12. निर्गमन

12. निर्गमन — चित्र 1

इस्राएली लॉक मिसरातना भायर पडान मॉप आनंदी व्हते. ते आता गुलाम नाय व्हते, तर ते वचनदत्त देशाक जाय व्हते. जा काय इस्राएली लॉकांनी मागल्यानी, ता सगळा काय मिसऱ्यांनी तेंका दिल्यानी. सोना, चांदी नी इतर मौल्यवान वस्तूव दिल्यानी. दुसऱ्या देशाच्याव काय लॉकांनी परमेश्वरार इश्वास ठेवल्यानी नी जेळाक इस्राएली लॉक मिसरातना निघाले तेळाक तेव तेंच्याबरोबर गेले.

12. निर्गमन — चित्र 2

दिवसा मोठो मेघस्तंभ तेंच्या पुढेपुढे चलायचो नी रात्रीचो तो आगीचो स्तंभ बनायचो. परमेश्वर त्या मेघस्तंभ नी अग्निस्तंभात असायचो, रोज तो तेंच्यासोबत असायचो नी तेनाच तेंका त्या प्रवासात मार्गदर्शन केल्यान. तेंका फक्त तेच्या मागना चलाचा व्हता.

12. निर्गमन — चित्र 3

काय येळान फारो नी तेच्या लॉकांनी आपली मना बदलल्यानी. ते इस्राएली लॉकांका परत गुलाम करूक बघी व्हते. म्हणान तेंनी इस्राएली लॉकांचो पाठलाग केल्यानी. परमेश्वरानच तेंची मना बदलल्यान. तेना असा अशासाठी केल्यान की प्रत्येकजणाक म्हायत होवक व्हया की फारो नी मिसऱ्यांच्या सगळ्या देवांहून तो यहोवा अधिक शक्तिमान हा.

12. निर्गमन — चित्र 4

जेळाक इस्राएली लॉकांनी मिसरी सेनेक यताना बघल्यानी तेळाक तेंका समजला की ती फारोची सेना हा नी ते लाल समुद्राच्या मधीच अडाकले. ते मॉप भियाले नी रडाक लागले, "आम्ही मिसर कित्याक सोडलाव? आम्ही आता मरतलाव!"

12. निर्गमन — चित्र 5

मोशेन इस्राएली लॉकांका म्हटल्यान, "भिया नको! परमेश्वर आज तुमच्यासाठी लढतलो नी तुमका वाचयतलो." तेळाक परमेश्वर मोशेक बोललो, "ह्या लॉकांका लाल समुद्राकडे पुढे चलत ऱ्हवाक सांग."

12. निर्गमन — चित्र 6

तेळाक परमेश्वरान त्या मेघस्तंभाक घेवन इस्राएली नी मिसरी हेंच्या मधी ठेयल्यान कारण इस्राएली लॉक मिसरी लॉकांका दिसता नये.

12. निर्गमन — चित्र 7

परमेश्वरान मोशेक समुद्रार आपलो हात उगारूक सांगल्यान. मगे परमेश्वरान हवेन समुद्राचा पाणी बाजूक करून समुद्राच्या मधना येक रस्तो बनयल्यान.

12. निर्गमन — चित्र 8

इस्राएली लॉक आपल्या दोनव बाजूक पाणयाचे भिंती नी समुद्राच्या मधना सुक्या जमनीरना चलत ऱ्हवले.

12. निर्गमन — चित्र 9

तेळाक परमेश्वरान त्या रस्त्यारना मेघस्तंभ वरती उचलल्यान म्हणजे मिसरी लॉक इस्राएली लॉकांका वाचान जाताना बघतीत. मिसऱ्यांनी तेंका पकडूक तेंचो पाठलाग करूचा ठरवल्यानी.

12. निर्गमन — चित्र 10

शेवटाक तेनी समुद्रातल्या त्या रस्त्यार इस्राएली लॉकांचो पाठलाग केल्यानी, पण परमेश्वरान मिसऱ्यांका घाबरयल्यान नी तेंचे रथ अडकयल्यान. ते वरडाक लागले, "पळा! इस्राएली लॉकांच्या वतीन परमेश्वर लढता हा!"

12. निर्गमन — चित्र 11

सगळे इस्राएली लॉक समुद्राच्या दुसऱ्या बाजूक पोचले. तेळाक परमेश्वरान मोशेक म्हटल्यान की, परत समुद्रार हात उगार. जेळाक मोशेन तसा केल्यान, तेळाक पाणी मिसरी सेनेर पडला नी पयला पाणी व्हता तसा परत सरळ झाला. सगळी मिसरी सेना बुडली.

12. निर्गमन — चित्र 12

जेळाक इस्राएली लॉकांनी बघल्यानी की, मिसरी लॉक मरान गेले तेळाक तेंनी परमेश्वरार इश्वास ठेयल्यानी. तेंनी इश्वास केल्यानी की मोशे परमेश्वराकडना भविष्यवकतो हा.

12. निर्गमन — चित्र 13

परमेश्वरान मरण्यापासना नी गुलाम व्हण्यापासना वाचयल्यान म्हणान इस्राएली लॉका मॉप आनंदी व्हती. आता ते परमेश्वराची आराधना करुक नी तेचे आज्ञा पाळूक मोकळे झालले. इस्राएली लॉकांनी आपल्या स्वतंत्रतेचो उत्सव करूक नी परमेश्वराची प्रशंसा करूक गाणी म्हटल्यानी कारण तेना तेंका मिसऱ्यांपासना वाचयलल्यान.

12. निर्गमन — चित्र 14

परमेश्वरान मिसऱ्यांका कसो हरयल्यान नी इस्राएली लॉकांका गुलाम व्हण्यापासना कसो मोकळो केल्यान हेची आठवण होवसाठी दर वर्साक सण साजरो करूची आज्ञा केल्यान. हेका वल्हाण्डन सण म्हटला गेला. हेच्यात तेंका उत्सव करूक येका पुष्ट कोकऱ्याक बलि करुचो व्हतो, तेका भाजून बेखमीर भाकरेबरोबर खावचा व्हता.

बायबलातली गोष्ट : निर्गमन अध्याय 12:33-15:21

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।