49. देवाचा नवा करार

49. देवाचा नवा करार — चित्र 1

एका देवदूताने मरियाले सांगतले कि तू देवाच्या पोराले जन्म देणार हायस, तवा ते कुमारीचं होती, पण ते पवित्र आत्म्याच्या व्दारे गर्भवती झाली, तवा तिने एका पोराले जन्म देला, ज्याचे नाव तिने येशू ठेवले, म्हणून येशू देव अन् माणूस दोन्ही पण हाय.

49. देवाचा नवा करार — चित्र 2

येशूने खूप सारे चमत्कार केले, जे हे दाखवतात कि तो देव हाय, तो पाण्यावर चालला, अन् वारावायद्नाले शांत केले, त्याने खूप साऱ्या बिमार लोकायले चांगले केले, अन् खूप साऱ्या लोकायतून भुते काढली, त्याने मेलेल्यायले जिवंत केले, त्याने पाच भाकरी अन् दोन मासोया मध्ये 5000 लोकायले पोट भर जेवू घातले.

49. देवाचा नवा करार — चित्र 3

येशू एक महान शिक्षक पण हाय, जे काई त्याने शिकवले, ते त्याने सिद्ध करून शिकवले हाय, जो तो लोकायले करायला लावतो, ते त्यायले करायला पायजे, कावून कि तो देवाचा पोरगा हाय, उदाहरण साठी त्याने शिकवले कि तुमाले दुसऱ्या लोकायवर पण तसेच प्रेम करायले पायजे, जसे तुमी स्वतावर प्रेम करता

49. देवाचा नवा करार — चित्र 4

त्याने असे सुद्धा शिकवले की तुमाले सगळ्या वस्तूपेक्षा संपत्तीपेक्षा देवावर अधिक प्रेम करायला पायजे.

49. देवाचा नवा करार — चित्र 5

येशूने म्हतलं की जगात सगळं काई मिळवण्यापेक्षाहि सर्वकाही आहे त्यापेक्षा देवाच्या राज्यात असणे, त्याच्या राज्यात तुमाले असणे खूप आवश्यक हाय, कि देव तुमाले तुमच्या पापापासून वाचवणार हाय.

49. देवाचा नवा करार — चित्र 6

येशूने म्हतलं कि काई लोकं त्याचा स्वीकार करतीन, तवा देव त्या लोकायले वाचवणार, पण दुसरे लोकं त्याले तिरस्कार करतीन, त्याने हे पण म्हतलं हाय, कि काई लोकं चांगल्या जमिनी सारखे हायत, कावून कि ते येशूच्या बाऱ्यात शुभ सुवार्था हे स्वीकार करतात, अन् देव त्यायचे तारण करतो, पण काई लोकं रस्त्याच्या कठीण जमिनीसारखे हायत, देवाचे वचन बिया सारखे रस्त्यावर पडते, पण तती ते उगत नाई, अशे लोकं येशूच्या संदेशाले अस्वीकार करतात, अन् ते त्याच्या राज्यात जायाले तयार होत नाईत.

49. देवाचा नवा करार — चित्र 7

येशूने शिकवले की देव पापी लोकायवर खूप प्रेम करतो, तो त्यायचे क्षमा करू इच्छितो अन् त्यायले आपले लेकरे बनवू इच्छितो.

49. देवाचा नवा करार — चित्र 8

येशूने हे पण सांगतले, देव पापाचा घृणा करतो, कावून कि आदम हवेने पाप केले म्हणून त्यायच्या सगळ्या वंशजायन पण पाप केले, या जगात रायणारा हरेक जन पाप करते, अन् तो व्यक्ती देवापासून दूर हाय, अन् हरेक जन हा देवाचा वैरी हाय.

49. देवाचा नवा करार — चित्र 9

पण देवाने जगातल्या हरेक माणसावर यवढे प्रेम केले, कि त्याने आपल्यासाठी एककुलत्या एक पोराले देले, यासाठी कि देव त्यायच्यावर दंड नाई पण जे त्याच्यावर विश्वास करतात, ते लोकं त्याच्या सोबत नेहमी साठी रायतीन.

49. देवाचा नवा करार — चित्र 10

तुमी मरणाच्या योग्य हा, कावून कि तुमी पाप केले हाय, देवाचा क्रोध तुमच्यावर यावयास हवा होता, पण त्याने तुमच्याऐवजी आपला क्रोध येशूवर ओतला, जवा येशू वधस्तंभावर मरण पावला, तवा त्याने तुमची शिक्षा स्वतःवर घेतली.

49. देवाचा नवा करार — चित्र 11

येशूने कधी पाप नाई केले, पण त्याने तुमच्या व जगातील हरेक माणसाच्या पापायची शिक्षा स्वतावर घेतली, व आपल्या मरणाने परिपूर्ण प्रायश्चित्त भरुन देले. येशूने दिलेल्या बलिदानामुळे, देव आपणांस आपल्या सगळ्या पापायची क्षमा करू शकतो.

49. देवाचा नवा करार — चित्र 12

जरी तुमी खूप सारे चांगले काम करता, पण देव त्याच्या व्दारे तुमाले वाचवणार नाई, त्याचे दोस्त बनवण्यासाठी अशे काईचं तुमच्या पासी नाई हाय, म्हणून तुमाले विश्वास करायला पायजे, कि येशू देवाचा पोरगा हाय, तो तुमच्या बदल्यात वधस्तंभावर मेला, अन् हे पण देवाने त्याले परत जिवंत केले, जर तुमी असा विश्वास करसान तर देव तुमच्या पापायले क्षमा करणार हाय.

49. देवाचा नवा करार — चित्र 13

देव त्या हरेकाले वाचवणार, जो येशूवर विश्वास करतो, अन् येशूले आपला प्रभू म्हणून मानतो, पण तो त्यायले नाई वाचवणार जे त्याच्यावर विश्वास करत नाईत, तुमी गरीब किंवा श्रीमंत या बाई माणूस या जवान किंवा बुढे असा किंवा तुमी कुठी रायता हे महत्त्वाचे नाई हाय, देव तुमच्यावर प्रेम करतो, त्याले वाटते कि तुमी येशूवर प्रेम करावे, त्याले तुमचा दोस्त व्हायचा हाय.

49. देवाचा नवा करार — चित्र 14

येशू तुमाले बलावत हाय, कि तुमी त्याच्यावर विश्वास कराव, अन् बाप्तिस्मा घेवावं, काय तुमी विश्वास करता, कि देवाचा एकूलता पोरगा येशू ख्रिस्त हाय?काय तुमी तुमी विश्वास करता कि तुमी एक पापी व्यक्ती हा, अन् देवाच्या व्दारे तुमाले दंड मिळण्याच्या योग्य हा? काय तुमी विश्वास करता कि तुमच्या पापासाठी येशू वधस्तंभावर मेला हाय?

49. देवाचा नवा करार — चित्र 15

जर तुमी येशूवर अन् जे त्याने तुमच्या साठी केले, काय तुमी त्याच्यावर विश्वास करता, कि तुमी एक ख्रिस्ती हा? सैतान आपल्या अंधारमय राज्यात आता तुमच्यावर राज्य करणार नाई, आता देव आपल्या ऊजीळाच्या राज्यात तुमच्यावर राज्य करणार हाय, त्याने तुमाले पाप करण्यापासून वाचवले हाय, जे तुमी करत होते, त्याने तुमाले एक नवीन चांगले जीवन देले हाय.

49. देवाचा नवा करार — चित्र 16

जर तुमी एक ख्रिस्ती हा, तर येशूने केलेल्या कामामुळे देवाने आपल्यायले क्षमा केली हाय, आता देव तुमाले शत्रू म्हणून नाई पण त्याचे दोस्त म्हणून जवळ करतो.

49. देवाचा नवा करार — चित्र 17

जर तुमी देवाचे दोस्त हा, अन् प्रभू येशूचे सेवक हा, तर तुमी त्या गोष्टीले मानाल जे येशूने शिकवली हाय, जरी तुमी ख्रिस्ती हा, सैतान आता पण तुमची पाप करण्यासाठी परीक्षा करतो, पण देव नेहमी ते करतो जे त्याले वाटते, तेच तो करतो, तो म्हणते कि जर तुमी तुमच्या पापाले मानाल, तर तो तुमाले क्षमा करणार, तो तुमाले पापाच्या विरुद्ध लढण्यासाठी सामर्थ देणार.

49. देवाचा नवा करार — चित्र 18

देव तुमाले प्रार्थना करण्यास, अन् त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यास, इतर ख्रिस्ती लोकायच्या सोबत त्याची आराधना करण्यास व त्याने तुमच्यासाठी काय केले हाय, इतरांना सांगण्यास सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याले देवाबरोबर सखोल नातेसंबंध ठेवण्यास मदत करतात.

बायबल कथाःरोम 3:21-26; 5:1-11; योहान 3:16; मार्क 16:16; कलसै 1:13-14; 2 करिंथ 5:17-21; योहान 1:5-10

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।