48. येशु हवू अभिवचन ना नुसार देवामा एयेल मसिहा शे
परमेश्वर नि जव सृष्टी ले बनाव तव सर्व काही परिपूर्ण होत. तठे पाप नई होत. आदाम आणि हव्वा एक-दुसरा वर प्रेम करत होतात व तेस्ना परमेश्वर वर प्रेम होता. तठे कोणताच प्रकार ना आजार व मोत नई होती सृष्टी अशीच राहाले पाहिजे अशी परमेश्वर नि इच्छा होती.
हव्वा ले फसाळा साठे सैतान नि साप ना द्वारे बोल. तव तिनी व आदाम नि परमेश्वर ना विरुध्द पाप कर. तेस्नी करेल पाप ना परिणाम म्हनिसन पृथ्वी वरना प्रत्येक झन आजारी पळस आणि मरस.
आदाम आणि हव्वा नि पाप करा मुळे आखो एक भयानक गोष्ट घळणी. त्या परमेश्वर ना वैरी हुईग्यात. तेना परिणाम मा, तव पासून पृथ्वी वर जल्म लेणार प्रत्येक व्यक्ती पाप ना स्वभाव लिसन जल्मस व तो परमेश्वर ना शत्रू बी होस. पाप मुळे परमेश्वर आणि माणुस मा जे नातसंबंध होता तुटी ग्या. पण हवू नातासंबंध परत जोळा साठे परमेश्वर नि एक योजना बनावी.
परमेश्वर नि अभिवचन दिध कि हव्वा ना एक वंशज सैतान नि डोक फोळीन व सैतान तेना टाच फोळीन. म्हणजे सैतान मसीहा ले मारी टाकीन, पण परमेश्वर तेले परत जित्ता करीन आणि मंग मसीहा सैतान ना सत्ता ना पुरा नायनाट करीन. गैरा वरीस नंतर परमेश्वर नि येशु हवूच मसीहा शे प्रगट कर.
जव परमेश्वर नि पुरी पृथ्वी ले जलप्रलय ना द्वारे नष्ट करी, तव तेना वर विश्वास ठेवणारस साठे परमेश्वर नि एक जहाज दिधा. त्याच प्रकारे, मानसस्ना पापस मुळे प्रतेक झन मृत्यु ले पात्र शे, पण तेना वर विश्वास ठेवणारस्ले वाचाळा साठे (तारसाठे) परमेश्वर नि येशु ले धाळ.
शेकळो वरीस लगून, महापुजारी मानसस्ले आपला पापस्नी शिक्षा मोठ शे हय दर्शावा साठे सारखाच पशुबली व होमर्पण करेत. पण त्या अर्पण ना द्वारे तेस्ना पापस्नी माफी होवू सकनी नई. येशु हवू एक महान महापुजारी शे. बाकीना पुजारीस्नी कर नई अस येशु नि कर, सर्वा जग ना लोकस साठे स्वतानच अर्पण करी टाक, एनासाठे कि ज्या तेना वर विश्वास ठेवतीन तेस्ना पापस्नी माफी भेटो. येशु हवू एक परिपूर्ण महापुजारी होता, कारण कि तेनी, प्रत्येक झन नि करेल प्रत्येक पाप नि शिक्षा स्वता वर लिधी.
परमेश्वर नि अब्राहाम ले सांग, “सर्वा राष्ट्र मधला मूळ तुना द्वारे आशीर्वादित होतीन.” येशु ख्रिस्त हवू अब्राहाम ना वंशज होता.
जग मधला सर्वा कुळ तेना द्वारे आशीर्वादित हुईनात, कारण कि जो कोणी येशु वर विश्वास ठेवस तेना पाप नि माफी होस व तो अब्राहाम ना आत्मिक वंशज बनी जास. जव परमेश्वर नि अब्राहाम ले इसहाक ना अर्पण कराले सांग, तव परमेश्वर नि इसहाक ना बदलामा, अर्पण करा साठे कोकरा ले दियेल होत. आमी आमना पापस मुळे मरण दंड साठे पात्र शेतस, पण परमेश्वर नि येशु ले, परमेश्वर ना कोकरा, अर्पण म्हनिसन आमना जागा वर मरासाठे धाळ.
जव परमेश्वर नि मिसर देश मा आखरी नि पिळा धाळी, तव तेनी प्रत्येक इस्राएली परिवार ले एक निर्दोष कोकरा ना वध करीसन तेना रक्त घर ना चौखट वर लावाले सांगेल होत. जव परमेश्वर नि त्या रक्त ले देख, तव तेना घर वलांडीसन तो चालना गया व पहिला जल्मेल पुत्र ले तेनी मार नई. ह्या घटना ले वल्हांडण ना सन म्हणतस.
येशु ख्रिस्त हवूच आमना वल्हांडण सन ना कोकरा शे. तो परिपूर्ण आणि निर्दोष शे आणि वल्हांडण ना सन ना टाईम वर वध करामा एयेल होता. जव कोणी येशु वर विश्वास करस, तव येशु ना रक्त ना द्वारे तेना पापस्नी खंडणी भरामा येस. आणि परमेश्वर नि शिक्षा त्या व्यक्ती ले वलांडीसन चालनी जास.
परमेश्वर नि इस्राएल ना संगे एक करार करेल होता, त्या तेना निवाळेल लोक होतात. पण तेनी आते सर्वास साठे जो उपलब्द शे असा नवा करार करा. ह्या नवा करार मुळे, कोणता बी लोक समुदाय मधून कोणी बी येशु वरला विश्वास ना द्वारे परमेश्वर ना पोर होवू सकतस.
परमेश्वर ना वचन ना प्रचार करणार मोशे हवू एक महान भविष्यद्वक्ता होता. पण येशु त्या सर्वास्तून जास्त महान भविष्यद्वक्ता शे. तो परमेश्वर शे, म्हणून तेनी जे काही कर व सांग ते सर्व परमेश्वर ना काम व परमेश्वर ना शब्द होतात. म्हणूनच येशु ले परमेश्वर ना शब्द असा सांगतस.
परमेश्वर नि दावीद राजा ले अभिवचन दियेल होत कि तेना वंशज पैकीच एक झन परमेश्वर ना लोकस्वर कायम राज्य करीन. येशु हवू परमेश्वर ना पुत्र व मसीहा होवा मुळे परमेश्वर ना लोकस्वर कायम राज्य करणार तो दावीद ना एक खास वंशज शे.
दावीद हवू इस्राएल देश ना राजा होता, पण येशु पुरा विश्वना राजा शे. तो परत येणार शे व आपला राज्य मा न्याय कण व शांती कण कायम राज्य करणार शे.
बायबल नि गोष्ट:उत्पत्ति 1-3, 6, 14, 22; निर्गम 12:20; 2 शमूवेल 7; इब्री 3:1-6; 4:14-5:10; 7:1-8:13, 9:11-10:18; प्रकटीकरण 21
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।