42. येशू स्वर्गात परत जाते
ज्या दिवशी देवाने येशूले मेलेल्यातून जिवंत केले, तवा त्याचे शिष्य बाजूच्या गावात चालले होते, तवा जातांना जे घटना येशूच्या सोबत झाली होती, त्या बाऱ्यात गोष्टी करत होते, त्यायले एक आशा होती कि तो एक मसिह होता, तरीपण त्याले मारल्या गेलं, अन् त्या बाया म्हणतात, कि तो परत जिवंत झाला हाय, त्यायले नाई माईत कि कोणत्या गोष्टीवर विश्वास करावा लागतो.
येशू त्यायच्या जवळ आला अन् त्यायच्याबरोबर चालू लागला, पण त्यायनं त्याले ओयखले नाई, त्यानं विचारलं कि कोणाच्या बाऱ्यात गोष्ट करत हा, त्यायनं त्याले सांगतल कि काई दिवसा आगोदर येशूच्या सोबत जे घटना झाली होती त्या बाऱ्यात, त्यायले असं वाटे कि तो एक अनोळखा माणूस हाय, त्यायले असं वाटे कि या माणसाले यरुशलेम शहरात जे घडले होते या विषयी या माणसाले काईचं माईत नाई हाय, म्हणून ते त्याच्या सोबत बोलत होते.
तवा येशूने त्यायले समजावलं कि देवाचं वचन मसिहाविषयी काय सांगतले हाय, खूप आगोदर भविष्यवक्त्यायनं म्हतलं होतं, बेकार लोकं मसिहले दुःख देतीन, त्याले जीवाने मारतीनं, पण भविष्यवक्त्यायनं हे पण म्हतलं होतं, कि तो तिसऱ्या दिवशी परत जिवंत होईन.
जवा ते त्या नगरात पोहचले, जती त्या दोघायले थांबायचं होतं, तवा त्यायनं येशूले आपल्याबरोबर मुक्काम करण्याचा आग्रह केला, व तो त्यायच्याबरोबर रायाला, तवा ते संध्याकाळच्या जेवणासाठी बसलेले होते, तवा येशूने भाकर घेऊन देवाचा धन्यवाद केला, अन् ते मोडली, त्यायनं अचानक पणे ओयखले कि तो येशू हाय, पण त्याचं वाक्ती तो त्यायच्या विलुप्त झाला.
तवा त्या दोघायनं एकामेकायले म्हणू लागले, “तो येशू होता, म्हणूनच त्याने आपल्याले देवाचे वचनातून समजावले, तवा आपण खूप उत्साहित होतो, तवा लवकरचं निघून यरुशलेम शहरात गेले, जवा ते पोहचले तवा त्यायनं शिष्यायले सांगतल, कि “येशू जिवंत हाय, आमी त्याले पायलं हाय.”
जवा शिष्य एकामेका सोबत बोलत होते, तवा येशू अचानक पणे त्या खोलीत त्यायच्या समोर प्रगट झाला, त्यानं म्हतलं, “तुमाले शांती मिळो” शिष्यायले वाटलं कि तो कोणता भुत हाय, पण येशूने म्हतलं, “तुमी कावून भेता? तुमी हे का विचार करत नाई कि मी खरोखर येशू हावो? माह्या हाताले अन् पायाले पाहा” हे दाखवण्यासाठी तो काई भुत नव्हता, त्याने जेवण मांगतले, तवा त्यायनं त्याले एक मासोईचा तुकडा देला, अन् त्याने तो खाऊन घेतला.
येशूने म्हतलं, “माह्या बाऱ्यात देवाचे वचन जे कै सांगते, ते खरं होणार, मी तुमाले सांगतलं होतं, हे होणे जरुरी हाय” तवा येशूने त्यायले चांगल्या प्रकारे देवाचे वचन समजावले, त्यानं म्हतलं, “खूप आगोदर भविष्यवक्त्यायनं लिवलं होतं, मी मसिहले दुख भोगावे लागणार, अन् मरावे लागणार, अन् परत तिसऱ्या दिवशी जिवंत होणार.”
“त्या भविष्यवक्त्यानं हे पण लिवले हाय, माह्याले शिष्य देवाच्या वचनाची घोषणा करणार, ते हरेकाले पश्चाताप करायला सांगतीन, जर ते असे करतात तर तर देव त्यायच्या पापाले क्षमा करणार, माह्याले हे शिष्य या संदेशाचा प्रचार यरुशलेम शहरापासून सुरवात करतीन, अन् ते सगळ्या जातीमध्ये जातीन, तुमी लोकं माह्या साठी एक साक्षी होसान, मी म्हतलं हाय, अन् केले पण हाय, जे सगळ्यायले सोबत जे माह्या सोबत झाले होते.”
पुढील चाळीस दिवसांमध्ये, येशू खूप वेळा शिष्यायले दिसला, एकदा तर तो 500 हून अधिक लोकायले एकाच वेळी दिसला, त्याने आपल्या शिष्यायले आपण जिवंत असल्याचे प्रमाण विविध प्रकारे दिले, अन् त्यानं त्यायले देवाच्या राज्याच्या बाऱ्यात शिकवले.
येशूने आपल्या शिष्यायले म्हतलं, “देवाने मले स्वर्ग व पृथ्वीवर सगळ्यायवर अधिकार मले देला हाय, म्हणून, मी तुमाले म्हणतो, जाऊन सगळ्या जातीच्या लोकायले जाऊन शिष्य बनवा, असं करण्यासाठी तुमाले त्यायले बाप, पोरगा, अन् पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्यावा लागीन, जे काई मी तुमाले आज्ञा देली हाय, त्या सगळ्या मानणे हे त्यायले शिकवायचे हाय, आठवण ठेवा मी तुमच्या सोबत नेहमी रायणार.”
येशूच्या पुनरूत्थानानंतर चाळीस दिवसांनी येशूने शिष्यायले सांगतले, "जोपर्यंत माह्या देव बाप तुमाले सामर्थ्य देणार नाई, तोपर्यंत यरूशलेम शहराले सोडून जाऊ नका” तो तुमच्यावर पवित्र आत्मा पाठवण्याच्या माध्यमातून असचं करीन” मंग येशू स्वर्गात चालला गेला अन् ढगाने त्याले त्यायच्यानजरीच्या आड नेले, सगळ्या गोष्टींवर अधिकार करण्याण्यासाठी येशू देवाच्या उजव्या बाजुये बसला.
बायबल कथाःमत्तय 28:16-20; मार्क 16:12-20; लूक 24:13-53; योहान 20:19-23; प्रेषितांची कृत्ये 1:1-11
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।