37. येशू लाजरले मेलेल्यातून जिवंत करतो

37. येशू लाजरले मेलेल्यातून जिवंत करतो — चित्र 1

‌‌लाजर नावाचा एक माणूस होता, त्याच्यावाल्या दोन बहिणी होत्या, ज्यायचे नाव मरिया, अन् मार्था होते. ते सगळे येशूचे घनिष्ठ मित्र होते. एक दिवस कोणतरी येशूले सांगतल कि लाजर खूप बिमार हाय, जवा येशूने हे आयकलं तवा त्यानं म्हतलं, “हे बिमारी मरणासाठी नाई, तर हे बिमारी देवाच्या गौरवासाठी हाय.”

37. येशू लाजरले मेलेल्यातून जिवंत करतो — चित्र 2

येशू आपल्या मित्रावर प्रेम करत होता, पण जती तो होता, तती त्यानं दोन दिवस वाट पायली. अन् त्या दोन दिवसानंतर येशू आपल्या शिष्यायले म्हतलं, “चला आपण पुन्हा यहूदीयामध्ये जाऊ.” तवा शिष्यायन उत्तर देलं, “पण हे गुरुजी आता थोडया वेळा आगोदर तथले लोकं तुले मारून टाकण्याच्या फिकरीत होते.” येशूने म्हतलं, “आपला मित्र लाजर हा झोपला हाय, अन् मले त्याले जागी करायचे हाय.”

37. येशू लाजरले मेलेल्यातून जिवंत करतो — चित्र 3

येशूच्या शिष्यायनं उत्तर देलं, “हे प्रभुजी, जर लाजर झोपलेला हाय, तर तो चांगला होऊन जाईन.” तवा येशूने त्यायले स्पष्ट शब्दांत सांगतले, कि “लाजर मेला हाय. मी आनंदित हावो, कि मी तती नव्हतो, याकरिता कि तुमी माह्यावर विश्वास करू शकावे.”

37. येशू लाजरले मेलेल्यातून जिवंत करतो — चित्र 4

जवा येशू लाजरच्या गावात पोहचला, तवा लाजरले मरुन चार दिवस झाले होते. ‌‌‌मार्था येशूले भेटण्यासाठी बायर आली अन् म्हतलं, “हे प्रभुजी, जर तुमी अति असते तर माह्या भाऊ मेला नसता, पण मले विश्वास हाय की तुमी जे काई देवाजवळ मांगसान ते देव देईन.”

37. येशू लाजरले मेलेल्यातून जिवंत करतो — चित्र 5

येशूने उत्तर देलं, “पुनरुत्थान व जीवन मीच हाय. जो कोणी ‌‌‌माह्यावर विश्वास करतो, जर तो मेला असला तरी जगेल, अन् जो कोणी माह्यावर विश्वास करतो तो कधी मारणार नाई.” तवा मार्थाने उत्तर देले, “हे प्रभुजी मले विश्वास हाय कि ‌‌‌तुमी देवाचा पोरगा हा अन् मसीहा हा.”

37. येशू लाजरले मेलेल्यातून जिवंत करतो — चित्र 6

तवा मरीया आली, तवा तिने येशूच्या पाया पडून म्हतलं, “हे प्रभूजी, जर तुमी अति असता तर माह्या भाऊ मेला नसता.” ‌‌‌येशूने तिले विचारलं, “तुमी लाजारला कुठसा ठेवलं हाय?” त्यायनं त्याले सांगतल, कबरेमध्ये. या अन् पहा.” तवा येशू रडला.”

37. येशू लाजरले मेलेल्यातून जिवंत करतो — चित्र 7

ते कबर गोट्यामध्ये खोदलेली एक गुफे सारखी होती, अन् त्या कबरेच्या दरवाज्यावर एक मोठा गोल गोटा ढकललेला होता. जवा येशू कबरेपासी गेला, तवा त्यानं म्हतलं, “या गोट्याले बाजूने करा.” पण मार्थाने म्हतलं, “त्याले मरुन चार दिवस झाले हायत, ‌‌‌आता त्याले दुर्गंधी येत असेन.”

37. येशू लाजरले मेलेल्यातून जिवंत करतो — चित्र 8

येशूने उत्तर देले, “काय मी तुमाले म्हतलं नव्हत, जर तुमी माह्यावर विश्वास कराल तर देवाच्या गौरवाले पायसान?” म्हणून त्यायनं गोटा हटवला.

37. येशू लाजरले मेलेल्यातून जिवंत करतो — चित्र 9

तवा येशूने वर स्वर्गाच्या इकडे पाऊन म्हतलं, “हे बापा, तू माह्ये आयकले म्हणून मी तुह्या धन्यवाद करतो. मले मालूम हाय कि तू सर्वदा माह्याले म्हणणे आयकतो, पण जो लोकसमुदाय सभोवती उभा हाय त्यायच्याकरिता मी बोललो, हयासाठी की तू मले पाठवले हाय, असा ते विश्वास करतीन.” तवा येशूने मोठयाने हाक मारली, “लाजर बायर ये.”

37. येशू लाजरले मेलेल्यातून जिवंत करतो — चित्र 10

तवा लाजर कबरेतून बायर आला! त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले होते, ‌‌‌येशूने त्यायले म्हतलं, “हे प्रेतवस्त्रे काढुन टाकण्यासाठी त्यायले मदत करा, अन् त्याले मोकये करा.” तवा या चमत्काराले पाऊन खूप साऱ्या यहुदी लोकायन येशूवर विश्वास केला.”

37. येशू लाजरले मेलेल्यातून जिवंत करतो — चित्र 11

पण यहुदी लोकायचे धार्मिक पुढारी येशूचा राग करु लागले, म्हणून ते योजना तयार करण्यासाठी सोबत मिळाले, कि येशूले अन् लाजर ले मारून टाकावे.”

बायबल कथा:‌‌‌योहान 11: 1 - 46

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।