14. जंगलातला भटाकना

14. जंगलातला भटाकना — चित्र 1

परमेश्वरान इस्राएली लॉकांका ते नियम सांगूचा बंद केल्यान जे पाळूक व्हये म्हणान तेना तेंच्याबरोबर प्रतिज्ञा केलल्यान. मगे तेना सिनाय पर्वताच्या पुढे तेंची रवानगी केल्यान. तो केलल्या प्रतिज्ञेमुळाक तेंका त्या देशात घेवन जाय व्हतो. त्या देशाक कनानव म्हणत. परमेश्वर मेघस्तंभातना तेंच्या पुढे-पुढे चला, नी ते तेच्या पाठी-पाठी चलत.

14. जंगलातला भटाकना — चित्र 2

परमेश्वरान अब्राहाम, इसहाक नी याकोबाबरोबर प्रतिज्ञा केलल्यान की तो वचनदत्त देश तेंच्या अवलादीक देतलो, पण त्या येळाक थय मॉप जातीचे लॉक ऱ्हवत व्हते. तेंका कनानी म्हणत. ते कनानी लॉक परमेश्वराची आराधना नाय करायचे नी तेचे आज्ञा नाय मानायचे. ते खोट्या देवांची पूजा करायचे.

14. जंगलातला भटाकना — चित्र 3

परमेश्वरान इस्राएली लॉकांका म्हटल्यान, "जेळाक तुम्ही त्या वचनदत्त देशात जाशात तेळाक थयच्या सगळ्या कनान्यांचो नाश करून टाका. तेंच्याबरोबर संगत करू नको नी तेंच्याबरोबर लगीन करू नको. तुमका तेंचे सगळ्यो मूर्त्यो शाप नायशे करून टाकुचे हत. जर तुम्ही माझी आज्ञा पाळलास नाय तर तुम्ही माझ्याइरुद्ध तेंच्या देवांची पूजा करूक लागशात."

14. जंगलातला भटाकना — चित्र 4

जेळाक इस्राएली कनानाच्या सीमेर पोचले, मोशेन इस्राएलाच्या प्रत्येक गोत्रातना येक-येक करून बारा बापये निवडल्यान. तेना तेंका जावन त्या देशाक हेरून तो देश कसो हा, ह्या बघून येवक सांगल्यान. तेंका त्या कनान्यांची म्हायतीव काढूची व्हती म्हणजे ते बलवान आसत की निर्बल आसत ता कळला आसता.

14. जंगलातला भटाकना — चित्र 5

त्या बारा बापयांनी पूर्ण कनानातना चाळीस दिवस प्रवास केल्यानी नी मगे ते परत पाठी इले. तेनी लॉकांका सांगल्यानी, "त्या देशात मॉप सुपीक जमीन हा नी पीक-पाणीव मॉप हा.

14. जंगलातला भटाकना — चित्र 6

लगेचच कालेब नी यहोशवा नी इतर दोन हेरांनी सांगल्यानी, "ह्या खरा आसा की कनानाचे लॉक उंचीन नी ताकतीन आसत, पण नक्कीच आम्ही तेंका हरव शकतव. परमेश्वर आमच्यासाठी लढतलो."

14. जंगलातला भटाकना — चित्र 7

पण लॉक कालेब नी यहोशवा हेंचा आयकले नाय. ते मोशे नी अहरोन हेंच्यार रागावले नी बोलले, "तुम्ही आमका ह्या भयानक जागेर कित्याक घेवन इलास? आम्ही मिसरात व्हतव ते बरे व्हतव. जर आम्ही त्या देशात गेलव तर आम्ही लढाईत मरान जावचव नी कनानचे लॉक आमचे बायले नी पोरांका गुलाम बनवतीत." ते लॉक तेंका परत मिसरात घेवन जावक एक येगळो पुढारी निवडुक बघी व्हते.

14. जंगलातला भटाकना — चित्र 8

जेळाक त्या लॉकांनी असा म्हटल्यानी तेळाक परमेश्वर खूप रागावलो. तो निवासमंडपात इलो नी बोललो, "तुम्ही माझ्याविरुद्ध बंड केलास, म्हणान तुमका सगळ्यांका ह्या जंगलात भटकाचा लागतला. प्रत्येकजण जे वीस वर्सा नायतर तेच्यापेक्षा अधिक वयाचे आसत ते थय मरान जातले नी जो देश मी तुमका देतलय तेच्यात जावचे नाय. फक्त कालेब नी यहोशवा तेच्यात जातीत."

14. जंगलातला भटाकना — चित्र 9

जेळाक लॉकांनी परमेश्वराक असा बोलताना आयकल्यानी, तेळाक ते दुखी झाले कारण तेंनी पाप केलल्यानी. म्हणान तेंनी कनानी लॉकांवर हमलो करुचा ठरवल्यानी. मोशेन तेंका जाव नको म्हणान बजावल्यान कारण परमेश्वर तेंच्याबरोबर नाय व्हतो, पण तेंनी तेचा आयकाक नाय.

14. जंगलातला भटाकना — चित्र 10

परमेश्वर त्या लढाईत तेंच्याबरोबर जावक नाय, म्हणान कनान्यांनी तेंका हरवल्यानी नी तेंच्यातल्या लय लॉकांका मारून टाकल्यानी. तेळा इस्राएली लॉक कनानातना पाठी फिरले. पुढच्या चाळीस वर्सांपर्यात ते जंगलात हकडे-तकडे भटाकले.

14. जंगलातला भटाकना — चित्र 11

इस्राएली लॉक जंगलात भटाकताना त्या चाळीस वर्सात परमेश्वरान तेंचे सगळ्यो गरजा पूरे केल्यान. तेना तेंका स्वर्गातना 'मान्नो' म्हटलला जेवान दिल्यान. तेंच्याकडे खावक मास व्हया म्हणान तेना ल्हायांचे घोळकेव तेंच्या छावणेत पाठवल्यान. त्या सगळ्या येळेत, परमेश्वरान तेंचे कपडे नी चपला झिजाक दिल्यान नाय.

14. जंगलातला भटाकना — चित्र 12

परमेश्वरान चमत्कारान खडकातना तेंका पिवक पाणी काढल्यान. पण तरीव इस्राएली लॉकांनी परमेश्वर नी मोशेइरुद्ध बडबड नी कुरकुर केल्यानी. तरी परमेश्वर विश्वासू ऱ्हवलो. तेना अब्राहाम, इसहाक नी याकोब हेंच्या अवलादीसाठी जा करूची प्रतिज्ञा केलल्यान ती तेना पुरी केल्यान.

14. जंगलातला भटाकना — चित्र 13

आजून येका येळेक त्या लॉकांकडे पाणी नाय व्हता, परमेश्वरान मोशेक सांगल्यान, "खडकाबरोबर बोल नी तेच्यातना पाणी निघात." पण मोशेन खडकाबरोबर बोलाचा सोडून त्या खडकार दोनदा काठी मारल्यान. ह्याप्रकारान तेना परमेश्वराचो अनादर केल्यान. सगळ्यांका पिवक खडकातना पाणी तर इला,पण परमेश्वर मोशेर रागवलो. तेना म्हटल्यान, "तू असा केलस म्हणान वचनदत्त देशात तुझो प्रवेश होवचो नाय."

14. जंगलातला भटाकना — चित्र 14

जेळाक इस्राएली लॉक चाळीस वर्सा जंगलात भटाकलले, तेळाक जेंनी परमेश्वराइरुद्ध बंड केलल्यानी ते सगळे मरान गेलले. तेळाक परमेश्वर त्या लॉकांका परत त्या वचनदत्त देशापर्यात घेवन गेलो. आता मोशे लय म्हातारो झाललो, म्हणान परमेश्वरान लॉकांचा मार्गदर्शन करूक तेचो मदतगार म्हणून यहोशवाक निवडल्यान. परमेश्वरान मोशेबरोबर अशी प्रतिज्ञा केलल्यान की, एक दिवस त्या लॉकांकडे मोशेसारखो भविष्यवकतो पाठयतलो.

14. जंगलातला भटाकना — चित्र 15

तेळाक परमेश्वरान मोशेक येका पर्वतार जावक सांगल्यान म्हणजे तो त्या वचनदत्त देशाक बघू शकात. मोशेन त्या वचनदत्त देशाक बघल्यान पण परमेश्वरान तेका तेच्यात प्रवेश करूची परवानगी देवक नाय. तेळाक मोशे मरण पावलो नी इस्राएली लॉकांनी तीस दिवस मोशेसाठी शोक केल्यानी. यहोशवा तेंचो नवो पुढारी झालो. यहोशवा येक चांगलो पुढारी व्हतो, कारण तेना परमेश्वरार इश्वास ठेयल्यान नी तेचा सांगना आयकल्यान.

बायबलातली गोष्ट : निर्गम अध्याय 16-17; गणना 10-14; 20; 27; अनुवाद 34

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।