34. येशू दुसऱ्या अनेक गोष्टी शिकवते
येशूने देवाच्या राज्याच्या बद्दल अनेक गोष्टी सांगतल्या, उदाहरणार्थ, त्याने म्हतलं, “देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे हाय, ज्याले कोणी तरी आपल्या वावरात पेरले. तुमाले मालूम हाय, कि मोहरीचा दाणा हा सगळ्या बियामध्ये सगळ्यात लहान रायते.”
”पण जवा हा मोहरीचा दाणा उगवुन वाढतो तवा बगिच्या मधल्या इतर झाडायपेक्षा सगळ्यात मोठे होऊन इतके वाढते की, अभायातले पाखरं येऊन त्याच्या फांद्यात आराम करतात.”
येशूने आणखी एक दुसरी गोष्ट सांगतली, “देवाचे राज्य खमिरासारखे हाय, ज्याले एक बाई पिठाच्या हुंड्यात मिसळवते, अन् ते सगळ्या हुंड्यात फयलून जाते.”
“स्वर्गाचे राज्य त्या खज्याण्यासारखे हाय, ज्याले कोणी तरी वावरात लपवून ठेवले. कोण्यातरी माणसाले तो खजिना सापडला, अन् त्याने ते परत रोवून ठेवले. त्याले येवढा आनंद झाला की त्याने आपली सगळी संपत्ती ईकून टाकली, या करीता कि ते वावर ईकत घ्यावे ज्यामध्ये तो खजाना होता.”
“स्वर्गाचे राज्य एका मौल्यवान मोत्यासारखे सुद्धा हाय, जवा मोत्याच्या व्यापा-याच्या ते दृष्टिस पडले तवा त्यानं त्याची सगळी मालमत्ता ईकून टाकली अन् आलेल्या पैशांनी ते मौलवान मोती ईकत घेतले.”
तती काई लोकं होते, जे हा विचार करत होते, कि देव त्यायले यासाठी स्वीकार करणार कावून कि ते चांगले काम करत हायत. ते लोकं अशा लोकायले तुच्छ मानत होते, जे चांगल्या कामाले नाई करत होते. म्हणून येशूने त्यायले हे गोष्ट सांगतली, “दोन माणसं होते अन् दोघपण प्रार्थना करण्यासाठी देवळात गेले, त्यांपैकी एक करवसुली करणारा अन् दूसरा एक धार्मिक पुढारी होता.”
“त्या धार्मिक पुढा-याने अशी प्रार्थना केली, हे देवा, मी तुह्या धन्यवाद देतो की मी अन्य माणसासारखा पापी नाई, जे चोरी, अन्याय, व्यभिचार करतात त्यायच्याप्रमाणे मी नाई, व हया करवसुली करणाऱ्या सारखा पापी नाई.”
“उदाहरणार्थ, मी हप्त्यातून दोन खेप उपास करतो, अन् मी तुले माह्या मिळणाऱ्या धनातून दहावा भाग तुले देतो.”
“पण तो करवसुली करणारा, त्या धार्मिक पुढा-यापासून खूप दूर उभा झाला अन् त्याने वर स्वर्गाच्या इकडे पण पायले नाई, याच्या व्यतिरिक्त, त्याने आपल्या हाताने आपल्या छातीले ठोकले अन् प्रार्थना केली, “देवा कृपा करून माह्यावर दया कर, कावून कि मी पापी हाय.”
मंग येशू म्हतलं, “मी तुमाले खरोखर सांगतो, देवाने त्या करवसुली करणाऱ्याची प्रार्थना आयकली, अन् त्याले धर्मी घोषित केले. पण त्याने त्या धार्मिक पुढाऱ्याची प्रार्थना पसंद नाई केली. देव हरेक घमंडी माणसाच्या मस्तकाले खाली करणार, पण तो त्याचा आदर करणार जो स्वताले नम्र करतो.”
बायबल कथा :मत्तय 13 : 31 - 33, 44 - 46; मार्क 4 : 30 - 32; लूक 13 : 18 - 21; 18 : 9 - 14
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।