31. येशू पाण्यावर चालतो

31. येशू पाण्यावर चालतो — चित्र 1

पाच हजार लोकायले जेवण खाऊ घातल्यानंतर, येशूने आपल्या शिष्यायले डोंग्यात जायाले सांगतले. त्याने त्यायले समुद्राच्या दुसऱ्या बाजूने जाण्यासाठी सांगतले, पण येशू थोड्या वेळेपरेंत ततीचं थांबला. शिष्य निघून गेले, मंग येशूने लोकायच्या गर्दीले घरी जाण्यासाठी सांगतले, यानंतर येशू प्रार्थना करण्यासाठी एका पहाडावर चालले गेला. त्या ठिकाणी तो एकटा होता, अन् त्याने रात्री उशिरापर्यंत प्रार्थना केली.

31. येशू पाण्यावर चालतो — चित्र 2

त्यावाक्ती शिष्य आपल्या डोंग्याले चालवत होते, तवा हवा खूप जोराने सुरु होती. खूप रात्र झाली तरी ते समुद्राच्या मधातचं पोहचले होते.

31. येशू पाण्यावर चालतो — चित्र 3

तवा येशूने प्रार्थना समाप्त करून आपल्या शिष्यायच्या पासी वापस जायाले निघाला. तवा तो डोंग्याच्या पासी जायाले पाण्याच्या वर चालत होता.

31. येशू पाण्यावर चालतो — चित्र 4

तवा शिष्यायन येशूले पायलं, अन् ते खूप भेले कावून कि त्यायले वाटत होते कि तो भुत हाय, येशूले मालूम झालं कि ते भेले हाय, म्हणून त्यानं त्यायले आवाज देऊन म्हतलं, “भेऊ नका मीच हाय!”

31. येशू पाण्यावर चालतो — चित्र 5

तवा पतरसने येशूले म्हतलं, “हे प्रभू जर तूच हायसं, तर मले पण तुह्या पासी पाण्यावर येण्याची आज्ञा दे.” तवा येशूने पतरसले म्हतलं “ये!”

31. येशू पाण्यावर चालतो — चित्र 6

मंग पतरस डोंग्यातून उतरला, अन् येशूच्या पासी जायाले पाण्यावर चालू लागला. पण थोडा दूर जाऊन त्याने आपले डोये येशूच्या इकडून दुसरीकडे वडवले, अन् समुद्राच्या लाटाकडे अन् हवेच्या इकडे पाऊ लागला.

31. येशू पाण्यावर चालतो — चित्र 7

तवा पतरस भेला, अन् पाण्यात डुबू लागला, तवा तो ओरडला, “हे प्रभू मले वाचव!” येशूने त्याचं वाक्ती त्याचा हात पडकला. तवा त्याने पतरसले म्हतलं, “तुह्या विश्वास खूप कमी हाय, तू सुरक्षित हायस म्हणून तू माह्यावर भरोसा कावून नाई केला?”

31. येशू पाण्यावर चालतो — चित्र 8

मंग येशू अन् पतरस डोंग्यात चढले, अन् लगेच हवा बंद झाली, अन् पाणी शांत झाले. तवा शिष्यायनं चकित होऊन येशूच्या समोर घटने टेकून त्याले नमन केले अन् त्याले म्हतलं, “तू खरोखर देवाचा पोरगा हायस.”

बायबल कथा:‌‌‌मत्तय 14 : 22 - 33; मार्क 6 : 45 - 52; योहान 6 : 16 - 21

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।