15. वचनदत्त देश
शेवटाक, आता ती येळ इलली की, इस्राएली लॉक वचनदत्त देश, कनानात जातीत. त्या देशात यरीहो नावाचा याक नगर व्हता. तेच्या सुरक्षेक तेच्या चारव बाजूक मजबूत भिंत व्हती. यहोशवान त्या नगरात हेरांका पाठयल्यान. त्या नगरात राहाब नावाची येक वेश्या ऱ्हवा व्हती. तिना त्या हेरांका लपयल्यान नी मगे तिना तेंका नगरातना वाचान जावक मदत केल्यान. तिना तसा ह्यासाठी केल्यान की ती परमेश्वरार इश्वास करी व्हती. जेळाक इस्राएली लॉक यरीहोचो नाश करतीत तेळाक तेंनी राहाब नी तिच्या परिवाराचा रक्षण करूची प्रतिज्ञा केल्यानी.
इस्राएली लॉकांका वचनदत्त देशात जावक यार्देन नदी पार करूची व्हती. परमेश्वरान यहोशवाक म्हटल्यान, "याजकांका पयलो जावक दी." जेळाक याजकांनी यार्देन नदीत आपले पाय ठेयल्यानी तेळाक पाणी व्हावाचा थांबला, म्हणान इस्राएली लॉक नदयेच्या दुसऱ्या बाजूक सुक्या जमनीर जाव शकले.
त्या लॉकांनी यार्देन नदी पार केल्यानी, तेळाक परमेश्वरान यहोशवाक म्हटल्यान की, यरीहोर हमलो करूक तयार ऱ्हवा, कारण की ता लय भक्कम नगर व्हता. परमेश्वरान त्या लॉकांका सांगल्यान की तेंचे याजक नी सैनिकांका सा दिवस त्या नगराभवती चारव बाजून फेरये मारुचे हत. शेवटाक याजक नी सैनिकांनी तसाच केल्यानी.
सातव्या दिवशी, इस्राएली लॉकांनी त्या नगरच्या चारव बाजून सात येळा फेरये मारल्यानी. त्या नगराभवती चारव बाजून सातवी फेरी मारल्यार याजकांनी आपले कर्णे फुंकल्यानी नी सैनिकांनी जोरात जयघोष केल्यानी.
तेळाक यरीहोच्या चारव बाजूची भिंत कोसाळली. जशी परमेश्वरान आज्ञा दिलल्यान, इस्राएली लॉकांनी नगरातला सगळा काय नायसा करून टाकल्यानी. तेंनी फक्त राहाब नी तिच्या परिवाराक सोडून दिल्यानी, जे इस्राएलचो भाग झालले. जेळाक कनानात ऱ्हवणाऱ्या इतर लॉकांनी आयकल्यानी की इस्राएली लॉकांनी यरीहोचो नायनाट केल्यानी हा तेळाक ते घाबारले की इस्राएली लॉक तेंकाव मारतीत.
परमेश्वरान इस्राएली लॉकांका आज्ञा दिलल्यान की, कनानात ऱ्हवणाऱ्या खयच्याच जातीबरोबर शांतिचो करार करू नको. पण गिबोन नावाच्या कनानी जातीच्या लॉकांनी यहोशवाबरोबर खोटा बोलल्यानी की ते कनानपासना लांबच्या ठिकाणार ऱ्हवणारे लॉक आसत. तेंनी यहोशवाक तेंच्याबरोबर शांतिचो करार करूक इनंती केल्यानी. यहोशवा नी बाकीचे इस्राएली पुढाऱ्यांनी परमेश्वराक विचारूक नाय की, तेंनी काय करूक व्हया. ता सोडून ते गिबोन्यांबरोबर शांतिचो करार करून मोकळे झाले.
तीन दिवसांनी, इस्राएली लॉकांका म्हायत झाला की, गिबोनी लॉक कनानातच ऱ्हवत व्हते. ते रागावले कारण गिबोन्यांनी तेंका फसयलल्यानी. पण तेंनी तेंच्याबरोबर केलल्या त्या शांतिच्या कराराक कायम ठेयल्यानी कारण तो तेंनी परमेश्वरासमोर केलल्यानी. तेळाक काय येळान, कनानात ऱ्हवणारी अन्यजात-अमोरी हेंच्या राजांनी आयकल्यानी की, गिबोन्यांनी इस्राएली लॉकांबरोबर शांतिचो करार केल्यानी हा, म्हणान तेनी आपआपला सैन्य येकत्र करून येक मोठा सैन्य बनयल्यानी नी गिबोनार हल्लो केल्यानी. गिबोन्यांनी मदतीक यहोशवाकडे येक संदेश पाठयल्यानी.
शेवटाक, यहोशवान इस्राएली सेनेक यकत्र केल्यान नी गिबोन्यांकडे पोचाक ते पुरी रातभर चलले. पहाटेकच तेंनी अमोऱ्यांच्या सैन्याक आश्चर्यचकित केल्यानी नी तेंचार हल्लो केल्यानी.
त्या दिवशी परमेश्वर इस्राएली लॉकांच्या बाजून लढलो. तेना अमोऱ्यांका घाबरवन टाकल्यान नी तेना मोठमोठे गारा पाडवन मॉपश्या अमोऱ्यांका मारून टाकल्यान.
परमेश्वरान सुर्याकव आकाशात येका जागेर थांबवल्यान म्हणजे इस्राएली लॉकांका अमोऱ्यांका पुरे हरवक व्हयो तेवढो येळ मिळात. त्या दिवसाक परमेश्वरान इस्राएली लॉकांका मोठो विजय मिळवन दिल्यान.
परमेश्वरान ते सेना हरयल्यार मॉपश्या कनानी जातीचे लॉक इस्राएलार हल्लो करूक यकत्र झाले. यहोशवा नी इस्राएली लॉकांनी हल्लो करून तेंचोच श्याप नायनाट करून टाकल्यानी.
त्या युद्धांनंतर, परमेश्वरान इस्राएलाच्या प्रत्येक कुळाक त्या वचनदत्त देशात तेंचो वतनभाग दिल्यान. तेळाक परमेश्वरान इस्राएलाक तेच्या सगळ्या सीमेर शांति दिल्यान.
जेळाक यहोशवा म्हातारो झालो तेळाक तेना इस्राएलाच्या सगळ्या लॉकांका यकत्र बोलयल्यान. तेळाक यहोशवान त्या लॉकांका आठवण करून दिल्यान की, परमेश्वरान वचन देवन तेंच्याबरोबर जी प्रतिज्ञा सिनाय पर्वतार केलल्यान ती तेंनी पाळायची. त्या लॉकांनी परमेश्वराप्रति इश्वासू ऱ्हवान तेचे विधी नी नियम पाळूचा वचन दिल्यानी.
बायबलातली गोष्ट : यहोशवा अध्याय 1-24
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।