9. परमेश्वर ना द्वारे मोशे नि निवळ
योसेफ मरी जावा नंतर, तेना सर्वा नातेवाईक मिसर देश मा राहात होतात. त्या आणि तेस्ना संतान गैरा वरीस लगून तठेच ऱ्हायनात आणि तेस्ले गैरा पोर हुईनात. तेस्ले इस्राएली म्हणा मा येत होत.
शेकळो वरीस नंतर इस्राएली लोकस्नी संख्या गैरी वाळणी. योसेफ नि करेल कामगिरी ले लोकस्ले याद पळी गई. तेस्ले आते इस्राएली लोकस्नी भीती वाटू लागणी. कारण कि त्या जास्त होतात. म्हणून त्या टाईम ले जो मिसर देश वर राज्य करत होता फारो राजा इस्राएली लोकस्ले मिसरी लोकस्ना गुलाम बनाईसन ठेव.
मिसर देश ना लोकस्नी इस्राएल देश ना लोकस्ले गैरा इमारतस्ना बांधकाम करासाठे आणि मोठा-मोठा शहरस्ना निर्माण करासाठे जबरजस्ती करी. असा कष्ट ना काम मुळे तेस्ना जीवन गैरा त्रासदायक हुईग्या, पण परमेश्वर नि तेस्ले आशीर्वादित कर व तेस्ले आखो पोर हुईनात.
फारो राजा नि देख कि इस्राएल देश ना लोकस्ले गैरा पोर हुई ऱ्हायनात, म्हणून तेनी आदेश दिधा कि जर कदी इस्राएल देश ना लोकस्ले पोर होतीन त तेस्ले नाईल नदी मा फेकी देवोत.
एक इस्राएल देश नि बाई नि एक पोऱ्या ले जल्म दिध, तिनी आणि तिना नवरा नि आपला पोऱ्या ले काही दीनस लगून दपाळाना प्रयत्न्य करा.
जव त्या पोऱ्या ना माय-बाप तेले दपाळी नई सकनात, तव तेनी त्या पोऱ्या ले मुर्त्यु पासून वाचाळासाठे तेले एक तरंगणार टोपली मा ठीयसन ती नाईल नदी ना तठवर लवकर ठेव. त्या पोऱ्या नि मोठी बहिण तेन काय हुईन हय देखी ऱ्हायंती.
फारो राजा नि पोर नि टोपली ले उघाळीसन तीनामा देख, जव तिनी त्या पोऱ्या ले देख, तव तिनी तेले आपला पोऱ्या म्हनिसन ठिय लीधा. तिनी त्या पोऱ्या ले दूध पाजा साठे एक इस्राएल देश नि बाई ले बलाव, पण ती तेनी माय होती अस तिले माहित नई होत. जव तो पोऱ्या मोठा हुईना व तेले आपली माय ना दुध नि गरज नई ऱ्हायनी, तव तिनी तेले फारो राजा नि पोर ले सोप, तिनी तेन नाव मोशे ठेव.
एक दिन, जव मोशे मोठा हुईग्या, तव तेनी एक मिसर देश ना माणुस ले एक यहुदी गुलाम ले मारतांना देख. मोशे नि आपला इस्राएल देश ना व्यक्ती ले वाचाळा प्रयात्न्य कर.
मले कोणीच नई देखी ऱ्हायन हय देखीसन मोशे नि त्या मिसर देश ना माणुस ले मारी टाक आणि तेना शरीर ले गाळी टाक.
जव फारो राजा नि मोशे नि करेल काम ना बारामा आयक तव तेनी तेले माराना प्रयत्न्य करा. फारो राजा ना सैनिकस पासून सुरक्षित राहा साठे मोशे मिसर देश सोळीसन जंगल मा पई ग्या.
मोशे आते मिसर देश पासून दूर जंगल मा मेंढ्या चारू लागणा. तेनी तठेच एक बाई संगे लगन करी लिध आणि तेले दोन पोर हुईनात.
एक दिन जव मोशे मेंढ्याच चारी ऱ्हायंता,तेनी एक झुळूप ले चेटतांना देख. पण ते झुळूप चेटीसन भस्म नई हुईन अस तेले दिखन. मंग तो तेले ध्यान दिसन देखा साठे त्या झुळूप जोळे ग्या. जव तो त्या चेटणाऱ्या झुळूप जोळे जात होता, परमेश्वर ना आवाज तेले आयकू उना, “मोशे, तू आपला पाय मधला जुत्ता काळ. कारण कि तू पवित्र जमीन वर उभा शे.”
परमेश्वर नि सांग, “मनी आपला लोकस्ना दुख देखेल शे. मी तुले फारो राजा कळे मना लोकस्ले मिसर देश ना लोकस्नी गुलामी मधून सोळावासाठे धाळणार शे. मी तेस्ले कनान देश देणार शे, जो मी अब्राहाम, इसहाक, आणि याकोब ले प्रतिज्ञा करेल होती.”
मोशे नि सांग, “जर कदी लोकस्नी मले विचार कि तुले कोणी धाळेल शे, त मी तेस्ले काय सांगू?” परमेश्वर नि सांग, “मी शे तो शे. तेस्ले सांग, मी शे एनी मले तुमना कळे धाळेल शे. तेस्ले हय बी सांग कि, मी तेस्ना पूर्वजस्ना म्हणजे अब्राहाम, इसहाक आणि याकोबस्ना परमेश्वर शे. हईच मन कायम न नाव शे.”
मोशे गैरा भ्याय ग्या आणि फारो कळे जावाले नकारा ले लागणा कारण कि तेले चांगल्या प्रकारे बोलता नई येत होत, म्हणून परमेश्वर नि मोशे ना भावू, अहरोन, ले तेनी मदत कराले धाळ. परमेश्वर नि मोशे आणि अहरोन ले पहिलेच सांगी ठेव कि फारो राजा हट्टीपणा करीन.
बायबल नि गोष्ट: निर्गम 1-4
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।