30. येशू पाच हजार लोकायले जेवण देते.
येशूने आपल्या प्रेषितायले प्रचार करण्यासाठी अन् लोकायले शिक्षा देण्यासाठी खूप साऱ्या अलग-अलग गावात पाठवले. जवा ते वापस आले जती येशू होता, तवा त्यायनं त्याले सांगतले कि त्यायनं काय केले होते. तवा येशूनं त्यायले समुद्राच्या दुसऱ्या बाजूने त्याच्या सोबत एका शांत ठिकाणी जाऊन काई वेळ पर्यंत आराम कऱ्याले बलावले. तवा ते एका डोंग्यात बसले अन् समुद्राच्या दुसऱ्या बाजूने गेले.
पण तती खूप सारे असे लोकं होते, ज्यायनं येशूले अन् शिष्यायले डोंग्यात जातांना पायले होते. तवा ते लोकं त्यायच्याहि पयले, समुद्राच्या दुसऱ्या बाजूने जाण्यासाठी समुद्राच्या काटाने धावत आले. जवा येशू अन् शिष्य पोहचले तवा लोकायचा एक मोठा समूह त्यायची वाट पायत पयले पासूनचं तती होता.
त्या जनसमुदायामध्ये बाया अन् लेकरायची संख्या सोडून, जवळपास 5000 पेक्षा अधिक माणसं होते. तवा येशूले त्यायच्यावर दया आली. येशूले ते लोकं मेंढपाळ नसलेल्या मेंढराच्या सारखे दिसून आले. म्हणून त्याने त्यायले शिकवण देली, अन् त्यायच्या मध्ये जे लोकं बिमार होते त्यायले बरं केलं.
दुपारी उशीराने, शिष्यायनं येशूकडे जाऊन म्हतलं, “आता खूप उशीर झाला हाय, अन् आजूबाजूले कोणतेहि गाव नाई हाय, म्हणून या लोकायले जाऊ दे म्हणजे ते खायाले काई तरी घेतीन.”
पण येशूने शिष्यायले म्हतलं, “तुमी त्यायले खायाले काई तरी द्या!” तवा त्यायनं उत्तर देले, “आमी असे कसे करू शकतो? आमच्या पासी फक्त पाच भाकरी अन् दोन लहान मासोया हायत.”
येशूने आपल्या शिष्यायले म्हतलं, कि लोकायच्या जनसमुहाले गवतावर पन्नास-पन्नासच्या पंगतीने बसायले सांगा.
मंग येशूने त्या पाच भाकरी अन् दोन मासोया घेऊन वर अभायाकडे पायले अन् त्या जेवणासाठी देवाले धन्यवाद केला.
मंग येशूने त्या भाकरी अन् मासोयाचे तुकडे केले. मंग त्याने आपल्या शिष्यायले ते तुकडे लोकायले देण्यासाठी देले. शिष्य लोकायले वाढतच रायले अन् ते जेवण कधी संपले नाई. सगळे लोकं खाऊन तृप्त झाले.
त्यानंतर, शिष्यायनं उरलेल्या भाकरी अन् मासोयाचे तुकडे जमा केले अन् ते बारा टोपल्या भरल्या. हे सगळं जेवण फक्त पाच भाकरी अन् दोन मासोया पासून पुरवले गेले.
बायबल कथा:मत्तय 14:13-21; मार्क 6:31-44; लूक 9: 10 - 17; योहान 6 : 5 - 15
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।