35. दयाळू बापाची गोष्ट
एक दिवस, येशू खूप साऱ्या लोकायले शिकवण देत होता, जे त्याचं आयकण्यासाठी जमले होते, त्यामध्ये करवसुली करणारे अन् दुसरे लोकं पण होते, ज्यायनं मोशेच्या नियमशास्त्राचे पालन नाई केले होते.
काई धार्मिक पुढाऱ्यायन पायले कि येशू त्या लोकायसोबत एक दोस्तायसारखा गोष्ट करत हाय, म्हणून त्यायनं एकामेकायले म्हणने सुरु केले, कि तो गलत करत हाय. येशूने त्यायले गोष्ट करतांना पायले म्हणून त्यानं त्यायले हे गोष्ट सांगतली
“एक माणूस होता ज्याचे दोन पोरं होते, लहान पोराने आपल्या बापाले म्हतलं, हे बाबा मले माह्याला हिस्सा पायजे, तवा बापाने आपल्या दोन पोरायसाठी संपत्ती मधून वाटण्या केल्या.”
“अन् मंग लहान पोरगा आपली सगळी मालमत्ता एखट्टा करून दूर देशी चालला गेला, अन् वाईट मार्गाने ते सगळी संपत्ती गमावून टाकली.”
याच्यानंतर जती लहान पोरगा होता, त्या देशात खूप मोठा दुष्काळ पडला, अन् त्याच्या पासी जेवण करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. म्हणून त्याले डुकरं चारण्याचे काम भेटले, अन् तो येवढा दुखी अन् उपासी होता, कि त्याले डुकरायचे जेवण खायाची पण इच्छा व्हायची.
“शेवटी तो लहान पोरगा स्वताले म्हणतो, “मी काय करत हाय? माह्या बापाच्या सेवकायले खाण्यासाठी खूप सारं हाय, तरी पण मी अति उपासी मरतो हाय. मी माह्या बापाच्या पासी वापस जाईन, अन् म्हणीन बाबा मले तुमच्या सेवकायपैकी एक सेवक बनण्यासाठी मले काम द्या असी विनंती करीन.”
“मंग त्या लहान पोराने आपल्या बापाच्या घरी वापस जायाचा निश्चय केला, अन् तो घरी जायाले निघाला. जवा तो घराच्या पासी आला तवा घराच्या काई अंतरावरच त्याच्या बापाने त्याले पायले, तवा त्याले त्याच्यावर दया आली, मंग तो पयत त्याच्या पोराच्या इकडे गेला, अन् त्याले आपल्या मिटीत घेतले, अन् त्याचे मुके घेतले.”
“तवा तो पोरगा बोलला, हे बापा मी देवा विरुध्द अन् तुह्या विरुध्द पाप केले हाय, मी तुमचा पोरगा म्हणण्याच्या लायक पण नाई हाय.”
“मंग बापाने आपल्या एका सेवकाले म्हतलं, लवकर जाऊन चांगले कपडे घेऊन या, अन् माह्या पोराले नेसवा, अन् त्याच्या बोटात आंगठी अन् पायात जोडे घाला, अन् सगळ्यात चांगले वासरू मारून मेजवानी तयार करा, अन् आपण सगळे आनंद साजरा करु. कावून कि माह्या पोरगा मेला होता, पण आता जिवंत झाला हाय, तो हारोपला होता, पण आता सापडला हाय.”
“म्हणून लोकायनं आनंदोत्सव सुरु केला. काई वेळाने मोठा पोरगा वावरातून घरी आला, तवा त्याले संगीत अन् नृत्याचा आवाज आयकू आला, तवा त्याले आश्चर्य वाटले, कि हे काय होऊ रायले.”
“जवा मोठ्या पोराले मालूम झाले, कि हा आनंदउत्सव या साठी होत हाय, कि त्याचा लहान भाऊ घरी वापस आला हाय. तवा तो खूप रागवला, अन् घरात जात नव्हता, तवा त्याच्या बापाने बायर येऊन त्याले पण या आनंद उत्सवात भाग घेण्यास सांगतले, पण त्याने मना केले.”
“त्या मोठ्या पोराने आपल्या बापाले म्हतलं, येवढ्या वर्षापासून मी तुमच्या साठी विश्वासूपणे काम करत हाय, अन् कधीही तुमच्या गोष्टीचा नकार देला नाई, तरी पण तुमी मले एक बकरी पण देली नाई, या करिता कि मी माह्या दोस्तायच्या सोबत आनंद साजरा करू शकू. पण तुमच्या या पोराने सगळे धन वाईट कामात बर्बाद केले, अन् जवा तो आला तवा तुमी त्याच्या साठी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सगळ्यात चांगल्या वासराले कापले.”
“तवा बापाने उत्तर देले, हे माह्या पोरा, तू नेहमी माह्या सोबत हायस, अन् जे काई माह्ये हाय, ते सगळे तुह्याले हाय, पण आपल्या साठी आनंद करणे योग्य हाय, कावून कि तुह्या भाऊ मेला होता, पण आता तो जिवंत झाला हाय, अन् तो हारोपला होता, आता सापडला हाय.”
बायबल कथा:लूक 15:11 - 32
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।