38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 1

दर वरीस ले, यहुदी वल्हांडण ना सन ले साजरा करत होतात. परमेश्वर नि मिसर देश मधला गुलामगिरी मधून शेकळो वरीस पहिले तेस्ना पूर्वजस्नी कशी सुटका करी, एनी खुशी साजरा करा साठे यहुदी लोक ह्या सन ले साजरा करत होतात. येशु ना प्रचार नि उघळपणा कण सुरुवात होवा नंतर सुमारे तीन वरीस नंतर येशु नि आपला शिष्यस्ले सांग कि यरुशलेम मा तेस्ना संगे वल्हांडण ना सन साजरा करूत अशी तेनी इच्छा शे, आणि त्या नंतर तो तठे मारामा ईन अस बी तेनी सांग

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 2

येशु ना शिष्यस पैकी यहूदा नाव ना एक शिष्य होता. यहूदा हवू प्रेषितस्ना पैसास्नी थैली ले समायनारा खजीनदार होता, पण तो पैसा ना लोभी होवा मुळे गैरा सावा तेस्ना मधून पैसा चोरत होता. येशु आणि शिष्य यरुशलेम मा येवा नंतर, यहूदा धार्मिक पुढारीस्ले जायसन भेटस आणि पैसास्ना बदला मा येशु ले धरीसन देवाना बारामा बोलस. तेले माहिती होत कि यहुदी पुढारी येशु ले मसीहा शे हय नकारत होतात व तेले मारा ना कट रचत होतात.

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 3

तव महापुजारी आणि यहुदी पुढारीस्नी मियसन, येशु ना विश्वासघात करा साठे यहूदा ले चांदीना तीस नाना दिधात. भविष्यद्वक्तास्नी सांगेल भविष्यद्वाणी पुरी होवा साठे हय सर्व काही हुईन. यहूदा तेस्ना संगे सहमत हुईना, व पैसा लिसन चालना ग्या. तव पासून तो येशु ले धरीसन देवानी वाट देखू लागणा.

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 4

यरुशलेम मा, येशु नि आपला शिष्यस संगे वल्हांडण ना सन साजरा करा. वल्हांडण ना सन ना जेवण ना टाईम ले येशु नि भाकर ले लिसन तिले मोळी. व तेनी सांग,“ल्या आणि खावा.” हवू मना शरीर शे, तो तुमना साठे देवामा येस. मनी आठवण साठे हय करत राहा. त्याच प्रकारे येशु नि सांग, कि तेना शरीर तेस्ना साठे बलिदान म्हनिसन देवामा ईन.

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 5

मंग येशु नि एक प्याला ले लिसन सांग, “एना मधून प्या. हय मना नवा करार ना रक्त शे. ते गैरास्ना पाप ना क्षमा साठे ओतामा ईऱ्हायन. जव तुमी हय पीतस, तव मनी आठवण साठे हय करज्यात.”

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 6

मंग नि येशु नि शिष्यस्ले सांग, “तुमना मधून एक मना विश्वासघात करीन,” तव तेस्ले धक्का बसणा आणि त्या विचारू लागनात कि अशी गोष्ट कोण करीन. येशु नि सांग, “जेले मी हय भाकर मोळीसन देसू, तोच मना विश्वासघात करीन.” मंग तेनी यहूदा ले ती भाकर मोळीसन दिधी.

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 7

यहूदा ना भाकर लेवाबरोबर, सैतान नि तेना मा प्रवेश कर. मंग येशु ले धरीसन देवा साठे यहूदा तठून निघीसन यहुदी पुढारीस्ले मदत करा साठे ग्या. तो रात ना टाईम होता.

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 8

जेवण नंतर, येशु आपला शिष्यस संगे जैतुन ना डोंगर कळे ग्या. येशु नि सांग, “आज रात ले तुमी सर्वा मले सोळीसन चालना जाश्यात. अस लिखेल शे कि, मी मेंढपाळ ले मारी टाकसू व मेंढ्यास्ले दानाफान करी टाकसू.”

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 9

पेत्र नि उत्तर दिध, “जरी सर्वा तुले सोळी देतीन, तरी बी मी तुले सोळाव नई.” तव येशु नि पेत्र ले सांग, “सैतान नि तुमी सगळास्ना नाश कराना ठराई लीयेल शे, पण मनी तुमी सर्वास्ना साठे प्रार्थना करेल शे, पेत्र, एनासाठे कि तुमना विश्वास घसरी नई जावो. तरी बी आज रात ले, कोंबळा बांग देवाना पहिले तू मना तीन सावा नकार करशीन.”

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 10

तव पेत्र नि येशु ले सांग, “मले मरण जरी पळीन, तरी बी मी तुले नकाराव नई.” बाकीना शिष्यस्नी बी तसच सांग.

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 11

मंग येशु आपला शिष्यस्ले लिसन गेथशेमाने सांगावस त्या जागा वर ग्या. शिष्यस्नी परीक्षा मा नई पळाले पाहिजे म्हणून येशु नि तेस्ले प्रार्थना करा ले सांग. मंग येशु स्वता प्रार्थना कराले ग्या.

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 12

येशु नि तीन सावा प्रार्थना करी, “ओ बाप, जर कदी शक्य अशीन त हवू दुख सहन कराना प्याला मना पासून दूर कर. पण लोकस्ना पापस्नी क्षमा साठे दुसरा रस्ताच नई ओवाव, त तुनी इच्छा पुरी होवो.” येशु गैरा व्याकुळ हुईना व तेना घाम रक्त ना थेंब सारखा हुईग्या. परमेश्वर नि एक देवदूत ले धाळीसन तेले सामर्थ्य दिध.

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 13

प्रार्थना खतम करीसन प्रत्येक टाईम ले जव येशु शिष्यस कळे उना शिष्य जपेल स्थिती मा सापळनात. जव तो तिसरा सावा परत उना त येशु नि सांग, “ उठा, मना विश्वासघात करणार एयेल शे.”

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 14

यहूदा धार्मिक पुढारी, सैनिक व एक मोठी गर्दी संगे उना. तेस्नी आपला संगे तलवारी आणि सोटा लयेल होतात. यहूदा नि येशु जोळे ईसन सांग, “सलाम, गुरुजी,” आणि तेनी तेना मुक्का लीधा. कोले धराले पाहिजे हय यहुदी धार्मिक पुढारीस्ल समजा ले पाहिजे म्हणून हय एक चिन्ह होत. तव येशु नि सांग, “यहूदा, मना मुक्का लिसन मना विश्वासघात करीऱ्हायना का?”

38. येशु ले विश्वासघात कण धरीसन देवामा येस — चित्र 15

जव सैनिक येशु ले धरी ऱ्हायतात, पेत्र नि आपली तलवार काळी व महापुजारी ना सेवक ना कान कापी टाका. येशु नि सांग, “तलवार बाजू ले ठेव. मी बाप पासून मले वाचाळा साठे देवदूतस्ना सैन्य मांगाळू सकस. पण मले बाप नि आज्ञा पायान आवश्यक शे.” मंग येशु नि त्या माणुस ना कान बरा करा. येशु नि अटक होवा नंतर, सर्वा शिष्य पई ग्यात.

बायबल नि गोष्ट:मत्तय 26:14-56; मार्क 14 : 10-50; लूक 22 : 1-53; योहान 12:6; 18:1 - 11

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।