20. पाडाव आणि सुटका
इस्राएल देश ना राज्य व यहूदा ना राज्य ह्या दोन्हीस्नी परमेश्वर ना विरुध्द पाप कर. परमेश्वर नि तेस्ना संगे सिनाय पर्वत वर करेल करार तेस्नी मोळ. परमेश्वर त्या पश्चाताप करोत आणि परमेश्वर कळे परत फिरोत म्हणून भविष्यद्वक्तास्ले धाळ, पण तेस्नी आज्ञा मानाले नकार.
म्हणून परमेश्वर नि त्या दोन्ही राज्यास्ले शिक्षा दिधी, तेस्ना शत्रूस्ले तेस्ना नाश करू दिधा. अश्शूर ह्या द्रुष्ट व शक्तिशाली देश नि इस्राएल देश ना नाश करा. अश्शूरी लोकस्नी इस्राएल देश ना गैरा लोकस्ले मारी टाक, किमती वस्तुस्नी लुटालूट करी व देश ना बराच भाग चेटाळी टाका.
अश्शूरी लोकस्नी सर्वा नेतास्ले, मालदारस्ले व चांगला कारागीरस्ले एकत्र करीसन आपला देश मा लीचालना ग्यात. फक्त गैरा गरीब इस्राएल देश ना लोक ज्या युद्ध मा नई मरणात, त्याच इस्राएल देश मा शिल्लक ऱ्हायनात.
तव अश्शूरस्नी इस्राएल देश ना जागावर दुसरा देश ना लोकस्ले राहासाठे लय. दुसरा देश वालास्नी नाश हुयेल शहरस्ना परत बांधकाम कर व इस्राएल देश ना बायास संगे लगन कर इस्राएल देश ना लोकस्नी वंश मधला ज्या लोकस्नी दुसरा देश ना बायास संगे लगन कर तेस्ले शोमरोनी म्हनामा ऊन.
यहूदा राज्य मधला लोकस्नी देख कि, इस्राएल देश ना राज्य मधला लोकस्ले अविश्वास व आज्ञा मोळा मुळे परमेश्वर नि असाप्रकारे दंडित करेल शे. पण तरी बी तेस्नी मुर्तीपुजा करी व कनानी देवतास्नी बी पूजा करी. परमेश्वर नि ईशारा देवासाठे तेस्ना कळे भविष्यद्वक्तास्ले धाळ, पण तेस्नी तेस्न नई आयक.
सुमारे 100 वरीस नंतर जव अश्शूरस्नी इस्राएल राज्य ना नाश करा, तव परमेश्वर नि यहूदा ना राज्य वर हल्ला करासाठे नबूखद्नेस्सर ह्या बाबेल ना राजा ले धाळ. बाबेल हय शक्तिशाली देश होत. यहूदा ना राजा नबूखद्नेस्सर नां सेवक बनाले तयार हुईग्या व दरवरीस ले जास्त पैसा देवाले बी तयार हुईग्या.
पण काही वरीस नंतर यहूदा ना राजा नि बाबेल ना विरुद्ध विद्रोह कर. म्हणून बाबेल ना लोकस्नी परत ईसन यहूदा ना राज्य वर चढाई करी. तेस्नी यरुशलेम शहर ताबामा लिध, मंदिर ना नाश कर व शहरमधली आणि मंदिर मधली सर्वी संपत्ती ली चालना ग्यात.
यहूदा ना राजा ना ह्या विद्रोह मुळे शासन म्हनिसन नबूखद्नेस्सर ना सैनिकस्नी यहूदा ना राजा ना पोरस्ना तेना समोर वध करी टाक व यहूदा ना राजा ना डोया फोळी सन तेले अंधा करी टाक. त्या नंतर तेस्नी तेले मरासाठे बाबेल ना बंदीगृह मा ठेव.
नबूखद्नेस्सर व तेना सैनिकस्नी यहूदा ना राज्य मधल जवळ-जवळ सर्वाच लोकस्ले बाबेल मा लय फक्त गैरा गरीब इस्राएल देश ना लोकस्लेच शेती करासाठे तठे ठेव. ह्याच टाईम ले जव परमेश्वर ना लोकस्ले वचनदत्त देश सोळीसन जावासाठे जबरजस्ती करामा उणी, तेले पाडाव-हद्दपारी अस सांगतस.
जरी परमेश्वर नि आपला लोकस्ना तेस्ना पाप मुळे तेस्ना पाडाव होवू दिधा तरी बी तो तेस्ना व तेनी दियेल वचन ले विसर नई. परमेश्वर नि आपला लोकस्वर कृपादृष्टी होती व भविष्यद्वक्तास्ना द्वारे तो तेस्ना संगे बोलत होता. तेनी तेस्ले आश्वासन दिध कि, सत्तर वरीस नंतर तो तेस्ले परत वचनदत्त देश मा परत लईन.
त्या नंतर सुमारे सत्तर वरीस मा पारसा ना राजा कोरेश नि बाबेल ले हाराव बाबेल ना राज्य ना जागावर पारसा ना राज्य ऊन. इस्राएल देश ना लोक आते यहूदी या नाव कण ओयखामा येवू लागनात व तेस्ना मधून गैरा लोक आपल पूर आयुष्यभर बाबेलमाच ऱ्हायनात. फक्त थोळासाच माथारा यहूदीस्लेच यहूदी राज्य नी आठवण होती.
पारसा ना साम्राज्य शक्तिशाली होत, पण तेस्नी हारायेल लोकस्ना प्रती त्या दयाळू होतात. कोरेश पारसा ना राजा होवा नंतर तेनी लगेच फरमान काळ कि जर कदी कोणी यहूदी यहूदा मा परत जावाना देखस त तेले तस करानी परवानगी शे. तेनी तेस्ले मंदिर ना परत बांधकाम करासाठे पैसा बी पुरावात. ह्या प्रकारे सत्तर वरीस ना हद्दपारी समाप्त करीसन सहूदास्ना धाकला समूह यहूदा मधला यरुशलेम शहर ले परत उना.
यरुशलेम मा येवा नंतर तेस्नी मंदिर ना परत बांधकाम कर व शहरस्ना भिंतीस्ले परत बांध. जरी आते बी त्या दुसरा लोकस्ना सत्ता मा होतात, तरी आते परत परत एक सावा वचनदत्त देश मा राहू लागनात व मंदिर मा परमेश्वर नि स्तुती करू लागनात.
बायबल नि गोष्ट: राजे 17; 24-25 ; 2 इतिहास 36; एज्रा 1 - 10; नहेम्या 1 : 13
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।