33. ‌‌‌पेरणी करणा-याची गोष्ट

33. ‌‌‌पेरणी करणा-याची गोष्ट — चित्र 1

एक दिवस येशू समुद्र किनाऱ्याच्या जवड होता, तो लोकायच्या एका मोठ्या जनसमुदायाले शिकवण देऊ रायला होता. त्याले आयकण्यासाठी एवढे सारे लोकं आले होते, कि येशूच्या आजूबाजूने काईचं जागा नव्हती. म्हणून तो पाण्यात उभी असलेल्या डोंग्यात चढला, अन् तती बसून लोकायले शिकवण देऊ लागला.

33. ‌‌‌पेरणी करणा-याची गोष्ट — चित्र 2

येशूने त्यायले हे गोष्ट सांगतली, “एक शेतकरी बिया पेरणी करावयास निघाला, जवा तो हाताने पेरणी करत असतांना, काई बिया रस्त्यावर पडल्या, पण अभायातल्या पाखरायन येऊन सगळ्या बिया खाऊन टाकल्या.”

33. ‌‌‌पेरणी करणा-याची गोष्ट — चित्र 3

“काई बिया गोट्याच्या जमिनीवर पडल्या, जती खूप कमी माती होती, गोटाळ जमिनीवर पडलेल्या बिया खूप लवकर अंकुरित झाल्या, पण त्या बियाच्या मुया जमिनीच्या खोलवर जास्त जाऊ नाई शकल्या, अन् जवा सूर्य निघाला अन् गर्मी झाली तवा ते झाड पूर्णपणे जळून गेले.”

33. ‌‌‌पेरणी करणा-याची गोष्ट — चित्र 4

“आणखी काई बिया काटेरी झुडपात पडल्या, ‌‌‌ते बिया वाढू लागल्या पण काटयांनी त्याची वाढ खुंटविली. ‌‌‌म्हणून काटेरी झुडपांमध्ये पडलेल्या बियाची वाढ होऊ शकली नाई अन् त्याले फळ आले नाई.”

33. ‌‌‌पेरणी करणा-याची गोष्ट — चित्र 5

“काई बिया चांगल्या जमिनीत पडल्या, ‌‌ते बिया उगवल्या अन् वाढल्या अन् जेवढे बिया पेरल्या गेल्या होत्या त्या पैकी कोणते 30, 60, तर कुठे 100 पट फळ धान्य उत्पन्न झाले. ज्या कोणाले देवाचा मार्ग स्वीकार करायचा हाय, त्याने माह्या गोष्टीवर ध्यान लावावे.”

33. ‌‌‌पेरणी करणा-याची गोष्ट — चित्र 6

हे कहाणी शिष्यायले समजली नाई, ‌‌‌म्हणून येशूने स्पष्टिकरण केले, “ते बिया देवाचे वचन हाय. रस्त्यावरची जमीन असा माणूस हाय जो देवाच वचन आयकतो, पण ते वचन समजून घेत नाई. तवा सैतान त्याच्या जवडचे वचन चोरून घेतो, अर्थात सैतान त्याले वचन समजण्यापासून दूर करतो.”

33. ‌‌‌पेरणी करणा-याची गोष्ट — चित्र 7

“गोट्याची जमीन म्हणजे अशी व्यक्ती हाय, जो देवाच्या वचनाले आयकतो, अन् आनंदाने स्वीकार पण करतो. पण जवा कठीण वेळ येते, अन् दुसरे लोकं त्याले सतावतात, तवा तो देवाच्या पासून दूर होऊन जातो, अर्थात तो देवावर भरोसा करणे बंद करतो.”

33. ‌‌‌पेरणी करणा-याची गोष्ट — चित्र 8

“ते काटेरी जमीन अशी व्यक्ती हाय, जे देवाच्या वचनाले आयकते,, पण कालांतराने संसाराची चिंता, श्रीमंती आणि जगिक सुख यामुळे त्याचे देवावरील प्रेम कमी होत जाते. याचा परिणाम म्हणुन, त्याने आकलेले वचन निष्फळ ठरते.’’

33. ‌‌‌पेरणी करणा-याची गोष्ट — चित्र 9

“पण चांगली जमीन तो व्यक्ती हाय, जो देवाच्या वचनाले आयकतो, त्याच्यावर विश्वास पण करतो, अन् फळ पण आणतो.”

बायबल कथा :‌‌‌मत्तय 13 :1 -8; 18-23; मार्क 4 : 1 - 8 ; 13 - 20; लूक 8 : 4 - 15

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।