44. पतरस अन् योहान एका भिकाऱ्याले चांगल करतात
एक दिवस, पतरस अन् योहान देवळात जात होते, तवा तती एक लंगडा माणूस भीख मांगण्यासाठी दरवाज्यापासी बसला होता.
पतरसने त्या लंगड्या माणसाच्या इकडे पाऊन म्हतलं, “माह्यापासी तुले देयासाठी पैसे नाई हायत, पण जे माह्यापासी हाय ते तुले देतो, येशूच्या नावाने उठ अन् चालू लाग.”
लगेचचं तो लंगडा माणूस चांगला होऊन चालू लागला, तवा तो उड्या मारत देवाची स्तुती करू लागला, तवा तती देवळात असणारे लोकं हे पाऊन आश्चर्य चकित झाले.
तती एकदमचं गर्दी त्या माणसाले पायाले जमली जो चांगला झाला होता, तवा पतरसने त्याले म्हतलं, “हा माणूस चांगला झाला हाय, पण या गोष्टीवर आश्चर्य करू नका? कि आमी आमच्या शक्तीने त्याले चांगले केले नाई, पण येशूच्या शक्तीने अन् देवाच्या सामर्थ्याने हा माणूस चांगला झाला हाय.”
“तुमीचं हा ज्यायनं रोमी राज्यपालाले येशूले जीवाने मारायले सांगतले होते, तुमी त्याले मारले जो दुसऱ्याले जीवन देते, पण देवाने त्याले मेलेल्यातून जिवंत केले, तुमाले समजले नाई कि तुमी काय करत हा, पण तुमी जे काम करत होते, जे भविष्यवक्त्यायन म्हतलं होतं, ते पूर्ण झाले, त्यायनं म्हतलं होतं, कि ख्रिस्त दुख भोगीन, अन् मरून जाईन देवाने असेचं होऊ देले केले, म्हणून आता पश्चाताप करा, अन् देवाकडे वडा यासाठी कि तो तुमच्या पापाले धोऊन साफ करीन देईन.”
जवा देवळाच्या पुढाऱ्यायन पतरस अन् योहानले बोलणे आयकले, तवा ते खूप भेले, म्हणून त्यायनं त्यायले पकडून जेलखाण्यात टाकले, पण जे पतरसन म्हतलं होते, त्या गोष्टीवर खूप साऱ्या लोकायन विश्वास केला, येशूवर विश्वास करनाऱ्यायची संख्या सुमारे 5000 झाली होती.
दुस-या दिवशी, यहूदी पुढाऱ्यायन पतरसले व योहानले महायाजकासमोर व इतर धर्मपुढा-यांसमोर घेऊन आले, ते त्या व्यक्तीले पण घेऊन आले, जो लंगडा होता, तवा त्यायनं पतरस अन् योहानले विचारले, “तुमी कोणत्या शक्तिद्वारे ह्या लंगड्या माणसाले चांगले केले हाय?”
तवा पतरसने उत्तर देले, “हा माणूस जो तुमच्या समोर उभा हाय, त्याले येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चांगला झाला हाय, तुमी येशूले वधस्तंभावर चढवले, पण देवाने त्याले परत जिवंत केले, तुमी त्याचा तिरस्कार केला, पण येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याशिवाय तारणाचा दुसरा मार्ग नाई.”
हे आयकून धार्मिक पुढा-यायले आश्चर्याचा धक्का बसला, कावून कि पतरस व योहान सामान्य व अडाणी माणसे असतांनाही त्यायच्यासमोर मोठ्या हिम्मतीने बोलत होते, पण ते येशूच्या सहवासात होते हे त्यायनं ओयखले, मंग त्यायनं पतरस व योहानाले धमकावले अन् जाऊ देले.
बायबल कथाःप्रेषित 3:1-4:22
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।