48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 1

जवा देवाने सृष्टी बनवली, तवा सर्वकाई परिपूर्ण होते, कोणतेहि पाप नव्हते, आदाम अन् हवा एकामेकावर प्रेम करत होते, अन् ते देवावर प्रेम होते, तवा कोणती बिमारी या मरण नव्हते, अशेच राहावे अशी देवाची इच्छा होती.

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 2

सैतानाने सर्पाच्या माध्यमातून बगिच्यामध्ये हवे सोबत गोष्ट केली, कावून कि तो तिले धोका देणारा होता, तवाचं तिने अन् आदामने देवाच्या विरुद्ध पाप केले, कावून कि त्यायनं पाप केले होते, म्हणून पृथ्वीवर रायणारे सगळे जन मरून जातात.

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 3

कावून कि आदाम अन् हवेने पाप केल्यामुळे आणखी एक भयानक गोष्ट घडली, तवा ते देवाचे वैरी झाले, त्याचा परिणाम तवा पासून पृथ्वीवर जन्म घेणारा हरेक जन पापाचा स्वभाव घेऊन जन्मतो, अन् तो देवाचा शत्रु पण होतो, पापामुळे देवामध्ये अन् माणसामध्ये असणारा नातेसंबंध तुटला होता, परंतु हा नातेसंबंध परत जोडण्याची देवाने एक योजना बनवली.

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 4

देवाने प्रतिज्ञा देली की हवेचा एक वंशज सैतानाचे डोके फोडिल व सैतान त्याची टाक फोडिल, अर्थात सैतान ख्रिस्ताले जीवाने मारीन पण देव त्याले परत जिवंत करीन अन् मंग ख्रिस्त सैतानाच्या सत्तेचा संपूर्ण नायनाट करीन, अनेक वर्षांनंतर देवाने येशू हाच ख्रिस्त हाय, हे प्रकट केले.

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 5

जवा देवाने सगळी पृथ्वी जलप्रलयाद्वारे नष्ट केली, तवा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यासाठी देवाने एक जहाज देले, त्याचप्रकारे, माणसाच्या पापांमुळे हरेक जण मरणास पात्र हाय, पण त्याजवर विश्वास ठेवणारांस वाचवण्यासाठी (तारण्यासाठी) देवाने येशूला पाठवले.

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 6

शेकडो वर्षापासून महायाजक माणसाचे आपल्या पापायची शिक्षा मरण हाय हे दर्शविण्यासाठी सारखे बलिदान व होमार्पणे करत, पण त्या बलिदानाद्वारे त्यायच्या पापायची क्षमा होऊ शकली नाई, येशू हा एक मोठा महायाजक हाय, इतर याजकांनी केले नाई असे येशूने केले, सगळ्या जगातील लोकायसाठी स्वतःचेच अर्पण केले, अशासाठी की जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना पापांची क्षमा व्हावी.येशू हा एक परिपूर्ण महायाजक होता, कारण त्याने, प्रत्येकाने केलेल्या प्रत्येक पापायची शिक्षा स्वत:वर घेतली.

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 7

देवाने अब्राहामाले म्हतलं, “मी तुह्या व्दारे जगातल्या सगळ्या कुळायले आशीर्वादीत करीन, “येशू ख्रिस्त हा अब्राहामाचा वंशज होता.

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 8

देवाने अब्राहामले म्हतलं, कि तू आपल्या एकूलत्या पोराले बलिदान कर, पण देवाने इसहाकच्या बदल्यात बलिदान करण्यासाठी एक मेंढरू देले, आपण सगळे पापासाठी मारण्याच्या योग्य होतो, पण देवाने आपल्या ठिकाणी मरण्यासाठी येशू ख्रिस्ताले बलिदान म्हणून देले, यामुळेचं आपण येशूले देवाचे मेंढरू म्हणतो.

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 9

जवा देवाने मिस्र देशावर आखरी विपत्ती पाठवली, तवा त्याने हरेक इस्राएली कुटुंबांले एक मेंढराचे बलिदान करायले सांगतले, ते मेंढरू निर्दोष असले पायजे, अन् त्याचे रक्त घराच्या दरवाज्याच्या चौकटीवर लावावे असे सांगतले होते, जवा देवाने ते रक्त पायले तवा त्याचे घर ओलांडून तो समोर गेला, अन् त्यायच्या पयल्या लेकराले मारले नाई, जवा असे झाले त्याले देवाने फसह सण म्हतलं.

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 10

येशू ख्रिस्त हा आमच्या फसह सणाचे मेंढरू हाय, त्याने कधी पाप केले नाई अन् तो पूर्णपणे निर्दोष हाय, अन् तो फसह सणाच्या दिवशी मेला, जो कोणी येशूवर विश्वास करते, तवा येशूचे रक्त त्याच्या पापाची किंमत चुकवते, हे असे हाय कि देव त्या माणसाले शिक्षा नाई देता ओलांडून समोर जाते.

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 11

देवाने इस्राएली लोकायच्या संग करार केला होता, कावून कि हे असे लोकं हायत, ज्यायले देवाने निवडले हाय, पण देवाने आता असा एक नवा करार केला, ह्या नव्या करारामुळे, कोणत्याही लोकसमुदायातील कोणीही येशूवरील विश्वासाद्वारे देवाची लेकरं होऊ शकतात.

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 12

मोशे एक असा भविष्यवक्ता हाय, ज्याने देवाच्या वचनाचा प्रचार मोठ्या सामर्थ्याने केला, पण येशू भविष्यवक्त्यायमध्ये एक महान हाय, म्हणून त्याने जे काई केले व बोलले ते देवाचे कार्य अन् शब्द होते, म्हणूनच येशूले देवाचा शब्द असे म्हणतात.

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 13

देवाने राजा दाविद संग प्रतिज्ञा केली होती, की राजाच्या रुपात त्याच्या वंशजांपैकीच एक जण देवाच्या लोकायवर सर्वकाळ राज्य करीन, येशू हा देवाचा पोरगा अन् ख्रिस्त हाय म्हणून तो राजा दाविदाचा एक वंशज हाय, जो नेहमी करिता राज्य करतो.

48. येशूचं प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय — चित्र 14

दाविद हा तर इस्राएल राजा होता, पण येशू हा सगळ्या जगाचा राजा हाय, तो परत येणार हाय, अन् आपल्या राज्यामध्ये न्यायाने व शांतीने सर्वकाळ राज्य करणार हाय.

बायबल कथाःउत्पत्ति 1-3, 6, 14, 22; निर्गम 12:20; 2 शमूवेल 7; इब्री 3:1-6; 4:14-5:10; 7:1-8:13, 9:11-10:18; प्रकटीकरण 21

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।