50. येशूचे वापस येणे
सुमारे 2000 वर्षांपासून सगळ्या जगात अधिका-अधिक लोकं येशू ख्रिस्ताची सुवार्था आयकत होते, मंडळीची वाढ होत हाय, येशूने वायदा देला की तो युगाच्या शेवटी परत या पृथ्वीवर येणार हाय, जरी तो आजून आला नाई हाय, तरी तो आपल्या वायद्याले पूर्ण करीन.
आपण येशूच्या येण्याची वाट पायत हावो, देवाची अशीचं इच्छा हाय की आपण पवित्र अन् त्याचा आदर करणारे जीवन जगावे, जे पवित्र हायत, अन् जे त्याच्या आदर करतात, जवा येशू पृथ्वीवर रायत होता, तवा त्याने म्हतलं, कि “माह्याले शिष्य सगळ्या जगात जाऊन लोकायले देवाच्या राज्याच्या बाऱ्यात शुभ संदेश प्रचार करतीन, अन् तवा शेवट येणार.”
खूप साऱ्या जातीच्या लोकायन आजू पण येशूच्या बाऱ्यात आयकले नाई, स्वर्गात वापस जाण्याच्या पयले, येशूने ख्रिस्ती लोकायले म्हतलं, कि ज्या लोकायन सुवार्था आयकली नाई अशा लोकायले सुवार्था सांगा, त्याने म्हतलं, “जा अन् सगळ्या जातीच्या लोकायले शिष्य बनवा” कावून कि आता कापणीसाठी वावरातले धान तयार झाले हाय.”
येशूने हे पण म्हतलं, “कोण्या माणसाचा सेवक आपल्या मालकापेक्षा मोठा नाई होतं, या जगातल्या लोकायन माह्या तिरस्कार केला, यामुळे ते तुमाले पण सतावतीन, अन् मारतीन, या जगात तुमाले सताव रायणार, प मजबूत बना, कावून कि मी सैतानाले हारवले हाय, जो या जगावर शासन करते, जर तुमी आखरी परेंत माह्याल्या विश्वासात स्थिर रायसान, तवा देव तुमाले वाचवणार हाय.
येशूने आपल्या शिष्यायले हे समजण्यासाठी एक गोष्ट सांगतली, जवा जगाचा शेवट होतो, तवा लोकायच्या सोबत काय होणार, त्याने म्हतलं, “कोण्या माणसाने आपल्या वावरात चांगल्या बिया पेरल्या, जवा तो झोपला होता, तवा त्याचा शत्रू आला, अन् त्याने गव्हाच्या चांगल्या बियामध्ये जंगली बिया पेरल्या, अन् तो चालला गेला.
जवा त्या बियाले अंकुर फुटू लागले, तवा त्याच्या सेवकायन त्या मालकाले म्हतलं, हे स्वामी तुमी तर आपल्या वावरात चांगल्या बिया पेरल्या होत्या, पण यामध्ये जंगली झाडे कशे हायत? तवा त्या मालकाने उत्तर देले, फक्त माह्याले शत्रूचं हे पेरू शकतात, हा माह्याला कोणता तरी शत्रू हाय ज्याने हे पेरले असावे.
तवा त्याच्या सेवकायन आपल्या मालकाले म्हतलं, “काय आमी हे जंगली झाडे उपटून टाकू? तवा मालकाने म्हतलं नाई, जर तुमी अशे करसान तर काई गव्हाचे झाडे पण उपटून टाकसान, कापणी परेंत वाट पाहा, मंग जंगली झाडायले गड्यात एकत्र करा मंग तुमी ते जाळू शकता, पण गव्हाले माह्या कोठारामध्ये साठवून ठेवा.”
शिष्यायले हे गोष्ट समजली नाई, म्हणून त्यायनं येशूले परत समजावून सांगायले विनंती केली, येशू म्हतलं, “ज्याने चांगल्या बिया पेरल्या हायत, तो व्यक्ती ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करते, अन् वावर जगाचे प्रतिनिधित्व करते, चांगल्या बिया देवाच्या राज्यातील लोकायचे प्रतिनिधित्व करते.”
“जंगली बिया हे त्या सैतानाचे प्रतिनिधित्व करते, त्या माणसाचा शत्रू सैतानाचे प्रतिनिधित्व करते, ज्याने जंगली बिया पेरल्या हायत, अन् कापणी या जगाच्या अंताची प्रतिनिधित्व करते, अन् कापणी करणारे हे देवाच्या देवदूतायचे प्रतिनिधित्व करते हाय.”
“जवा जगाचा शेवट होईन, तवा देवदूत त्या सगळ्या लोकायले एकत्र करीन, जे सैतानाचे हायत, त्यायले देवदूत खूप गरम आगीत फेकून देतीन, तती लोकायले खूप त्रास होईन, अन् ते रडतीन, अन् दात खाणे असे करती, पण जे धर्मी लोकं हायत, ज्यायनं येशूचे अनुकरण केले, ते लोकं देवाच्या राज्यात सूर्या सारखे चमकतीन.”
येशूने हे पण म्हतलं, या जगाचा अंत होण्यापूर्वी तो या पृथ्वीवर परत येईल, जसा तो स्वर्गात गेला तसाच तो परत वापस येईन, तवा त्याच्या पासी एक वास्तविक शरीर असणार, अन् तो अभायातून ढगावर बसून येणार, जवा येशू वापस येतो, तवा जे ख्रिस्ती लोकं मेलेले हायत, ते परत जिवंत होतीन, तवा ते लोकं त्याला अभायात भेटतीन.
तवा जिवंत असलेले ख्रिस्ती लोकं ते अभायात उचलल्या जातीन, अन् ते त्या ख्रिस्ती लोकायबरोबर सहभागी होतीन जे मेलेल्यातून जिवंत झाले हायत, ते सगळे येशूच्या सोबत रायतीन, त्याच्यानंतर येशू आपल्या लोकायबरोबर रायणार, जवा ते सोबत रायतीन, तवा त्यायले नेहमी शांती मिळणार हाय.
येशूने आपणावर विश्वास करणाऱ्यायले हरेक जनाले एक मुकुट देण्याचे आश्वासन देले हाय, ते नेहमी साठी देवाच्या सोबत हरेक वस्तूवर शासन करतीन, त्यायच्या पासी सिद्ध शांती असणार हाय.
पण देव त्या सगळ्यायचा न्याय करणार, जो येशूवर विश्वास करत नाई, तो त्यायले नरकात टाकीन, तती ते रडतीन अन् दात खातीन, अन् नेहमी त्यायले त्रास रायणार हाय, कधी न इजनारी आग त्यायले जाळून टाकीन, अन् किडे त्यायले नेहमी खात रायतीन.
जवा येशू परत येईन, तवा तो पूर्णपणे सैतानाच्या राज्याले नाश करून टाकीन, तो सैतानाले नरकात टाकीन, तती सैतान नेहमी साठी जळत राईन, त्या सगळ्याय संग ज्यायनं देवाच्या आज्ञेने मानण्यापेक्षा त्यायनं सैतानाच्या मांग जायाचा निश्चय केला.
कावून कि आदाम अन् हवेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे पाप ह्या जगात आले, तवा देवाने त्यायले श्राप देला, अन् त्यायले नाश करण्याचा निश्चय केला, पण एक दिवस देव परिपूर्ण असे नवीन अभाय अन् नवीन पृथ्वी बनवणार हाय.
येशू अन् त्याचे लोकं नवीन पृथ्वीवर रायतीन, अन् तो नेहमी साठी सगळ्या वस्तूवर राज्य करणार, तो लोकायच्या डोयातले आसू पुसणार, आता कोणी पण दुखी रायणार नाई, ते रडतीन नाई, ते बिमार होतीन नाई, ते मरतीन नाई अन् तती काई पण वाईट होणार नाई. येशू आपल्या राज्यावर न्यायाने अन् शांतीने शासन करणार, तो नेहमी साठी आपल्या लोकायच्या बरोबर रायणार हाय.
बायबल कथाःमत्तय 24:14; 28:18; योहान 15:20, 16:33; प्रकटीकरण 2:10; मत्तय 13:24-30, 36-42; 1 थेस्सल 4:13-5:11; याकोब 1:12; मत्तय 22:13; प्रकटीकरण 20:10, 21:1-22:21
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।