.”

27. दयाळू सामरी माणसाची गोष्ट — चित्र 7

“त्यानंतर थोड्या वेळातच, एक लैवी माणूस त्याचं रस्त्याने आला, ‌‌‌(लैवी हे यहुदी लोकायचे एक गोत्र होते, जे देवळात याजकायची सेवाकार्यास मदत करत असत.)‌‌‌ तो लैवी माणूस पण त्या माणसाच्या इकडे न पायल्या सारखे करून समोर निघून गेला.”

27. दयाळू सामरी माणसाची गोष्ट — चित्र 8

“अन् मंग तिसरा माणूस आला जो सामरी नगराचा होता‌‌‌.(सामरी लोकं अन् यहुदी एकामेकायचा खूप राग करत होते.) त्या सामरी माणसाने रस्त्यांच्या बाजूने त्या माणसाले पायलं, त्यानं पायलं तर तो यहुदी माणूस निघाला, तरीपण त्याने त्याच्यावर दया करून त्याची कायजी केली, अन् त्याच्या जखमायवर पट्ट्या बांधल्या.”

27. दयाळू सामरी माणसाची गोष्ट — चित्र 9

“मंग त्या सामरी माणसाने त्या माणसाले उचलून आपल्या गध्यावर बसवले, अन् त्यानं त्याले रस्त्यावर असलेल्या एका उतार शाळेमध्ये आणले अन् त्याचीवाली देखरेख केली.”

27. दयाळू सामरी माणसाची गोष्ट — चित्र 10

“दुस-या दिवशी, त्या सामरी माणसाले समोर प्रवास करायचा होता, ‌म्हणून त्याने उतारशाळेच्या व्यवस्थापकास काई पैसे देऊन म्हतलं, “या माणसाची कायजी घेजोक, अन् जर यापेक्षा काई अधिक पैसे तुह्याले खर्च झाले, तर मी तो खर्च वापस आल्यावर तुले देऊन देईन.”

27. दयाळू सामरी माणसाची गोष्ट — चित्र 11

मंग येशूने त्या नियमशास्त्राच्या पंडिताले विचारले, “तू काय विचार करतो? कि त्या तीन लोकायच्या पैकी कोण त्या माणसाचा शेजारी हाय, ज्याले लुटले अन् मरेपर्यंत मारले होते?” तवा त्यानं उत्तर देलं, “तोचं माणूस ज्याने त्याच्यावर दया केली होती, तवा येशूनं म्हतलं, “तू पण जाऊन तसचं कर.”

‌‌‌बायबल कथा :‌‌‌लूक 10 : 25 - 37

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।