46. पौलुस ख्रिस्ती विश्वासी बनतो

46. पौलुस ख्रिस्ती विश्वासी बनतो — चित्र 1

शाऊल नावाचा एक माणूस होता, ज्याने येशूवर विश्वास नाई केले, जवा तो जवान होता, तवा त्यानं स्तिफनुसले मारणाऱ्या लोकायच्या कपड्यायची देखभाल केली होती, नंतर त्यानं विश्वासी लोकायले सतावणे सुरु केले, त्यानं यरुशलेम शहरात घरोघरी जाऊन माणसं बायायले पकडून जेलात टाकले, मंग महायाजकाने शाऊलले दमिश्क नगराले जायाले सांगतले, तती पण त्याले ख्रिस्ती लोकायले पकडून यरुशलेम शहरात आण्याले सांगतले.

46. पौलुस ख्रिस्ती विश्वासी बनतो — चित्र 2

मंग शाऊल दमिश्क जायाले निघाला, तवा दमिष्काच्या रस्त्याने प्रवास करत असतांना, अचानक त्याच्या सभोवती अभायातून ऊजीळ चमकला अन् तो जमिनीवर पडला, तवा त्याले “हे शाऊल हे शाऊल मले कावून सतावत हायस? तवा शाऊलने विचारले कि “हे प्रभू तुमी कोण?” मंग येशूने उत्तर देले, “मी येशू हावो, तू मले सतावत हायस.”

46. पौलुस ख्रिस्ती विश्वासी बनतो — चित्र 3

जवा शाऊल उठला, तवा त्याले काईपण दिसत नव्हते, तवा त्याच्या दोस्तायन दमिश्क नगरात घेऊन गेले, शाऊलन तीन दिवस काई खाल्ले पिल्ले नाई.

46. पौलुस ख्रिस्ती विश्वासी बनतो — चित्र 4

दमिश्क नगरात हनन्याह नावाचा एक शिष्य होता, देवाने त्याले म्हतलं, “त्या घरी जाय जती शाऊल थांबला हाय, अन् तती जाऊन त्याच्यावर हात फिरव म्हणजे त्याले परत दिसू लागीन” पण हनन्याहने म्हतलं, हे प्रभुजी मी आयकले कि त्या माणसाने लोकायले खूप त्रास देला हाय, तवा देवाने म्हतलं, “जाय, मी त्याले यहुदी लोकं अन् दुसऱ्या जातीच्या लोकायमध्ये माह्ये नाव जावे या साठी निवडले हाय, तो माह्या नावासाठी खूप दुख भोगीन.”

46. पौलुस ख्रिस्ती विश्वासी बनतो — चित्र 5

मंग हनन्याह शाऊलच्या पासी गेला, आपल्या हाताले त्याच्यावर ठेवले, अन् म्हतलं, “जो येशू तुले रस्त्यामध्ये प्रकट झाला, त्याने मले तुह्यापासी पाठवले हाय, कि तुले परत दिसू लागावे, व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावा” लगेचचं शाऊल पाऊ लागला, अन् हनन्याहने त्याले बाप्तिस्मा देला, मंग शाऊल जेवला त्याले शक्ती आली.

46. पौलुस ख्रिस्ती विश्वासी बनतो — चित्र 6

लगेचचं शाऊलने दमिश्क नगरात यहुदी लोकायमध्ये प्रचार करणे सुरु केले, त्याने म्हतलं, “येशूचं देवाचा पोरगा हाय” तवा यहुदी लोकं अचंभित झाले, कावून कि शाऊलाने ख्रिस्ती विश्वासी लोकायले मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण जवा त्याने येशूवर विश्वास केला, तवा त्याने यहुदी लोकायच्या संग वादविवाद केला, त्याने हे सिद्ध केले कि येशूचं ख्रिस्त हाय.

46. पौलुस ख्रिस्ती विश्वासी बनतो — चित्र 7

खूप दिवसांनंतर, यहुदी लोकायन शाऊलले मारून टाकण्याची योजना आखली, तवा त्यायनं त्याले मारून टाकण्यासाठी शहराच्या वेशीजवळ काई लोक नेमले, पण शाऊल या बद्दल मालूम झाले, मंग त्याच्या दोस्तायन त्याले वाचवण्यासाठी त्याची मदत केली, एका रात्रीले त्याच्या दोस्तायन त्याले टोपलीत बसून भिंतीवरून खाली सोडले, मंग शाऊलची ततून सुटका झाल्यावर त्याने येशूचा प्रचार करू लागला.

46. पौलुस ख्रिस्ती विश्वासी बनतो — चित्र 8

शाऊल प्रेषितायले भेटण्यासाठी यरुशलेम शहरात गेला, पण ते त्याले भेऊ लागले, पण बरनबास नावाचा एक विश्वासी त्याले प्रेषितायच्या पासी घेऊन आला, अन् सांगू लागला कि दमिश्क नगरात शाऊलने मोठ्या हिम्मतीने येशूच्या बाऱ्यात प्रचार केला, मंग शिष्यायन त्याचा स्वीकार केला.

46. पौलुस ख्रिस्ती विश्वासी बनतो — चित्र 9

काई विश्वासी लोकं जे यरुशलेम शहरातून सतावामुळे पऊन आले होते, ते अंताकिया नगरात आले होते, तती ते येशूच्या बाऱ्यात प्रचार करत होते, अन् तती रायणारे जास्तीस जास्त यहुदी लोकं होते, तवा पयल्या वेळेस खूप साऱ्या लोकायन तती विश्वास केला, तवा बरनबास अन् शाऊल त्या नवीन विश्वासी लोकायले येशूच्या बाऱ्यात शिकवण्यासाठी तती गेले, अन् त्या मंडळीले मजबूत करू लागले, तवा येशूवर विश्वास करणाऱ्यायले पयल्या वेळेस तती “ख्रिस्ती” असे म्हणण्यात आले.

46. पौलुस ख्रिस्ती विश्वासी बनतो — चित्र 10

एक दिवस अंताकिया मध्ये ख्रिस्ती लोकं उपास करून प्रार्थना करत होते, पवित्र आत्म्याने त्यायले म्हतलं, “माह्ये काम करण्यासाठी बरनबास अन् शाऊलले वेगळा करा, जे काम करण्यासाठी मी त्यायले मी निवडले हाय, “म्हणून अंताकियाच्या मंडळीने बरनबास अन् शाऊल साठी प्रार्थना केली, अन् त्यायच्यावर हात ठेवून प्रार्थना केली, तवा त्यायनं त्यायले अन्य ठिकाणी येशूच्या बाऱ्यात शुभ संदेश सांगण्यासाठी पाठवले, बरनबास अन् शाऊलने अलग अलग जातीच्या लोकायले शिक्षा देली, तवा खूप साऱ्या लोकायन येशूवर विश्वास केला.

बायबल कथाःप्रेषित 8:3; 9:1-31; 11:19-26; 13:1-3

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।