41. देव येशूले मेलेल्यातून जिवंत करतो.
सैनिकायच्या व्दारे येशूले वधस्तंभावर चढवल्यानंतर, यहुदी पुढाऱ्यायन पिलातुसले म्हतलं, “त्या खोट्या येशूने म्हतलं होतं, कि तो तीन दिवसाच्या बाद मेलेल्यातून जिवंत होणार, म्हणून निश्चित करण्यासाठी कोणाले तरी कबरेची देखरेख करावी लागणार, कि त्याचे शिष्य त्याचे शरीर चोरावे नाई म्हणून, जर ते असं करतीन तर म्हणतीन, कि तो मेलेल्यातून जिवंत झाला.
पिलातुसन म्हतलं, “काई सैनिकायले घेऊन जा, अन् जसी तुमाले कबरेची देखरेख करायची हाय तसी करा” म्हणून त्यायनं त्या कबरेच्या दरवाज्यावर एक शिक्कामोर्तब केले, त्यायनं सैनिकायले पण तती ठेवले, कि येशूचे शरीर कोणी चोरावे नाई.
येशू मरणझाल्यावर दुसरा दिवस हा शब्बाथ दिवस होता, कोणी पण शब्बाथ दिवशी काम करू शकत नाई, म्हणून येशूचा कोणताहि मित्र कबरेवर नाई आला, पण शब्बाथ दिवसाच्या दुसऱ्या दिवशी खूप सकाळीचं काई बाया येशूच्या कबरेवर जायाले तयार झाल्या, त्यायले त्याच्या शरीरावर सुगंधी द्रवे लावायचे होते.
तवा त्या बाया पोहचण्याच्या पयले, अचानक एक मोठा भूकंप झाला, स्वर्गातून एक देवदूत येऊन त्या गोट्याले बाजुले करतो, जो कबरेच्या दरवाज्यावर होता, तती एक देवदूत ऊजीळासारखा चमकत होता, कबरेवर जे सैनिक होते, त्यायनं त्या देवदूताले पायले, तवा ते खूप भेले कि मेल्यासारखे जमिनीवर पडले.
जवा त्या बाया कबरेजवळ आल्या, तवा देवदूताने त्यायले म्हतलं, “भेऊ नका, येशू अति नाई हाय, तो मेलेल्यातून जिवंत झाला हाय, जसं कि त्यानं म्हतलं होतं, कि तो जिवंत होईन, कबरे मध्ये पाहा” त्या बायायन कबरेमध्ये येऊन जती येशूचं शरीर ठेवल होतं, तती पूर्ण पणे पायले, अन् पायले कि तती त्याचे शरीर नाई होते.
तवा त्या देवदूताने त्या बायायले म्हतलं. “जाऊन त्याच्या शिष्यायले सांगा, कि येशू मेलेल्यातून जिवंत झाला हाय, अन् तो तुमच्यापुढे गालीलास जात हाय.”
हे आयकून त्या बायायले अचंभित वाटलं, अन् खूप आनंदित झाल्या, त्या शिष्यायले हे बातमी सांगायले पयत गेल्या.
जवा त्या बाया शिष्यायले हे बातमी सांगायला जात होत्या, तवा येशूने त्यायले दर्शन देले, तवा त्या बायायन त्याले नमन केले, येशूने म्हतलं, “भेऊ नका, जाऊन माह्याल्या शिष्यायले गालीलात जायाले सांगा, ते तती मले पायतीन.”
बायबल कथाःमत्तय 27:62-28:15; मार्क 16:1-11; लूक 24:1-12; योहान 20:1-18
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।