32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते.

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 1

‌‌येशू अन् त्याचे शिष्य आपल्या डोंग्याने त्या भागात गेले, जती गरसेकर लोकं रायत होते, ते त्या भागात जाऊन डोंग्यातून उतरले.

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 2

तती एक माणूस होता, ज्याले भुत लागला होता.

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 3

हा माणूस येवढा शक्तिशाली होता की कोणीही त्याले नियंत्रित करू शकत नव्हते. कईक वेळा लोकायनं त्याच्या हातापायाले साखयदांडाने बांधले पण तो तोडून टाकत होता.

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 4

तो माणूस कबरींमध्ये रायत होता, अन् ‌‌‌तो रातदिवस मोठयाने कल्ला करत होता. तो आंगावर कपडे घालत नाई होता, अन् नेहमी गोट्याने स्वताले घायल करत होता.

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 5

तो माणूस पयत येशूच्या पासी आला, अन् त्याच्या समोर घुटने टेकवले. तवा येशूने त्या माणसातल्या भुताच्या सोबत गोष्ट केली, अन् म्हतलं, “या माणसामधून बायर निघून ये!”

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 6

त्या भुत लागलेल्या माणसाने मोठ्याने कल्ला केला, “हे येशू परमप्रधान देवाच्या पोरा, तुह्य माह्या संग काय काम? कृपा करून मले तरास देऊ नको!” तवा येशूने त्या भुताले म्हतलं, “तुह्य नाव काय हाय? त्यानं उत्तर देलं, माह्य नाव सैन्य हाय, कावून कि आमी खूप सारे हावोत.” (रोमी सैन्यामध्ये कईक हजार सैन्याचा एक खूप मोठा समूह असतो, त्याले सैन्य म्हणत होते.)

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 7

त्या भुताने येशूले विनंती केली, “कृपा करून आमाले या भागातून बायेर नको पाठवू!” अन् बाजूनेचं एका पहाडावर डुकरायचा एक कळप चरून रायला होता, म्हणून त्या भुतायनं येशूले विनंती केली,”कृपा करून आमाले या डुकरायमध्ये पाठव,” येशूने म्हतलं, “ठिक हाय, त्यायच्यात चालले जा.”

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 8

तवा ते भुत त्या माणसातून निघून त्या डुकरायमध्ये घुसले, अन् ते डुकरं पयत जाऊन एका समुद्राच्या टोकावर जाऊन कुदून डुबून मरून गेले. त्या कळपात सुमारे 2000 डुकरे होती.

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 9

हे पाऊन डुकरे राखणारे पयत नगरामध्ये गेले, अन् त्यायनं घडलेला सगळा प्रकार जो येशूने केला होता, तो त्यायनं हरेकाले सांगतला, ‌‌‌तवा नगरातल्या लोकायन येऊन त्या भुतग्रस्त माणसाले पायले, ‌‌‌तो शांत बसलेला, आंगावर कपडे घातलेला, व एक सर्वसामान्य वागणा-या माणसा सारखा पायले.

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 10

ते लोकं खूप भेले होते, अन् त्यायनं येशूले जाण्यासाठी सांगतले. येशू डोंग्यात चढला, तवा तो माणूस ज्याच्यात भुते होती तो येशूच्या सोबत जायाले विनंती करू लागला.

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 11

पण येशूने त्याले म्हणलं, “नाई, मले असं वाटले कि तू घरी जावे अन् सगळ्या लोकायले सांगावे, जे देवाने तुह्यासाठी केले, त्यायले सांग कि देवाने तुह्यावर कशी दया केली.”

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 12

म्हणून तो माणूस चालला गेला, अन् सगळ्यायले या घटनेच्या बाऱ्यात सांगू लागला, जे येशूने त्याच्यासाठी केले होते, अन् त्याची गोष्ट आयकनारे हरेक जन चकित झाले होते.

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 13

येशू समुद्राच्या दुसऱ्या बाजूस वापस आला. तो तती पोहचल्यावर एक मोठी गर्दी त्याच्या आजूबाजूने जमा झाली, त्यामुळे तो दबू लागला. त्या गर्दीमध्ये एक बाई होती, जे बारा वर्षापासून रक्तस्रावाचा बिमारीने ग्रसित होती. तिने आपले सगळे रुपये अन् धन वैद्याले देले होते, यासाठी कि ते पूर्ण पणे बरोबर चांगली व्हावी, पण तिची बिमारी आणखीनचं खराब झाली होती.

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 14

तिने आयकले होते कि येशूने अनेक बिमार लोकायले बरे केले हाय, अन् तिने विचार केला, “मी जर येशूच्या कपड्याले जरी हात लावला, तरी चांगली होऊन जाईन.” म्हणून तिने येशूच्या मांगून येऊन येशूच्या कपड्यायले हात लावला, जसा हात लावला तसचं तिचे रक्तवायने बंद झाले.

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 15

ताबडतोबचं येशूले मालूम झालं कि त्याच्या शरीरामधून सामर्थ्य निघाली हाय, ‌‌‌म्हणून त्याने मांग फिरून म्हतलं, “मले कोण हात लावला?” शिष्यायन उत्तर देलं, अति किती गर्दी हाय, चवभवंताल लोकायची गर्दी हाय, तुले धक्का लावत हाय, तरी म्हणतो मले कोणी हात लावला हाय?

32. येशू एका भुत लागलेल्या माणसाले अन् एका बिमार बाईले बरं करते. — चित्र 16

ते बाई येशूच्या पासी भेत-भेत समोर आली, अन् खूप भेली होती, अन् घुटण्यावर येऊन बसली. तवा तिने त्याले सांगतले तिने काय केले हाय? अन् हे पण कि सांगतले कि ते कशी पूर्ण पणे बरी झाली हाय. तवा येशूने म्हतलं, “तुह्या विश्वासाने तू बरी झाली हाय, शांतीने जा.”

बायबल कथा :‌‌‌मत्तय 8: 28 - 34; 9 : 20 - 22; मार्क 5 : 1 - 20; 5 : 24ब - 34; लूक 8 : 26 - 39; 8 : 42ब - 48

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।