36. येशूचे रुपांतर

36. येशूचे रुपांतर — चित्र 1

एक दिवस, येशूने आपल्या तीन शिष्य, पतरस, याकोब, अन् योहानले सोबत (हा य़ोहान नावाचा शिष्य तो व्यक्ती नाई हाय, ज्याने येशूचा बाप्तिस्मा केला होता.)घेऊन प्रार्थना करण्यासाठी एका उंच पहाडावर गेले.

36. येशूचे रुपांतर — चित्र 2

जवा य़ेशू प्रार्थना करत होता, तवा त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला, अन् त्याचे कपडे ऊजीळासारखे पांढरे झाले, जसे पृथ्वीवर कोणाले पण एवढे पांढरेशुभ्र काढता आले नसते.

36. येशूचे रुपांतर — चित्र 3

तवा मोशे अन् एलिय्याह भविष्यवक्ता प्रगट झाले. हे माणसे ह्या पृथ्वीवर शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेली होती. त्यायनं येशू संग त्याच्या मरणाबद्दल बोलत होते, जे यरुशलेम शहरात घडणार होते.

36. येशूचे रुपांतर — चित्र 4

जवा मोशे अन् एलिय्याह येशूच्या सोबत गोष्ट करत होते, तवा पतरसने येशूले म्हतलं, “आमच्या साठी अति असणे चांगले हाय. आमी तीन मंडप बनवतो, एक तुह्यासाठी एक मोशे साठी अन् एक एलिय्याह साठी.” पण पतरसले समजत नव्हत कि आपण काय बोलत हावो.

36. येशूचे रुपांतर — चित्र 5

जवा पतरस बोलत होता, तवा एक चमकदार ढग खाली येऊन त्यायच्यावर आला. तवा त्यायनं ढगातून एक आवाजाले आयकले ते असे कि “हा माह्या पोरगा, ज्याच्यावर मी प्रेम करतो, मी त्याच्यावर खुस हाय, त्याची आयका.” तवा ते तीनीही शिष्य भेले अन् जमिनीवर खाली पडले.

36. येशूचे रुपांतर — चित्र 6

तवा येशूने त्यायले स्पर्श करुन म्हतलं, “भेऊ नका, ‌‌चला उठा.” जवा त्यायनं चवभवंताल पायलं तवा त्यायले फक्त येशूचं दिसला होता.

36. येशूचे रुपांतर — चित्र 7

येशू अन् ते तीन शिष्य पहाडावरून खाली उतरले, तवा येशूने त्यायले म्हतलं, “अति जे झाले त्याच्या बाऱ्यात कोणाले पण काई सांगू नका, मी लवकर मरून जाणार, अन् मंग परत जिवंत होणार, त्यानंतर तुमी लोकायले सांगू शकता.”

बायबल कथा :‌‌‌मत्तय 17:1-9; मार्क 9 : 2 - 8; लूक 9 : 28 - 36

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।