13. परमेश्वर ना इस्राएल देश ना लोकस संगे करार
तांबडा समुद्र पार करा नंतर, परमेश्वर इस्राएल देश ना लोकस्ले जंगल मधून सीनाय पर्वत कळे ली ग्या. जठे मोशे नि चेटता झुडूप देखेल होता, तो हवूच पर्वत होता. लोकस्नी पर्वत ना पायथा जोळे आपला तंबू ठोकात.
परमेश्वर नि मोशे आणि इस्राएल देश ना लोकस्ले सांग, “जर कदी तुमी मनी आज्ञा आणि करार ले पायश्यात त तुमी मना खास निवाळेल लोक होश्यात. राजकीय पुजारीझन व पवित्र राष्ट्र सारखा होश्यात.”
तिसरा दिन, लोकस्नी आत्मिक तयारी होवा नंतर, जव परमेश्वर सिनाय पर्वतवरूना तव मेघगर्जना, वीज ना प्रचंड प्रकाश, धुक्कय, आणि गैरा शिंगस्ना नांद ना संगे उतरना, आणि पर्वतवर जावानी परवानगी फक्त मोशेलेच होती.
मंग परमेश्वर नि तेस्ले बी वचन दिध, “मी यहोवा, तुमना परमेश्वर शे, जेनी तुमले मिसर देश ना गुलामी मधून बाहेर काळ, तुमी बाकी दुसरा देवतास्नी पूजा नका करज्यात.”
“आपला साठे हात कण मुर्ती तयार नका करा आणि तिना पाया नका पळा, कारण कि मी, यहोवा, तुना परमेश्वर ईर्षावान परमेश्वर शे. तुमना नाव वायबार नको लेयजो. शब्बाथ दिन नि आठवण ठियसन तेले पवित्रता पायजो. म्हणजे सहा दिन तू सर्वा काम कर व सातवा दिन तुना आराम ना दिन व मले आठवण ना कराना दिन म्हनिसन पाय.”
“आपला बाप आणि आपली माय ना मान ठेव. तू खून नको करजो. तू चोरी नको करजो. तू खोटी साक्ष देयजो नको (खोट नको बोलजो.) तू आपला शेजारी ना बायको ना, तेना घर ना, व तेना कोणता बी गोष्ट ना लोभ नको करजो.”
मंग परमेश्वर नि ह्या दाहा आज्ञा दघळस्ना दोन पाट्यास्वर लीखीसन मोशे ले दिधा. परमेश्वर नि तेस्ले पाया साठे गैरा नियम व विध्या बी दिधात. जर कदी तेस्नी ह्या सर्वा नियम पायात, त परमेश्वर नि तेस्ले आशीर्वाद आणि संरक्षण देवाना अभिवचन दिधा. आणि जर कदी तेस्नी तेले नई पालन कर, त परमेश्वर तेस्ले दंड दिन.
परमेश्वर नि इस्राएल देश ना लोकस्ले तेस्ना साठे एक मंडप बनावासाठे क्रमानुसार माहिती दिधी. जेले निवास मंडप सांगतस, जेनामा दोन खोल्या होत्यात आणि तेस्ले दोन भाग मा वाटणार एक मोठा परदा होता. परदा नि मांगली खोलीमा फक्त महापुजारीलेच जावानी परवानगी होती कारण कि तठे परमेश्वर ना वास होता.
परमेश्वर नि आज्ञा ले नई पालन करणार प्रत्येक झन निवास मंडप ना समोर नि वेदीवर परमेश्वर ले होमार्पण करत होतात. त्या पशु ना रक्त ना द्वारे त्या व्यक्ती ना पाप माफ हुई जात होतात आणि तो व्यक्ती परमेश्वर नि नजर मा शुध्द ठरत होतात. मोशे ना भावू अहरोन आणि अहरोन ना संतानस्ले परमेश्वर नि आपला पुजारी म्हनिसन निवाळ.
परमेश्वर ना दियेल आज्ञास्ले पालन करा साठे आणि फक्त तेनीच स्तुती करीसन तेना खास लोक होवा साठे सहमत हुईनात. पण परमेश्वर ले आज्ञा पालन ना वचन देवानंतर थोळाच दिनस्मा तेस्नी भयानक पाप कर.
गैरा दिनस लगून, मोशे सिनाय पर्वत ना शिखरवर परमेश्वर संगे बोलत ऱ्हायना, आणि लोक्सले तेनी वाट देखत-देखत कंटाया ईग्या. म्हणून तेस्नी सोन लईसन तेनी मुर्ति बनावासाठे त्या अहरोन ले दिध.
अहरोन नि त्या सोना कण एक वासरु ना सारखी मुर्ती बनावी. लोक बेभान हुईसन तेनी पूजा करू लागनात आणि त्या मुर्ती ले यज्ञ करू लागनात. तेस्ना पाप मुळे परमेश्वर ले तेस्नावर राग उना व तेनी तेस्ना नाश करान ठराव.
पण मोशे नि तेस्ना साठे प्रार्थना करी व परमेश्वर नि तेस्नी प्रार्थना आयकी आणि तेस्ले नाश नई कर. मोशे नि परत दहा आज्ञा लिखा साठे दघळ ना दोन नवीन पट्ट्या बनाव्यात कारण कि पहिल्या पाट्या तेनी फोळी टाकेल होतात.
मंग तेनी त्या मुर्ती ले कुटीसन चुरा करा, तेले तेनी पाणी मा टाक व लोक्स्ले ते पाणी पेवाले दिध. परमेश्वर नि लोकस्वर भयानक पिळा धाळी व तेस्ना मधून बराच मानस तेनामा मरी ग्यात.
मोशे परत पर्वत वर चळना व तेनी लोकस्ना क्षमासाठे परमेश्वर कळे प्रार्थना करी, परमेश्वर नि मोश न आयक व तेस्ले माफ कर. मोशे दहा आज्ञा लिखेल नवीन पाट्या लिसन पर्वत वरून खाले उतरस. मंग परमेश्वर नि सिनाय पर्वत पासून वचनदत्त देश कळे जावाले लोकस्ना मार्गदर्शन कर.
बायबल नि गोष्ट: निर्गम 19-34
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।