47. फिलिप्पी नगरामध्ये पौलूस अन् सीलास
जवा शाऊलने सगळ्या रोमन साम्राज्यामधून प्रवास करत असतांना, त्याने आपले रोमी नाव “पौलूस” उपयोग करु लागला, एक दिवस पौलूस अन् त्याचा दोस्त सीलास हे फिलिप्पी नगरामध्ये येशूची सुवार्ता सांगण्यासाठी गेले, ते शहराच्या वेशीबाहेर नदीच्या काठावर प्रार्थनेसाठी एकत्रित आलेल्या लोकायच्या इकडे गेले, ते तती एका लुदिया नावाच्या बाईले भेटले, जे एक व्यापारी बाई होती, ते देवावर प्रेम करत होती, अन् देवाची भक्ती करणारी होती.
देवाने लुदियाले येशूच्या संदेशावर विश्वास करण्यासाठी सक्षम केले, पौलूस अन् सीलासने तिले अन् तिच्या कुटुंबांले बाप्तिस्मा देला, तिने पौलूस अन् सीलासले आपल्या घरी थांबण्यासाठी आमंत्रित केले, म्हणून ते तती रायले.
पौलूस अन् सीलास लोकायले नेहमी त्या ठिकाणी भेटत होते जती यहुदी लोकं प्रार्थना करण्यासाठी एकत्र येत होते, दररोज ते तती जात होते, तवा तती एक बाई होती जिच्यात भुत आत्मा होता, अन् ते त्या भुत आत्म्याच्या व्दारे लोकायचे भविष्य सांगत होती, म्हणून ते भविष्य सांगून आपल्या धन्यासाठी खूप धन एकत्र करत होती.
जवा ते प्रेषित रस्त्याने चालत असतांना ती गुलाम पोरगी कल्ला करत रायली “अन् म्हणत होती कि हे माणसं परम प्रधान देवाचे दास हायत, हे तुमाले तारणाचा रस्ता दाखवत हायत” ते नेहमी अशीच करत होती, म्हणून पौलूस नाराज झाला.
शेवटी एक दिवशी ते पोरगी कल्ला करू लागली, पौलूसने तिच्याइकडे फिरून तिच्यातल्या भुत आत्म्याले म्हतलं, “येशूच्या नावाने इच्यातून निघून जाय” त्याचं वाक्ती त्या भुत आत्म्याने तिले सोडून देले.
त्या दासीच्या धन्याला खूप राग आला, त्यायले मालूम झालं कि ते भुत आत्म्याच्या वीणा लोकायचे भविष्य सांगू शकत नाई हाय, याचा अर्थ असा कि लोकं त्या मालकाले पैसे नाई देणार.
म्हणून त्या दासीच्या धन्याने पौलूस अन् सीलासले रोमी अधिकाऱ्याच्या पासी घेऊन गेले, त्यायनं पौलूस अन् सीलासले मारहाण केली, अन् जेलात टाकले.
त्यायनं पौलूस अन् सीलासले जेलातल्या अशा ठिकाणी ठेवले, जती सर्वात जास्त सैनिक होते, त्यायनं त्यायचे पाय लाकडाच्या खोडात अटकवले होते, पण पौलूस अन् सीलास अर्ध्या रात्री देवाच्या स्तुतीचे गाणे गात होते.
अचानक, पणे एक मोठा भूकंप झाला, तवा जेलातले सगळे दरवाजे आपोआप उघडले, अन् सगळ्या कैद्यांचे साखळदंडही तुटून पडले.
तवा जेलातला अधिकाऱ्याले जाग आला, त्याने पायलं कि जेलातले सगळे दरवाजे उघडले हायत, त्याले वाटले कि सगळे कैदी पऊन गेले, म्हणून तो खूप भेला कि आता मला रोमी अधिकारी मारून टाकणार हायत, म्हणून त्याने स्वताले मारण्याचा प्रयत्न केला, तवा पौलूस त्याले पाऊन कल्ला करू लागला, “थांबा थांबा स्वताले मारू नको आमी सगळे अतीच हावो.”
तो जेलाच्या अधिकारी भेत-भेत पौलूस अन् सीलास पासी आला, अन् विचारू लागला, कि तारण मिळण्यासाठी मी काय करू”? तवा पौलूसने म्हतलं, “प्रभू येशूवर विश्वास कर, तर तू अन् तुह्याले घराने तारण मिळवतीन” तवा तो अधिकारी पौलूस अन् सीलासले आपल्या घरी घेऊन गेला, अन् त्याने त्यायचे पाय धुतले, पौलूसने त्याच्या घरच्या सगळ्या लोकायले येशूच्या बाऱ्यात शुभ संदेश सांगतले.
जेलाचा अधिकारी अन् त्याच्या सगळ्या कुटुंबांने येशूवर विश्वास केला म्हणून पौलूस अन् सीलासने त्यायले बाप्तिस्मा देला, तवा जेलाच्या अधिकाऱ्याने पौलूस अन् सीलासले जेवायले देले, अन् त्यायनं एकत्र मिळुन आनंद केला.
दुसऱ्या दिवशी शहराच्या अधिका-यायन पौलूस अन् सीलासले सोडून देले, अन् फिलिप्पी शहर सोडून जायाले सांगतले, तवा पौलूस अन् सीलास लुदिया व इतर दोस्तायले भेटले, त्यानंतर ते शहर सोडून चालले गेले, येशूच्या बाऱ्यात शुभ संदेश पसरत रायला, मंडळीची वाढ होत गेली.
पौलूस अन् इतर ख्रिस्ती पुढारी येशूची सुवार्ता सांगत व शिक्षण देत अनेक शहरांमधून प्रवास करत गेले, त्यायनं खूप सारे पत्रे सुद्धा लिवली व मंडळ्यातील विश्वासणा-यांना प्रोत्साहन व शिक्षण देले, त्यांपैकी काई पत्रे बायबलमधील पुस्तके झाली.
बायबल कथाःप्रेषित 16:11-40
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।