29. निर्दयी दासाची गोष्ट
एक दिवस पतरसनं येशूले विचारलं, “हे प्रभुजी, जवा माह्या भाऊ माह्याविरुद्ध अपराध करीन तवा मले त्याले किती वेळा क्षमा करायले पायजे? काय सात वेळा?” तवा येशूनं म्हतलं, “सात वेळाचं नाई पण साताच्या सत्तर वेळा” याच्याव्दारे येशूले असं म्हणायचं होतं, कि आपल्याले नेहमी क्षमा करायला पायजे. तवा येशूने हे गोष्ट सांगतली.
येशूनं म्हतलं, “देवाचं राज्य एका राजासारखे हाय, ज्याले आपल्या दासापासून हिशोब घ्यावा असे वाटते. त्याच्या एक दास 200,000 वर्षांच्या मजुरी इतके खूप मोठे कर्ज होते.
“पण तो दास आपल्या कर्जाले फेडू नाई शकला, म्हणू राजाने म्हतलं, “याचे कर्ज फेडण्यासाठी या माणसाले अन् याच्या कुटुंबांले गुलाम म्हणून इकून टाका.”
“त्या दासाने राजाच्या समोर आपले घुटने टेकून म्हणाला, “कृपया माह्यावर दया करा, अन् मले थोडा वेळ द्या, म्हणजे मी तुमचे सगळे कर्ज फेडीन” तवा राजाले त्या दासावर दया आली अन् त्याने त्याले त्याचे सगळे कर्ज माफ केले अन् त्याले जाऊ देले.”
“पण जवा तो दास राजाच्या पासून बायर चालला गेला, तवा त्याले त्याचा एक सोबतीचा दास भेटला, ज्याच्या इकडे त्याचे चार महिने मजुरी इतके कर्ज होते. त्या दासाने आपल्या सोबतीच्या दासाले पकडले, अन् म्हतलं, “जे तुह्यावर माह्याले कर्ज हाय ते मले वापस दे.”
“त्या सोबतीचा दासाने घुटने टेकून म्हतलं, “कृपया मले थोडा वेळ द्या व माह्यावर कृपा करा, म्हणजे मी तुह्याले सगळे कर्ज फेडीन” पण त्याऐवजी, त्याने आपल्या सोबतीच्या दासाले सगळे कर्जाची फेड होईपर्यंत जेलात टाकले.”
”जे काई झाले होते, ते सगळं काई दुसऱ्या दासायनं पायले होते, तवा ते खूप दुखी झाले, अन् ते राजाच्या पासी गेले, अन् सगळी घटना सांगून देली.”
राजाने त्या दासाले बलावून म्हतलं, अरे दुष्ट दासा! “मी तुह्या कर्जाले या साठी क्षमा केले होते, कावून कि तू माह्या पासी विनंती केली होती. तू पण आपल्या दासावर दया करायला पायजे होती, राजाले येवढा राग आला, तवा त्या दासाले जेलात टाकून देले, तोपर्यंत कि जोपर्यंत तो सगळे कर्ज फेडत नाई.”
तवा येशूनं म्हतलं, माह्या स्वर्गातला बाप तुमच्या पैकी हरेकाच्या सोबत असाच करणार, जोपर्यंत तुमी आपल्या भावाले ह्रदयाने क्षमा करणार नाई.”
बायबल कथा :मत्तय 18 : 21 - 35
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।