11. वल्हांडण ना सण

11. वल्हांडण ना सण — चित्र 1

परमेश्वर नि फारो राजा ले सांग, जर कदी तो इस्राएल देश ना लोकस्ले जावू देवाव नई, त परमेश्वर मिसर देश मधला पहिला जल्म ले एयेल माणुस ले व प्राणी ले मारी टाकीन. तव फारो राजा नि आयक तरी बी तेनावर काहीच परिणाम नई पळणा आणि तेनी इस्राएल देश ना लोकस्ले सोळ नई.

11. वल्हांडण ना सण — चित्र 2

जो कोणी परमेश्वर वर विश्वास ठेवीन तेना घर मधला पहिला जल्म लीयेल ले वाचाळासाठे परमेश्वर नि रस्ता काळा. प्रत्येक परिवार ले एक निष्कलंक कोकरू निवाळन होत आणि तेले अर्पण करण होत.

11. वल्हांडण ना सण — चित्र 3

परमेश्वर नि इस्राएल देश ना लोकस्ले सांग कि तेस्नी कोकरा ना काही रक्त तेस्ना घर ना दारस्ना चौखट वर लावोत, आणि तेस्ना मांस विस्तोवर भूजीसन बिगर खमीर नि भाकर आणि कळू भाजी बरोबर लवकर-लवकर खावोत. तेनी तेस्ले जेवण होवावर मिसर देश ले सोळाले तयार ऱ्हायज्यात अस बी सांग.

11. वल्हांडण ना सण — चित्र 4

परमेश्वर ना सांगा प्रमाणे इस्राएल ना लोकस्नी सर्वी तयारी करी. आर्धी रात ले, परमेश्वर नि जाईसन मिसर मधला प्रत्येक परिवार मधला पहिला जल्म लीयेल पुत्र ले मारी टाक.

11. वल्हांडण ना सण — चित्र 5

इस्राएल देश ना लोकस्ना घर ना चौखट वर कोकरा ना रक्त राहा मुळे परमेश्वर त्या घरस्ले वंडालीसन ग्या. त्या घर मधला सर्वा झन सुरक्षित होतात. कोकरा ना रक्त मुळे त्या वाचेल होतात.

11. वल्हांडण ना सण — चित्र 6

पण मिसर देश ना लोकस्नी परमेश्वर विश्वास नई ठेव व तेन्या आज्ञास्ले नई मान. म्हणून परमेश्वर नि तेस्ना घरास्ले वंडाल नई. परमेश्वर नि मिसर देश मधला प्रत्येक पहिला जल्मेल ले मारी टाक.

11. वल्हांडण ना सण — चित्र 7

बंदीगृह मधला पहिला जल्मेल पोऱ्या पासून त फारो राजा ना घर मधला पहिला जल्मेल पोऱ्या लगून प्रत्येक मिसर देश ना माणुस मरणा. मिसर देश मधला गैरा लोक गैरा दुखी हुईसन रळत आणि विव्हळत होतात.

11. वल्हांडण ना सण — चित्र 8

त्याच रात ले, फारो राजा नि मोशे आणि अहरोन ले बलाई सन सांग, “इस्राएल देश ना लोकस्ले लिसन लगेच मिसर देश सोळा व आपला परमेश्वर नि भक्ती करा. मिसर देश ना लोकस्नी बी इस्राएल देश ना लोकस्ले मिसर देश सोळानी विनंती करी.

बायबल नि गोष्ट: निर्गम 11:1-12:32

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।