40. येशूले वधस्तंभावर चढवतात

40. येशूले वधस्तंभावर चढवतात — चित्र 1

‌‌‌येशूची मजाक केल्यावर सैनिकायन त्याले वधस्तंभावर चढवण्यासाठी घेऊन गेले. त्यायनं त्या वधस्तंभाले त्याच्याचं खांद्यावर देले, ज्यावर तो मरणार होता.

40. येशूले वधस्तंभावर चढवतात — चित्र 2

तवा सैनिक येशूले त्या ठिकाणी घेऊन आले ज्याले ‘‘कवटी’’ म्हतल्या जाते. त्यायनं येशूच्या हातामध्ये अन् पायामध्ये वधस्तंभावर खिळे ठोकले, पण येशूने म्हतलं, “हे देव बापा यायले क्षमा कर, कावून कि यायले मालूम नाई हाय, कि हे काय करत हायत.” त्यायनं एका पाटीले पण त्याच्या डोक्शावर लावली, ज्यावर लिवलेल होतं, “यहुदी लोकायचा राजा.” पिलातुसने त्यायले हेच लिवण्यासाठी सांगतले होते.

40. येशूले वधस्तंभावर चढवतात — चित्र 3

सैनिकायन येशूच्या कपड्यायसाठी चिठ्ठया टाकल्या. जवा त्यायनं असं केलं, तवा त्यायनं त्या भविष्यवाणीले पूर्ण केलं, ज्या मध्ये असं लिवलेल होतं, “त्यायनं माह्या कपड्यायले वाटून घेतले, अन् माह्या कपड्यायसाठी चिठ्ठया टाकल्या.”

40. येशूले वधस्तंभावर चढवतात — चित्र 4

तती दोन डाकू पण होते, ज्यायले सैनिकायन त्याचं वाक्ती वधस्तंभावर चढवले होते. सैनिकायन त्यायले येशूच्या आजूबाजूने चढवले होते, त्यातून एका डाकूने येशूची मजाक केली, पण दुसऱ्याने म्हतलं, “काय तू भेत नाई कि देव तुले दंड देईन? आपुन खूप साऱ्या बेकार कामामुळे दोषी हावो, पण हा माणूस निर्दोष हाय.” मंग त्याने येशूले म्हतलं, “जवा तू तुह्या राज्यात जासीन तवा कृपा करून माह्याली पण आठवण करजोक.” तवा येशूने उत्तर देलं, “आजच तू माह्या सोबत स्वर्ग लोकात असणार.”

40. येशूले वधस्तंभावर चढवतात — चित्र 5

यहुदी पुढाऱ्यायन अन् गर्दीतल्या लोकायन येशूची मजाक केली, त्यायनं त्याले म्हतलं, “जर तू देवाचा पोरगा हायस तर वधस्तंभावरून खाली उतर, अन् स्वताले वाचव, तवा आमी तुह्यावर विश्वास करणार.”

40. येशूले वधस्तंभावर चढवतात — चित्र 6

तवा त्या सगळ्या देशातल्या आभायात पूर्ण अंधार झाला. जरी ते दिवसाची मध्य वेळ होती, दुपारच्या वेळी काळोख झाला होता, अन् तीन घंटे असचं रायले.

40. येशूले वधस्तंभावर चढवतात — चित्र 7

तवा येशूने मोठयाने ओरडून म्हतलं, “पूर्ण झाले! हे बापा, मी आपली आत्मा तुह्या हाती सोपवतो.” तवा त्याने आपले डोके खाली वाकवले अन् प्राण सोडून देले. जवा तो मेला तवा मोठा भूकंप झाला. तो मोठा पर्दा जो देवाच्या उपस्तिती पासून लोकायले अलग करत होता, वरून खाली फाटून दोन भाग झाला.

40. येशूले वधस्तंभावर चढवतात — चित्र 8

आपल्या मरणाच्याव्दारे येशूने लोकायसाठी देवाच्या पासी येण्याचा रस्ता मोकया केला. जवा येशूच्या देखरेख साठी सैनिक होते, त्यायनं जे काई झाले होते ते सगळे पायले, अन् म्हतलं, “खरोखर हा माणूस निर्दोष होता, हा देवाचा पोरगा हाय.”

40. येशूले वधस्तंभावर चढवतात — चित्र 9

तवा योसेफ अन् नीकुदेमुस नावाचे दोन यहुदी पुढारी आले, ते हा विश्वास करत होते कि येशू मसिह हाय. त्यायनं पिलातुसले येशूचे शरीर मांगतले, तवा त्यायनं त्याच्या शरीराले कपड्यात झाकले. तवा ते त्याले गोट्यामध्ये खोदलेल्या एका कबरे मध्ये घेऊन गेले, अन् त्याच्या मध्ये ठेवून देले. तवा त्यायनं त्या कबरेच्या दरवाज्यावर एक मोठ्या गोल गोटा ठेवून तो दरवाजा बंद केला.

बायबल कथाःमत्तय 27:27-61; मार्क 15:16-47; लूक 23:26-56; योहान 19:17-42

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।