43. 4मंडळीची सुरूवात
येशू स्वर्गात गेल्यानंतर, शिष्य यरुशलेम शहरातचं थांबले, कावून कि येशूने त्यायले आज्ञा देली होती, को तुमी सगळे मिळून प्रार्थना करत जा म्हणून ते एकत्र येत होते.
दरवर्षी प्रमाणे फसह सण हा 50 वा दिवस म्हणून यहुदी लोकं पिन्तेकुस्त नावाचा एक महत्वपूर्ण दिवस होता ते साजरा करत होते, पिन्तेकुस्त म्हणजे अशी वेळ ज्यावेळी यहुदी लोकं गव्हाची कापणी करत होते, सगळ्या जगातले यहुदी लोकं पिन्तेकुस्त सण साजरा करण्यासाठी यरुशलेम शहरात येत असत, यावर्षी पिन्तेकुस्तचा सण साजरा करण्याची वेळ येशूच्या स्वर्गारोहन झाल्याच्या एका हप्त्यानंतर होता.
ज्या वाक्ती सगळे विश्वासी लोकं एकत्र जमले होते, ज्या घरात ते होते, तवा अचानक पणे ते घर एका मोठ्या हवेने भरले, तवा आगीच्या सारख्या जिभा त्यायच्यावर प्रगट झाल्या, तवा ते सगळे पवित्र आत्म्याने भरून गेले, अन् त्यायनं अलग-अलग भाषेत देवाची स्तुती केली.
जवा यरुशलेम शहरातल्या रायणार्या लोकायन हे आयकल तवा ते सगळे हे पायण्यासाठी अन् आयकण्यासाठी एकत्र जमले, कि काय होत हाय, तवा त्यायनं विश्वासी लोकायले देवाने जे मोठे मोठे काम केले ते सांगत होते, अन् ते सगळे आपल्या आपल्या भाषेत आयकत होते कावून कि तती अलग अलग भाषेचे लोकं हे पाऊन ते आश्चर्य चकित झाले
काई लोकायले वाटत होते कि शिष्य नशेमध्ये हायत, तवा पतरस उभा झाला, अन् त्यायले म्हणू लागला, “माह्याले बोलणे आयका, हे लोकं नशेमध्ये नाई हायत, पण योयल भविष्यवक्त्याने लिवले हाय, कि आखरीच्या दिवसामध्ये देव आपल्या आत्म्याले पाठणार.”
“इस्राएली लोकायनो, येशू एक असा माणूस होता, ज्याने देवाच्या शक्तिद्वारे अनेक चिन्हे व अद्भुत कार्ये केले, जी तुम्ही स्वतः डोयाने पायले हाय, तुमाले माईत हाय, पण तुमी त्याले त्यास वधस्तंभावर चढवले.”
“येशू मेला पण देवाने त्याले मरणातून परत जिवंत केले, त्याने त्या गोष्टीले पूर्ण केले, ज्याले एका भविष्यवक्त्याने लिवले होते, कि तू आपल्या पवित्र माणसाले कबरे मध्ये सडू देणार नाई, आमी साक्षी हावोत कि देवाने येशूले परत जिवंत केले.”
“देव बापाने आता येशूले आपल्या उजव्या बाजूने आदराने बसवले, अन् येशूने अभिवचन दिल्याप्रमाणे त्याने आपल्यासाठी पवित्र आत्मा पाठवला हाय, आता जे तुमी पायता अन् आयकता, त्या सगळ्या गोष्टी पवित्र आत्मा करत हाय.”
“तुमी येशूला वधस्तंभावर चढवले, पण आता तुमाले कळू द्या की ज्याले तुमी वधस्तंभावर खिळून मारले त्याले देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले हाय.”
पतरसचे भाषण आयकनारे लोकं त्याच्या बोलण्याने पूर्ण पणे हालून गेले होते, म्हणून त्यायनं पतरस अन् शिष्यायले विचारले कि “हे भावायनो आता आमी काय करावे?”
तवा पतरसने त्यायले उत्तर देले, “तुमच्यातून हरेकाणे प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चाताप करुन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा,, म्हणजे देव तुमाले तुमच्या पापायची क्षमा ककरीन, मग तो तुमाले पवित्र आत्म्याचे दान पण देईन."
जवा पतरसनं म्हतलं, तवा सुमारे 3,000 लोकायन विश्वास केला, अन् येशूचे शिष्य बनले, त्यायनं बाप्तिस्मा घेतला व यरुशलेम शहराच्या मंडळीमध्ये सहभागी झाले.
जवा शिष्य प्रेषितायच्या शिक्षणात सहवासात भाकर मोडण्यात व इतरांबरोबर प्रार्थना करण्यात तत्पर असत, ते आनंदाने एकत्र देवाची स्तुती करत होते, अन् त्यांचे सगळे काई समाईक होते, सगळे लोकं त्यायच्यावर खुस असत, हरेक दिवशी त्यायच्यामध्ये नवीन विश्वासणा-यांची भर पडत होती.
बायबल कथाःप्रेषित 2
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।