21. परमेश्वर मसिहा ले धाळाना अभिवचन देस
पहिले पासूनच, परमेश्वर नि मसीहा ले धाळानी योजना बनायेल होती. मसीहा ना संबंध मा अभिवचन सर्वास्तून पहिले आदाम व हव्वा एस्ना पा उना. परमेश्वर नि वचन दिध कि हव्वा ले जे संतान हुईन त्या साप ना डोक फोळतीन. ज्या साप नि हव्वा ले फसाळेल होत तो सैतान होता. ह्या अभिवचन ना अर्थ हय होत कि मसीहा सैतान ले पूर्णपणे हाराई टाकीन.
परमेश्वर नि अब्राहाम ले अस वचन दिध कि तेना द्वारे जग मधला सर्वा कुळ आशीर्वादित होतीन. पुळे भविष्य मा मसीहा ले येवा नंतर ह्या अभिवन नि पूर्णता होणार होती. तो प्रत्येक राष्ट्र मधला प्रत्येक गट मधला लोकस्ना तारण होण शक्य करीन.
परमेश्वर नि मोशे ले वचन दियेल होत कि भविष्य मा तो मोशे सारखा एक भविष्यद्वक्ता तयार करीन. हय मसीहा ना बारामा दुसरा अभिवचन होत. जे काही काळ ना नंतर पूर होणार होत.
परमेश्वर नि दाविद राजा ले अभिवचन दिध कि तेनाच वंश मधला एक झन परमेश्वर ना लोकस्वर कायम राज्य करीन. तेना अर्थ असा होता कि मसीहा हवू दाविद ना परिवार मा जल्म ले येणार होता.
यिर्मया भविष्यद्वक्ता ना द्वारे, परमेश्वर नि वचन दिध कि तो एक नवा करार करणार शे, पण तो सिनाय पर्वत वर इस्राएल देश ना लोकस संगे करेल करार सारखा नई राहाव नवा करार मा परमेश्वर आपला आज्ञास्ले मानसस्ना हृदयवर लीखीन, लोक परमेश्वर ले व्यक्तिगत पणे ओयखतीन, त्या तेना लोक होतीन आणि परमेश्वर तेस्ना अपराधस्ले माप करीन. मसीहा ह्या नवा करार नी सुरुवात करीन.
परमेश्वर ना भविष्यद्वक्तास्नी बी सांगेल होत कि मसीहा हवू एक भविष्यद्वक्ता, पुजारी, आणि राजा राहीन. भविष्यद्वक्ता हवू एक असा माणुस ऱ्हास कि जो परमेश्वर ना संदेश ले आयकीसन तो लोकस्ले सांगस. परमेश्वर नि दियेल अभिवचन मसीहा हवू एक परिपूर्ण भविष्यद्वक्ता राहीन.
इस्राएली पुजारी लोकस्नी करेल पापस्ना शिक्षास्ना प्रायश्चित म्हनिसन परमेश्वर ले होमार्पण करत होतात. पुजारी लोकस्ना साठे परमेश्वर ले प्रार्थना बी करत होतात. मसीहा हवू एक परिपूर्ण महा पुजारी राहाणार होता जो परमेश्वर ले स्वता ना परिपूर्ण बलिदान करणार होता.
राजा म्हणजे जो लोकस्वर राज्य करस व तेस्ना न्याय करस. आपला पुवज दाविद ना सिंहासन वर मसीहा हवू एक परिपूर्ण राजा राहीन. तो पुरा जग वर कायम राज्य करीन, आणि प्रामाणिक पणा कण न्याय करीन व योग्य निर्णय लीन.
परमेश्वर ना भविष्यद्वक्तास्नी मसीहा ना बारामा गैरा दुसरा गोष्टी पहिलेच सांगी ठीयेल होत्यात. मलाखी भविष्यद्वक्ता नि भविष्यद्वाणी करेल होती कि मसीहा येवाना पहिले एक महान भविष्यद्वक्ता ईन. यशया भविष्यद्वक्ता नि भविष्यद्वाणी करी कि हवू एक कुवारी ना पोट ले जल्म लीन. मिखा भविष्यद्वक्ता नि सांग कि मसीहा बेथलेहेम गाव मा जल्म ले ईन.
यशया भविष्यद्वक्ता नि सांग कि मसीहा गालील मा राहीन, निराशा मा राहणार लोकस्ना सांत्वना करीन. व बंदिवानस्ले सोळाईसन स्वतंत्रता नि घोषणा करीन. तेनी हय बी सांग कि मसीहा आजारी, अंधा, मुक्का, बहिरा व लंगळास्ले बरा करीन.
यशया भविष्यद्वक्ता नि हय बी स्पष्ट कर कि मसीहा ना बिनकाम ना द्वेष करामा ईन व तेना नकार करामा ईन. दुसरा भविष्यद्वक्तास्नी पहिलेच सांगी ठेव कि मसीहा ले मारणार लोक तेना कपळा वाटीलेवा साठे चिठ्या टाकतीन आणि मसीहा ना एक मित्रच तेना विश्वासघात करीन करीन. जखऱ्या भविष्यद्वक्ता नि पहिलेच सांगी ठीयेल होत कि मसीहा ना विश्वासघात करासाठे तेना मित्र ले दाम म्हनिसन चांदीना तीस नाना देवामा येतीन.
भविष्यद्वक्तास्नी मसीहा कोणत्या प्रकारे मरीन एना बारामा मा बी भविष्यद्वाणी करेल होती. यशया नि भविष्यद्वाणी करेल होती कि लोक मसीहा वर ठुकतीन, तेनी निंदा करतीन व तेले फटका मारतीन. जरी बी तेनी काहीच वाईट नई करेल होत, तरी बी तेले खिया ठोकीसन भयानक वेदना कण पीळादायक मोत मारतीन.
भविष्यद्वक्तास्नी हय बी सांग कि मसीहा परिपूर्ण व निष्पाप राहीन. तो सर्वा लोकस्ना पापस्ना प्रायश्चित म्हनिसन मरीन. तेले भेटील शिक्षा माणुस आणि परमेश्वर ना मधमा सामंजस्य उत्पन्न करीन. ह्या मुळे मसीहानीच ठेच होवो हईच परमेश्वर नि इच्छा होती.
भविष्यद्वतास्नी भविष्यद्वाणी करी कि मसीहा मरीन आणि परमेश्वर तेले परत जित्ता बी करीन. मसीहा नि मृत्यु आणि पुनरुत्थानाद्वारे परमेश्वर आणि योजना पुरी करीन.
परमेश्वर नि भविष्यद्वतास्ले मसीहा ना बारामा बराच गोष्टीस्ले प्रगट कर, पण त्या भविष्यद्वतास्ना पैकी कोणाच काय मा मसीहा नई उना. शेवट नि भविष्यद्वाणी नंतर सुमारे 400 वरीस मा बरोबर योग्य टाईम येवा नंतर परमेश्वर नि मसीहा ले या जग मा धाळ.
बायबल नि गोष्ट :उत्पत्ति 3:15; 12: 1 -3; अनुवाद 18:15; 2 शमूवेल 7; यिर्मया 31; यशया 59:16; दानिएल7; मलाखी 4 : 5; यशया 7:147; मीखा 5 : 2; यशया 9:1-7; 35 : 3-5; 61; 53; स्तोत्र 22 : 18; 35 : 19; 69 : 4; 41 : 9 जख-या 11 : 12 - 13; यशया 50 : 6; स्तोत्र 16 : 10-11
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।