45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस

45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस — चित्र 1

प्रारंभीच्या मंडळींमध्ये पुढा-यांपैकी स्तिफनुस नावाचा एक पुढारी होता, सगळे लोकं त्याचा आदर करत होते, पवित्र आत्म्याने त्याले सामर्थ अन् बुद्धी देली, स्तिफनुसने खूप सारे चमत्कार केले, जवा त्याने येशूवर भरोसा करण्यासाठी त्यायले शिकवण देली, तवा खूप साऱ्या लोकायन त्याच्यावर विश्वास केला.

45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस — चित्र 2

एक दिवस, स्तिफनुस येशूच्या बद्दल शिकवण देत होता, तवा काई असे यहुदी आले, ज्यायनं येशूवर विश्वास नाई केला, पण त्यायच्या सोबत वादविवाद करने सुरु केले, ते खूप क्रोधीत झाले, म्हणून ते धार्मिक पुढाऱ्यायच्या पासी गेले, अन् त्यायच्या बाऱ्यात खोटं बोलू लागले, त्यायनं म्हतलं, “त्यायनं असं म्ह्तलं, कि आमी स्तिफनुसले मोशे अन् देवाच्या बाऱ्यात खराब गोष्टी करतांना आयकले” म्हणून धार्मिक पुढाऱ्यायन स्तिफनुसले पकडले, अन् महायाजक अन् दुसऱ्या पुढाऱ्यायच्या समोर आणले, अन् खूप सारे साक्ष देणारे आले, स्तिफनुसच्या बाऱ्यात खोटे बोलू लागले.

45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस — चित्र 3

महायाजकाने स्तिफनुसले विचारलं, “काय हे लोकं तुह्या बाऱ्यात खरं बोलत हायत?” तवा स्तिफनुसने महायाजकाले खूप साऱ्या गोष्टीचे उत्तर देले, त्याने म्हतलं, अब्राहामच्या वेळेपासून तर येशू पर्यंत देवाने इस्राएल लोकायसाठी खूप सारे अद्भुत काम केले, पण लोकायन नेहमी देवाची आज्ञा मोडली, तवा स्तिफनुसन म्हतलं, तुमी लोकं देवाच्या विरुद्ध गेले हा, तुमी नेहमी पवित्र आत्म्याचा तिरस्कार केला, अन् नेहमी साठी त्याच्या भविष्यवक्त्यायले मारून टाकले, पण जे त्याने केले, त्याच्या विपरीत तुमी आणखी बेकार केले, तुमी ख्रिस्ताले मारून टाकले.

45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस — चित्र 4

जवा धार्मिक पुढा-यायन हे आयकले, तवा त्यायले खूप राग आला, व त्यायनं आपल्या कानांवर हात ठेवून मोठ्याने कल्ला करू लागले, तवा त्यायनं स्तिफनुसले नगराच्या बायर घेऊन गेले, अन् त्याले मारून टाकण्यासाठी त्याले गोटे मारले.

45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस — चित्र 5

जवा स्तिफनुस मरत असतांना, तवा मोठ्याने ओरडला, “येशू, माह्या आत्म्याचा स्वीकार कर” मंग तो आपल्या घुटण्यावर आला, परत ओरडून म्हतले, “प्रभुजी, हे पाप त्यायच्यावर नका लावू” मंग मरून गेलं.

45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस — चित्र 6

त्या दिवसापासून यरुशलेम शहरात रायणाऱ्या खूप साऱ्या येशूच्या अनुयायांना सतावने सुरु झाले, म्हणून विश्वासी लोकं दुसऱ्या ठिकाणी पडून गेले, पण जती कुठे ते गेले त्यायनं येशूच्या बाऱ्यात प्रचार करत रायले.

45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस — चित्र 7

फिलिप्पुस नावाचा येशूचा एक विश्वासी होता, जसे दुसरे विश्वासी लोकं पडून गेले होते, तसा फिलिप्पूस पण पडून गेला, तो सामरीया प्रांताच्या भागात चालला गेला, तती त्याने येशूच्या बाऱ्यात प्रचार केला, तवा खूप साऱ्या लोकायन येशूवर विश्वास करून तारण मिळवले, एक दिवस फिलिप्पूसच्या पासी देवाच्या इकून एक देवदूत आला, अन् त्याले जंगलात जायाले अन् रस्त्यावर चालायले सांगातले, तवा फिलिप्पुस तती चालला गेला, जवा तो रस्त्याने चालत होता, तवा त्याने एका माणसाले रथामध्ये बसून जात असतांना पायले, तो माणूस कूश देशाचा एक महत्वपूर्ण अधिकारी होता, तवा पवित्र आत्म्याने फिलिप्पासले म्हतलं, जाऊन त्या माणसा संग बोल.

45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस — चित्र 8

म्हणून फिलिप्पुस रथाच्या जवळ आला, तवा त्याने पायले कि तो कूशी माणूस यशयाह भविष्यवक्त्याचे पुस्तक वाचत होता, तो हे वाचत होता "त्याले मेंढरासारखे वधासाठी नेले, अन् जसे कोकरू कातरणा-याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाई, त्यायनं त्याच्या सोबत वाईट वागणूक केली, अन् त्याचा सन्मान पण केला नाई, अन् त्यायनं त्याले जीवाने मारले.”

45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस — चित्र 9

फिलिप्पुसने त्या कूशी अधिका-यास विचारलं, “कि जे तू वाचत हायस ते तुले समजते का? तवा त्या कूशी माणसाने उत्तर देले नाई, जोपर्यंत मले कोणी समजावून सांगत नाई तोपर्यंत मी समजू शकत नाई कृपया येऊन माह्या बाजूने बसा, यशयाह भविष्यवक्ता स्वतःविषयी की अन्य कोणाविषयी लिवत हाय?"

45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस — चित्र 10

फिलिप्पुस रथावर चढून बसला, तवा त्याने कूशी अधिकाऱ्याले स्पष्टिकरण देत सांगतले की यशयाह भविष्यवक्ता हा ख्रिस्ताच्या बाऱ्यात लिवत हाय, फिलिप्पुस अन्य शास्त्रपाठातूनही संदर्भ घेऊन त्याले येशूविषयीची सुवार्ता सांगतली.

45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस — चित्र 11

फिलिप्पुस अन् कूशी अधिकारी पुढे प्रवास करत-करत एका तळ्याजवळ आले, कूशी अधिकारी बोलला, "पाहा अति पाणी हाय, काय मी बाप्तिस्मा घेऊ शकतो का?” तवा त्याने सारथ्यास रथ थांबवायला सांगतले.

45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस — चित्र 12

मंग ते पाण्यामध्ये उतरले, अन् फिलिप्पुसने त्या कूशी अधिका-यास बाप्तिस्मा देला, जवा ते पाण्यातून वर आल्यानंतर, पवित्र आत्मा फिलिप्पुस घेऊन दूस-या ठिकाणी घेऊन गेला, जती फिलिप्पुसन लोकायले येशूच्या बाऱ्यात सांगतले.

45. स्तिफनुस अन् फिलिप्पुस — चित्र 13

तवा तो कूशी अधिकारी मोठ्या आनंदाने आपल्या घराकडे प्रवास करू लागला, कावून कि त्याले येशूची ओयख झाली होती.

बायबल कथाःप्रेषित 6:8-8:5; 8:26-40

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।