2. पाप न जग मा येन
परमेश्वर नि बनायेल सुंदर बगीचा मा आदाम आणि तेनी बायको ह्या दोन्ही गैरा खुशी मा होतात, त्या दोन्ही बिगर कपळा ना होतात, पण तेस्ले लाज वाटत नई होती, कारण कि त्या टाईम ले पाप जग मा नई होत. त्या दोन्ही कायम बगीचा मा परमेश्वर ना बरोबर फिरेत आणि बोलेत.
पण त्या बगीचा मा एक चालाक साप होता. तेनी बाई ले सांग, “काय तुमले बगीचा ना कोणता बी फय ले खावा साठे परमेश्वर नि मना करेल शे हय खर शे का?”
बाई नि उत्तर दिध, “बगीचा ना कोणता बी फय खावानी आमले सूट शे फक्त बरावाईट ना ज्ञान करीसन देणार झाळ ना फय खावाले मना शे. परमेश्वर नि सांगेल शे, कदी तुमी खाशात व तेले हात जरी लावशात, तरी बी मरशात.”
साप नि बाई ले सांग, “हय खोट शे! तुमी खरज नई मरावत. परमेश्वर ले माहिती शे कि हय फय खावा नंतर, तुमले तेना सारखच बरावाईट ना ज्ञान हुई जाईन.”
बाई नि देख कि ते फय खावाले चांगल आणि दिखाले सुंदर शे. तिले हुशार बी होण होत, म्हणून तिनी काही फयस्ले तोळ आणि खाद. नंतर तिनी काही फय आपला नवरा ले बी खावाले दिधात, आणि तेनी बी त्या फयस्ले खाद.
अचानक, तेस्ना डोया उघळनात आणि तेस्ले समजन कि त्या बिगर कपळा ना शेतस. मंग तेस्नी झाळस्ना पानस्ले शिविसन आपला आंग ले झाका साठे कपळा तयार करात.
मंग परमेश्वर बाप बगीचा मा उना असा आवाज आदाम आणि तेनी बायको ले उना. त्या दोन्ही परमेश्वर ले देखीसन लपनात, नंतर परमेश्वर नि आदाम ले सांग, “तू कोठे शे?” आदाम नि उत्तर दिधा, “तुना बगीचा मा चालाना आवाज आयकीसन मी घाबरी ग्यू, कारण कि मी नागा शे आणि म्हणून मी लपेल शे.”
मंग परमेश्वर नि विचार, “तू नागा शे हय तुले कोणी सांग? मनी मना करेल फय तुनी खाद का?” आदाम नि उत्तर दिधा, “तुनी मले हय बाई दिधी, आणि तिनी ह्या फय मले दिधात.” मंग परमेश्वर नि बाई ले सांग, “तुनी हय काय कर?” बाई नि उत्तर दिध, “साप नि मले फसाळ.”
परमेश्वर नि साप ले सांग, “तू श्रापित हुई जायेल शे! तू आपला पोट ले घसरत चालशीन आणि माती खाशीन आणि मी तुना व बाई ना मधमा द्वेषभाव उत्पन्न करसू आणि तुना व बाई ना संतती मा बी मी द्वेषभाव उत्पन्न करसू. बाई ना संतान तुना डोका ले ठेचतीन आणि तू तेस्ना पाय ना टाच ले फोळशीन.”
नंतर परमेश्वर नि बाई ले सांग, “तू गैरा त्रास कण पोरस्ले जल्म देशीन अस मी करसू. तरी बी तुना मन तुना नवरा कळे राहीन आणि तो तुना वर अधिकार चालाईन.”
परमेश्वर नि माणुस ले सांग, “तुनी आपली बाई न आयक आणि मनी आज्ञा ले मोळ म्हणून जमीन श्रापित हुई जायेल शे, आते तुले कष्ट करीसनच भाकर भेटीन, तू मरशीन आणि तुना शरीर माती मा मिई जाईन.” आदाम नि तिनी बायको ना नाव हव्वा ठेव जेना अर्थ “जल्मदात्री” कारण कि तिना द्वारेच सर्वा मानस जल्म ले उनात. मंग परमेश्वर नि आदाम व हव्वा ले चमळा ना कपळा बनाई सन घालात.
मंग परमेश्वर नि सांग, “आते माणुसजीव आपला सारखा हुई जायेल शे. तेले बरावाईट ना ज्ञान हुई जायेल शे, तेस्ले जीवन ना झाळ ना फय खावू दिसन तेस्ले कायम जगू नई देवाले पाहिजे.” म्हणून परमेश्वर नि आदाम आणि हव्वा ले सुंदर बगीचा मधून हाकाली दिध. परमेश्वर नि त्या बगीचा ना आजू-बाजू ले सामर्थ्यशाली देवदूतस्ना पहारा ठेवा, कि कोणी बी त्या झाळ ना फय नई खावो.
बायबल नि गोष्ट: उत्पत्ति 3
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।