28. एक धनवान जवान अधिकारी

28. एक धनवान जवान अधिकारी — चित्र 1

एक दिवस एक धनवान जवान अधिकारी, येशूच्या पासी येऊन विचारु लागला, “हे उत्तम गुरुजी, अनंत जीवन मिळण्यासाठी मले काय करावे लागणार?” तवा येशूने त्याले म्हतलं, “तू मले ‘उत्तम’ कावून म्हणतो? एकचं उत्तम हाय, तो फक्त देव हाय, पण तुले अनंत जीवन मिळवायचे हाय, तर तू देवाच्या नियमशास्त्राचे पालन कर.”

28. एक धनवान जवान अधिकारी — चित्र 2

“मले कोणत्या कोणत्या आज्ञेचे पालन करायची आवश्यकता हाय?” त्यानं विचारलं. तवा येशूने उत्तर देलं, “खून करू नको, ‌‌‌व्यभिचार करू नको, ‌‌‌चोरी करू नको, ‌‌‌खोटे बोलू नको,‌‌‌ आपल्या माय बापाचा आदर कर अन् आपल्या शेजाऱ्यावर आपल्याचं सारखे प्रेम कर.”

28. एक धनवान जवान अधिकारी — चित्र 3

पण त्या जवान माणसाने म्हतलं, “मी लहानपणापासूनचं ह्या सगळ्या आज्ञा मानत आलो हाय. मले ‌‌‌सर्वकाळ जगण्यासाठी आणखी काय करण्याची गरज हाय?” तवा येशूने त्याच्याइकडे पायलं, अन् त्याच्यावर प्रेम केलं.

28. एक धनवान जवान अधिकारी — चित्र 4

येशूनं उत्तर देलं, “जर तुले सिद्ध होयाचं हाय, तर जाऊन आपलं सगळं काई इकून टाक, अन् ते धन गरिबामध्ये वाटून दे, अन् तुले स्वर्गात धन मिळेल. मंग येऊन माह्याल्या मांग चालू लाग.”

28. एक धनवान जवान अधिकारी — चित्र 5

जवा येशूनं म्हतलं, तवा त्या जवान माणसाने आयकले, अन् तो खूप निराश झाला, कावून कि तो खूप धनवान होता. अन् त्याले आपली संपत्ती देण्याची इच्छा नाई होती. म्हणून तो मांग फिरून येशूच्या पासून चालला गेला.

28. एक धनवान जवान अधिकारी — चित्र 6

तवा येशूने आपल्या शिष्यायले म्हतलं, “देवाच्या राज्यात धनवान लोकायले जाणे खूप कठीण हाय. हो, एका धनवान माणसाले देवाच्या राज्यात प्रवेश करण्याच्या तुलनेत कोण्या उंटाले सुईच्या शेद्रातून जाणे हे सोफे हाय.”

28. एक धनवान जवान अधिकारी — चित्र 7

जवा येशूनं म्हतलं, तवा शिष्यायनं आयकल, अन् ते चकित झाले. तवा त्यायनं म्हतलं, “जर हे असं हाय, तर देव कोणाले वाचवणार?”

28. एक धनवान जवान अधिकारी — चित्र 8

येशूने शिष्यायच्या इकडे पायलं अन् म्हतलं, “लोकायले स्वताचे तारण करणे अशक्य हाय. पण देवाच्या साठी सगळं काई शक्य हाय.’’

28. एक धनवान जवान अधिकारी — चित्र 9

पतरसनं येशूले म्हतलं, ”आमी शिष्य आपलं सगळं काई सोडून तुह्याल्या मांग आलो हाय, तर आमाले प्रतिफळ काय मिळणार?”

28. एक धनवान जवान अधिकारी — चित्र 10

तवा येशूने उत्तर देले, “हरेक जन ज्याने माह्यासाठी घरदार, भाऊ, बहीण, माय बाप, लेकरं, अन् संपत्तीले सोडले हाय, तो त्यापेक्षा हि 100 गुणा जास्त मिळवणार, अन् अनंत जीवनाले पण मिळवणार. पण बरेचसे जे पयले होते, ते शेवटचे होतीन, अन् खूप सारे जे शेवटचे हायत, ते पयले होतीन.”

‌‌‌बायबल कथा:‌‌‌मत्तय 19:16 - 30; मार्क 10: 17 - 31; लूक 18:18 - 30

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।