39. येशूची चौकशी
हा अर्ध्यारात्रीचा वेळ होता, ते सैनिक येशूले महायाजकाच्या घरी घेऊन आले, कावून कि महायाजकाले येशूले प्रश्न विचारायचे होते. त्यावाक्ती पतरस दुरून त्यायचा पाठलाग करत होता, जवा सैनिक येशूले घरात घेऊन गेले, तवा पतरस बायर थांबून स्वताचे आंग थंडीमुळे तापावर शेकत होता.
तवा घराच्या अंदर यहुदी धर्मपुढारी येशूची चौकशी करत होते. ते त्याच्या विरुद्ध खूप सारे खोट्या साक्षीदारायले आणत होते, जरी त्यायच्या गोष्टीमध्ये तालमेल नव्हता. म्हणुन यहूदी पुढा-यायले येशूच्या बाऱ्यात काई पण सिद्ध करता आले नाई कि तो दोषी हाय. त्यावाक्ती येशू काईच बोलला नाई.
आखरी मध्ये महायाजकाने येशूच्या इकडे पाऊन विचारलं, “आमाले सांग, की तूच जिवंत देवाचा पोरगा मसिह हायस काय?”
येशूने म्हतलं, “मी हाय, अन् तुमी मले देव बापाच्या सोबत बसलेला, अन् स्वर्गातून येतांना पायसान.” तवा महायाजकाने आपले कपडे फाडले, कावून कि जे येशूने म्हतलं, होतं, त्या गोष्टीवर तो खूप रागाने भरला होता. त्याने दुसऱ्या धार्मीक पुढा-यायच्या समोर मोठयाने कल्ला केला, “आता आमाले आणखी पुराव्याची गरज नाई हाय, कि या माणसाने काय केलं हाय! तुमी स्वताचं त्याले म्हणतांना आयकले हाय, तो देवाचा पोरगा हाय. याच्या बाऱ्यात तुमचा काय निर्णय हाय?”
सगळ्या यहुदी पुढा-यायन महायाजकाले उत्तर देले, “कि तो मरणदंडास पात्र हाय.” तवा त्यायनं येशूच्या डोयावर पट्टी बांधली, त्याच्या तोंडावर थुंकले, त्याले मारले अन् त्याची मजाक उडवली.
अन् पतरस घराच्या बायर वाट पायत होता, तवा एका घरकाम करणा-या एका बाईने त्याले पायले अन् म्हतलं, “तुमी पण येशूच्या बरोबर होते!” तवा पतरसन मना केलं. मंग आणखी एका पोरीनं परत पतरसले म्हतलं, अन् तवा पण पतरसने मना केले. आखरी मध्ये काई लोकायन म्हतलं, “आमाले मालूम हाय, कि तू येशूच्या सोबत होता, कावून कि तुमी दोघ पण गालील प्रांतातले हा.”
तवा पतरसन म्हतलं, “जर मी या माणसाले ओयखत असीन तर देव मले श्रापित करीन.” लवकरच पतरसन असं म्हतल्यावर, एका कोंबड्याने बाग देला, तवा येशूने मांग फिरून पतरसले पायलं.
तवा पतरस ततून चालला गेला, अन् मोठमोठ्याने रडू लागला. त्याचं वाक्ती येशूले पकडून देणारा यहूदाने पायलं, कि यहुदी पुढाऱ्यायन येशूले मरणदंडाची शिक्षा देली हाय. तवा यहूदा पण खूप दुखी झाला, अन् स्वता जाऊन आत्महत्या केली.
त्या देशाचा राज्यपाल पिलातुस होता, अन् तो रोम शहरासाठी पण काम करत होता. यहुदी पुढाऱ्यायन येशूले त्याच्या पासी आणले, त्यायले वाटे कि पिलातुसने त्याले मरणदंड द्यावे, अन् त्याले मारून टाकावे. पिलातुसने येशूले विचारलं, “काय तू यहुदी लोकायचा राजा हायस?”
येशूने उत्तर देले, “तुमी बरोबर म्हतलं हाय, पण माह्ये राज्य या पृथ्वीवर नाई हाय, जर असते तर माह्याले दास माह्यासाठी लढले असते. मी पृथ्वीवर देवाच्या बाऱ्यात खरं सांगायले आलो हाय, हरेक जन जो खऱ्याले प्रेम करतो, तो माह्याले म्हणणे आयकतो.” तवा पिलातुसने म्हतलं, “तर मंग खरं काय हाय?”
येशूच्या सोबत गोष्ट केल्यावर, पिलातुसने बायर लोकायच्या गर्दीले म्हतलं, “मले असं कोणत हि कारण वाटत नाई कि या माणसाले मरणदंड व्हावे.” पण यहुदी पुढाऱ्यायन अन् लोकायच्या जनसमुदायाने कल्ला करून म्हतलं, “त्याले वधस्तंभावर चढवा.” पिलातुसने उत्तर देले, “पण तो निर्दोष हाय” पण ते आणखी मोठ्या आवाजाने कल्ला करू लागले, तवा पिलातुसने तिसऱ्यांदा म्हतलं “तो दोषी नाई हाय.”
तवा पिलातुस भेला कि लोकायच्या जमावाने दंगे नाई करावं, म्हणून त्याने आपल्या सैनिकाले येशूले वधस्तंभावर चढवण्याची आज्ञा देली. रोमी सैनिकायन येशूले कोडे मारले, अन् त्याच्या आंगावर एक राजकीय झगा घातला अन् डोक्शावर काटयायचा मुकुट ठेवला. मग ते त्याची मजाक करु लागले अन् म्हणत होते कि “पाहा यहुदी लोकायचा राजा!”
बायबल कथा :मत्तय 26: 57-27:26; मार्क 14 : 53 - 15: 15; लूक 22: 54 - 23 : 25; योहान 18 : 12 - 19:16
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।