38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 1

‌‌‌दरवर्षी यहुदी लोकं फसह सण साजरा करत होते. हा सण यासाठी होता, कि शेकडोवर्षापुर्वी ‌‌‌देवाने मिस्र देशाच्या गुलामगिरीपासून त्यायच्या पुर्वजांची कशी सुटका केली, याचा आनंद साजरा करण्यासाठी यहूदी लोक हा सण साजरा करत होते. ‌‌‌येशूने उघडपणे आपले प्रचारकार्य अन् शिकवण देणे सुरु केले. येशूने आपल्या शिष्यायले सांगतले की त्याची त्यायच्या बरोबर यरुशलेम शहरात फसह सणाले साजरा करण्याची इच्छा हाय, अन् हे पण म्हतलं, कि त्याले त्या जागी मारल्या जाईन.

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 2

येशूच्या शिष्यायमध्ये एक यहूदा नावाचा एक शिष्य होता. ‌‌‌यहूदा हा प्रेषितायच्या पैशायची थैली सांभाळणारा खजिनदार होता, पण नेहमी तो त्या पैशाच्या थैलीतून पैसे चोरत होता. ‌‌‌येशू अन् शिष्य यरुशलेम शहरात पोहचण्याच्या पयले यहूदा धार्मिक पुढाऱ्यायले जाऊन भेटला. त्यानं पैशांच्या मोबदल्यात त्यायले येशूले पकडून देण्याच्या बाऱ्यात बोलला. ‌‌‌त्याले मालूम होते की यहुदी पुढारी येशूले ख्रिस्त हाय असे मानत नाई, अन् त्याले मारण्याच्या प्रयत्नात हाय.

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 3

तवा महायाजकाच्या म्हणण्याप्रमाणे यहुदी पुढा-यायन त्याले पकडण्यासाठी यहूदाले तीस चांदीचे नाणे देले. हे असेच झाले जसे भविष्यवक्त्यायन भविष्यवाणी करून म्हतलं होतं. तवा यहूदान त्यायची गोष्ट मानली, अन् पैसे घेऊन चालला गेला. तो येशूले पकडण्यासाठी मोका शोधात होता.

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 4

यरुशलेम शहरात येशूने आपल्या शिष्यायच्या सोबत फसह सण साजरा केला. फसह जेवणाच्या वेळी येशूने भाकर घेऊन ते मोडली. ‌‌‌ त्यानं म्हतलं, “हे घ्या अन् खा, हे माह्य शरीर हाय, जे मी तुमच्यासाठी देले हाय, हे माह्या आठवणी मध्ये करा.” अशाप्रकारे येशूने म्हतलं, की तो त्यायच्यासाठी मरून जाणार अर्थात त्याचे शरीर त्यायच्यासाठी बलिदान म्हणून देण्यात येईन.

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 5

मंग येशूने एक अंगुराच्या रसाचा गिलास घेऊन म्हतलं, “हे ह्या अन् प्या, हे माह्ये नव्या कराराचे रक्त हाय, ते अनेकायच्या पापक्षमेसाठी ओतले जात हाय, ‌‌‌जवा तुमी हे पेसान तवा हे माह्या आठवणीसाठी करा.”

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 6

तवा येशूने आपल्या शिष्यायले म्हतलं, “तुमच्या पैकी एक जो मले पकडून देईन.” तवा शिष्य चकित झाले, अन् विचारू लागले कि कोण असं काम करीन. येशूने म्हतलं, “मले पकडणारा माणूस तो हाय, ज्याले मी हा भाकरीचा तुकडा देणार” तवा त्यानं ते भाकर मोडून यहूदाले देली.

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 7

त्या भाकरीले घेतल्यावर यहूदाच्या शरीरात सैतान घुसला, तवा येशूले पकडून देण्यासाठी ‌‌यहूदा ततून निघाला. यहूदी पुढा-यायले मदत करण्यासाठी गेला, ‌‌‌तो रात्रीचा वेळ होता.

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 8

जेवण झाल्यावर येशू अन् त्याचे शिष्याय सोबत जैतुनाच्या पहाडावर गेले. ‌‌‌येशूने म्हतलं, “तुमी सगळे आज रात्री मले सोडून जासान, हे लिवलेल हाय, “मी मेंढपाळाले मारीन अन् सगळे मेंढरं तितर-बितर होतीन.”

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 9

तवा पतरसने उत्तर देले, “जरी सगळे तुले सोडतीन, तरी पण मी तुले सोडणार नाई” तवा येशूने पतरसले म्हतलं, “सैतानाने तुमच्या सगळ्यायचा नाश करायचे ठरवले हाय, पण हे पतरस मी तुह्यासाठी प्रार्थना केली हाय, कि तू विश्वासापासून चुकू नये, तरी पण आजच्या रात्री, कोंबड्याच्या बाग देण्याच्या आगोदर तू माह्या तीन वेळा नकार करशीन, कि तू मले ओयखत नाई.”

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 10

तवा पतरसने येशूले म्हतलं, “जरी मी मेलो तरी तुह्या नकार करणार नाई.” बाकीच्या शिष्यायन पण हेच म्हतलं.

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 11

मंग येशू आपल्या शिष्यायच्या सोबत गतसमनी नावाच्या ठिकाणी गेले. येशूने आपल्या शिष्यायले प्रार्थना करण्याले सांगतले, यासाठी कि सैतान त्यायची परीक्षा करू नये. मंग येशू स्वत: प्रार्थना करायले चालला गेला.

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 12

येशूने तीन वेळा प्रार्थना केली, “हे माह्या बापा जर शक्य असेल, तर हा दु:खसहनाचा प्याला माह्यापासून दूर कर, पण जर लोकायचे पापक्षमेसाठी दुसरा कोणता रस्ता नाई हाय, तर तुह्याली इच्छा पूर्ण होवो.” ‌‌‌‌‌‌येशू खूप व्याकूळ झाला व त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा झाला. त्याले सामर्थ देण्यासाठी ‌‌‌देवाने एक देवदूत पाठवला.

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 13

हर वेळी प्रार्थना करून येशू आपल्या शिष्यायच्या पासी वापस आला, पण ते झोपत होते. जवा येशू तिसऱ्या वेळी वापस आला, तवा येशूने म्हतलं, “जागी व्हा, मले पकडणारा आला हाय.”

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 14

यहुदी पुढारी, सैनिक अन् एका मोठया लोकसमुदायाबरोबर यहूदा आला. त्यायच्यापासी तलवारी व काड्या होत्या, ‌‌‌यहूदाने येशूच्या पासी येऊन म्हतलं, “हे गुरुजी नमस्कार” अन् त्याचा मुका घेतला. असं त्याने त्याले पकडणारे यहूदी पुढा-यायले खुणाव्यासाठी केले. तवा येशूने म्हतलं, “हे यहूदा काय मुका घेऊन मले पकडून देत हायस?”

38. ‌‌‌येशूले विश्वासघाताने धरुन देण्यात येते — चित्र 15

जवा सैनिक येशूले पकडत होते, तवा पतरसनं आपली तलवार काढली अन् महायाजकाच्या एका सेवकाचा कान कापला. ‌‌‌येशूने म्हतलं, “तलवार बाजुला ठेव, मी माह्या देव बापाले माह्या बचावासाठी देवदूतायचे सैन्य मागू शकतो, पण मले माह्या देव बापाची आज्ञा मानने आवश्यक हाय.” मंग येशूने त्या माणसाचा कान बरा केला. ‌‌‌येशूले पकडल्यावर सगळे शिष्य पयाले.

बायबल कथा:‌‌‌मत्तय 26:14-56; मार्क 14 : 10-50; लूक 22 : 1-53; योहान 12:6; 18:1 - 11

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।