18. विभागलला राज्य
दाविद राजान चाळीस वर्सापर्यात राज्य केल्यान. मगे तो मरान गेलो नी तेचो झिल शलमोनान इस्राएलार राज्य करूक सुरवात केल्यान. परमेश्वर शलमोनाक बोललो नी तेका इचारल्यान की तेची काय इच्छा हा की, देवान तेच्यासाठी करना लय गरजेचा हा. शलमोनान परमेश्वराकडे मागल्यान की तेका मॉप बुद्धिमान बनव. ह्या गोष्टीन परमेश्वराक आनंद झालो, म्हणान परमेश्वरान शलमोनाक जगातलो सगळ्यात बुद्धिमान माणूस बनयल्यान. शलमोनान मॉपशे गोष्टी शिकान घितल्यान नी तो येक बुद्धिमान राजा झालो. परमेश्वरान तेका लय धनवानव बनयल्यान.
यरुशलेमेत शलमोनान ता मंदिर बांधल्यान जेच्यासाठी तेच्या बापाशीन ठरवन ठेयलल्यान नी सामान येकत्र करून ठेयलल्यान. आता लॉक निवासमंडपात जावचा सोडून मंदिरात जावन परमेश्वराची आराधना करीत नी तेका बलि चढवीत. परमेश्वर मंदिरात येवन हजर ऱ्हवायचो नी थय तो आपल्या लॉकांबरोबर वास करायचो.
पण शलमोनान दुसऱ्या देशाच्या बायकांर प्रेम केल्यान. तेना मॉपशे, जवळपास १,००० बायकांबरोबर लगीन करून परमेश्वराची आज्ञा मोडल्यान. तेच्यातली मॉपशी बायका परक्या देशातना इलली नी आपल्या बरोबर आपले देवव घेवन इलली नी तेंची पूजा करुचा चालू ठेयल्यानी. जेळाक शलमोन म्हातारो झालो तेळाक तेनाव तेंच्या देवांची पूजा केल्यान.
म्हणान परमेश्वर शलमोनार रागावलो. तेना म्हटल्यान की तो इस्राएल देशाक दोन भागात विभागून तेंका शिक्षा करतलो. पण असा तो शलमोन मेल्यार करतलो.
शलमोन मेल्यार, रहबाम राजा झालो. इस्राएल देशाचे सगळे लॉक तेका राजा म्हणान स्विकारूक येकत्र झाले. तेनी रहबामाक तक्रार केल्यानी की शलमोनान तेंच्याकडना लय कठीण कामा करून घितल्यान नी लय कर वसूल केलल्यान. तेंनी रहाबामाक मसलत दिल्यानी की तेंच्याकडना कमी काम करूक लावा.
पण रहाबामान तेंका मोठ्या मूर्खपणान उत्तर दिल्यान, "तुम्ही सांगतास की माझो बापुस शलमोनान तुमका कठीण कामा करूक लायल्यान. पण मीया तुमच्याकडना तेच्यापेक्षाव आजून कठीण कामा करून घेतलय नी मीया तुमका तेच्यापेक्षाव आजून पीडतलय."
जेळाक लॉकांनी तेका असा म्हणताना आयकल्यानी तेळाक तेंच्यातल्या काय जणांनी तेच्याइरुद्ध बंड केल्यानी. धा कुळानी तेका सोडून दिल्यानी; तेच्याबरोबर आता दोनच कुळा ऱ्हवली. ह्या दोन कुळांनी स्वताक यहुद्यांचा राज्य म्हटल्यानी.
बाकीच्या धा कुळांनी यराबाम नावाच्या यका बापयाक आपलो राजा बनयल्यानी. ही कुळा देशाच्या उत्तर-पूर्व भागात व्हती. तेंनी स्वताक इस्राएलचा राज्य म्हटल्यानी.
पण यराबामान परमेश्वराइरुद्ध बंड केल्यान नी लॉकांकडना पाप करयल्यान. तेना आपल्या लॉकांकडना पूजा करून घेवक दोन मूर्ते बनयल्यान. ते आता यहुद्यांच्या राज्यात यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरात तेची आराधना करूक नाय जावक.
यहूदा नी इस्राएल राज्या येकमेकांची दुश्मन बनली नी कायम येकदुसऱ्याबरोबर लढाई करुक लागली.
इस्राएलाच्या नयीन राज्यात सगळेच राजा दुष्ट व्हते. हेंचातले कित्येक राजा तेंच्या जागेर राजा बनाची इच्छा ठेवणारे इतर इस्राएली लॉकांकडना मारले गेले.
इस्राएल राज्याच्या सगळ्या राजांनी नी मॉपशा लॉकांनी मूर्तेची पूजा केल्यानी. जेळाक तेनी असा केल्यानी, तेळाक ते कायम वेश्यांबरोबर झोपले नी काय येळाक मूर्तेपुढे आपल्या पोरांका बलिव केल्यानी.
यहूदा राज्याचे राजा, दाविदाची अवलाद व्हते. ह्या राजांतूरले काय जण भले माणूस व्हते, जेंनी न्यायान राज्य केल्यानी, नी परमेश्वराची आराधना केल्यानी. पण यहुद्यांचे जास्त ते राजा वायट व्हते. तेंनी वायटान राज्य केल्यानी, नी मुर्ते पूजल्यानी. ह्यापर्यात की तेंच्यातल्या काय राजांनी खोट्या देवांका आपल्या पोरांका बलि केल्यानी. यहुद्यांच्या जास्त त्या लॉकांनीव परमेश्वराइरुद्ध बंड केल्यानी नी इतर देवांची पूजा केल्यानी.
बायबलातली गोष्ट : 1 राजे अध्याय 1-6; 11-12
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।