36. येशूचे रुपांतर
एक दिन, येशु नि आपला शिष्य पेत्र, याकोब, व योहान ह्या तीनिस्ले आपला संगे लिध. (योहान नाव ना शिष्य व जेनी येशु ले बाप्तिस्मा दियेल होता त्या दोन्ही एकच व्यक्ती नईत.) त्या प्रार्थना करासाठे उच्चा डोंगर वर ग्यात.
जव येशु प्रार्थना करी ऱ्हायंता तेना चेहरा सूर्य सारखा तेजस्वी हुईग्या आणि तेना कपळा प्रकाश सारखा धव्याबरफ हुईग्यात, ईतला धव्याबरफ कि, पृथ्वीवरला कोले बी तेवळा धव्याबरफ काळता नई येता.
तव मोशे व एलीया ह्या भविष्यव्दक्ता तेस्ले दिखनात. ह्या लोक शेकडो वरीस पहिले ह्या पृथ्वी वर हुईसन चालना जायेल होतात. त्या येशु नि मुर्त्यु ना बारामा तेना संगे बोलत होतात, जे यरुशलेममा घळणार होत.
जेंव्हा मोशे व एलीया येशूबरोबर बोलत होते, पेत्र येशूला म्हणाला, “इथे असणे आम्हाला बरे आहे.येथे आपण तीन मंडप बनवू, एक आपणासाठी, एक मोशेसाठी, व एक एलीयासाठी.” पेत्र काय बोलत होता त्याचे त्याला समजत नव्हते.
पेत्र बोलतांनाच, एक तेजस्वी ढग नि इसन तेस्ले घेरी लीधा व ढग मधून अशी वाणी हुईनी, “हवू मना पोऱ्या शे येनावर मी प्रेम करस. मी येणा विषय मा संतृष्ट शे. तेनी तुम्ही आयका” त्या तिन्ही शिष्य भ्यायग्यात व जमीन वर पडी ग्यात.
तव येशु नि तेस्ले हात लाईसन सांगना, “भ्याऊ नका. चाला उठा.” जव तेस्नी बाजुमा देखनात, तव तठे फक्त येशुच होता.
येशु आणि त्या तीन शिष्य परत पहाळ वरून खाले उतरनात. तव येशु नि तेस्ले सांग कि, आठे जे हुईन तेना विषय मा कोले बी काही सांगू नका. मी जल्दी मरसु व परत जित्ता हुईन. तेना नंतर तुम्ही ह्या विषय मा लोकस्ले सांगू शकतस.”
बायबल नि गोष्ट:मत्तय 17:1-9; मार्क 9: 2 - 8; लूक 9: 28 - 36
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।