19. भविष्यवक्ते

19. भविष्यवक्ते — चित्र 1

परमेश्वर कायम इस्राएली लॉकांकडे भविष्यवक्ते पाठयत ऱ्हवा. भविष्यवक्ते परमेश्वराकडना संदेश आयकत नी मगे ते लॉकांका सांगित.

19. भविष्यवक्ते — चित्र 2

जेळाक अहाब इस्राएलाच्या राज्यार राजा व्हतो तेळाक एलिया भविष्यवकतो व्हतो. अहाब येक वायट माणूस व्हतो. तेना खोट्या बआल देवतांची पूजा करूक लॉकांका भाग पाडल्यान. म्हणान एलियान अहाबाक म्हटल्यान की, परमेश्वर त्या लॉकांका शिक्षा करूक जाय व्हतो. तेना तेका सांगल्यान, "जोपर्यात मीया परत पावस पडाक सांगनय नाय तोपर्यात इस्राएल राज्यात पावस पडाचो नाय नी दवव पडाचो नाय." ह्या गोष्टीन अहाबाक यवढो राग इलो की तेना एलियाक मारून टाकुचा ठरयल्यान.

19. भविष्यवक्ते — चित्र 3

म्हणान परमेश्वरान एलियाक सांगल्यान की, तेना जंगलात जावन अहाबापासना लपायचा. एलिया जंगलात त्या झऱ्याकडे गेलो जय जावक परमेश्वरान तेका सांगलल्यान. रोज सकाळी नी संध्याकाळी, पक्षी एलियाक भाकरी नी मास घेवन येयत. ह्या सगळ्या येळेत, अहाब नी तेची सेना एलियाचो शोध करीत ऱ्हवले, पण ते तेका शोधू शकले नाय.

19. भविष्यवक्ते — चित्र 4

पावस पडाक नाय म्हणान काय येळान तो झरो सुकान गेलो. म्हणान एलिया जवळच्या येका देशात गेलो. त्या देशात येक गरीब विधवा व्हती जिचो येक झिल व्हतो. तेंच्याकडचा जेवान जवळजवळ संपलला कारण थय कसलीच शेती नाय झालली. पण तरीव, त्या बायन एलियाची सेवा केल्यान, म्हणान परमेश्वरान तेचे नी तेच्या झिलाचे गरजा पुरे केल्यान, म्हणानच तेच्या पिठाचा भांडा नी तेलाची कुपी कधीच रिकामी नाय झावक. त्या पुऱ्या दुष्काळात तेच्याकडे जेवान व्हता. एलिया काय वर्सा थय ऱ्हवलो.

19. भविष्यवक्ते — चित्र 5

साडे तीन वर्सांनंतर, परमेश्वरान एलियाक सांगल्यान की तो परत पावस पाडतलो. तेना एलियाक इस्राएलाच्या राज्यात जावन अहाबाबरोबर बोलाक सांगल्यान. म्हणान एलिया अहाबाकडे गेलो. जेळाक अहाबान तेका बघल्यान तेळाक तेका म्हटल्यान, "अच्छा तू आसस, संकट निर्माण करणारो!" एलियान उत्तर दिल्यान, " संकट निर्माण करणारो तर तू आसस! तू यहोवाक सोडून दिलस. तोच खरो परमेश्वर आसा, पण तू बआलाची पूजा करतस. आता तुका इस्राएल राज्याच्या सगळ्या लोकांका कर्मेल पर्वतार घेवन येवचा हा."

19. भविष्यवक्ते — चित्र 6

शेवटाक सगळे लॉक कर्मेल पर्वतार गेले. तेव बापये इले जे म्हणा व्हते की, ते बआलाचे संदेश सांगतत. हे बआलाचे भविष्यवक्ते व्हते. ते ४५० व्हते. एलियान लोकांका सांगल्यान, "कधीपर्यात तुम्ही आपल्या मनांका फिरवतलास? जर यहोवा परमेश्वर आसा तर तेची आराधना करा! जर बआल परमेश्वर आसात तर तेची पूजा करा!"

19. भविष्यवक्ते — चित्र 7

तेळाक एलियान बआलाच्या भविष्यवक्त्यांका म्हटल्यान, "येका बैलाक बलि करून तेचा मास बलिदान करूक येका वेदीर ठेवा, पण आग लाव नको. मगे मीव तसाच करतलय नी येका येगळ्या वेदीर मीया ता मास ठेवतलय. तेळाक जर परमेश्वरान वेदीर आग पाडल्यान तर समाजान जावा की तोच खरो परमेश्वर आसा." तेळाक बआलाच्या भविष्यवक्त्यांनी येक बलि तयार केल्यानी पण आग लावक नाय.

19. भविष्यवक्ते — चित्र 8

तेळाक बआलाच्या भविष्यवक्त्यांनी बआलाक प्रार्थना केल्यान की, हे बआला, आमचा आयक!" पुरो दिवस तेंनी प्रार्थना केल्यानी, वराडले नी स्वतःच्या आंगार चाकून वारव करून घितल्यानी, पण बआलान उत्तर देवक नाय नी कसलीच आग नाय पाडुक.

19. भविष्यवक्ते — चित्र 9

बआलाच्या भविष्यवक्त्यांनी बआलाक प्रार्थना करण्यात जवळजवळ दिवस घालयल्यानी. शेवटाक तेंनी प्रार्थना करूचा बंद केल्यानी. तेळाक एलियान दुसऱ्या बैलाचा मास परमेश्वराच्या वेदीर ठेयल्यान. मगे तेना लॉकांका पाणयाची मोठी भांडी त्या बलिदानार वतुक लायल्यान जोवर ता मास, लाकडा नी वेदीच्या आजूबाजूची जमीन वली नाय झाली.

19. भविष्यवक्ते — चित्र 10

तेळाक एलियान प्रार्थना केल्यान की, "हे यहोवा, अब्राहाम, इसहाक नी याकोबाच्या देवा, आमका दाखव की तूच इस्राएलाचो परमेश्वर आसस नी मीया तुझो दास आसय. माका उत्तर दे म्हणजे हे लॉक समाजतीत की तूच खरो परमेश्वर आसस.

19. भविष्यवक्ते — चित्र 11

लगेचच आकाशातना आग पडली नी तेना मास, लाकडा, खडका, माती नी वेदीच्या आजूबाजूचा सगळा पाणीव जाळून टाकल्यान. जेळाक लॉकांनी ह्या बघल्यानी, तेळाक ते जमनीर पडले नी बोलले, "यहोवाच परमेश्वर आसा."

19. भविष्यवक्ते — चित्र 12

तेळाक एलियान म्हटल्यान, "बआलाचो येकव भविष्यवकतो सुटान जाता नये!" म्हणान लॉकांनी बआलाच्या भविष्यवक्त्यांका पकडल्यानी नी तेंका थयना येगळे घेवन गेले नी मारून टाकल्यानी.

19. भविष्यवक्ते — चित्र 13

तेळाक एलियान अहाब राजाक म्हटल्यान, "लवकर आपल्या घराक पळान जा, कारण पावस पडणार हा." लवकरच ढग दाटून इले नी जोरात पावसाक सुरवात झाली. यहोवा त्या दुष्काळाक संपयत व्हतो. हेना प्रकट झाला की यहोवाच खरो परमेश्वर आसा.

19. भविष्यवक्ते — चित्र 14

जेळाक एलियान आपला काम संपवल्यान, तेळाक परमेश्वरान अलिशा नावाचो बापयो आपलो भविष्यवकतो होवक निवडल्यान. परमेश्वरान अलिशाकडना मॉपशे चमत्कार केल्यान. येक चमत्कार नामानाबरोबर झालो. तो येक दुश्मनाच्या सेनेचो सरदार व्हतो, पण तेका येक त्वचेचो वायट रोग झाललो. नामानान अलिशाबाबतीत आयकलल्यान, म्हणान तो अलिशाकडे इलो नी तेका तेना बरा करूची इनंती केल्यान. अलिशान नामानाक म्हटल्यान की, जावन यार्देन नदीच्या पाणयात सात येळा डुबकी लगाव.

19. भविष्यवक्ते — चित्र 15

नामान रागावलो. तेना तसा करुचो नकार दिल्यान, कारण ता तेका मूर्खपणाचा काम वाटा व्हता. पण मगे तेना आपला मन बदलल्यान नी जावन यार्देन नदीच्या पाणयात सात येळा डुबकी लावल्यान. जेळाक शेवटाक तो पाणयातना भायर पडलो तेळाक परमेश्वरान तेका बरो केल्यान.

19. भविष्यवक्ते — चित्र 16

परमेश्वरान इस्राएली लॉकांकडे इतर मॉपशे भविष्यवक्ते पाठयल्यान. त्या सगळ्यांनी लॉकांका मूर्तेची पूजा करूचा बंद करूक सांगल्यानी. त्याशिवाय, तेंनी येकदुसऱ्याबरोबर न्यायान व्यवहार करायचो नी एकदुसऱ्यार दया करायची. त्या भविष्यवक्त्यांनी लॉकांका बजावल्यानी की तेनी वायट कामा बंद करायची नी ता सोडून परमेश्वरान सांगलल्या गोष्टींचा पालन करायचा. जर त्या लॉकांनी तसा नाय केल्यानी तर परमेश्वर तेंका दोषी ठरवन तेंचो न्याय करतलो नी तेंका शिक्षा करतलो.

19. भविष्यवक्ते — चित्र 17

जास्तसो येळ, त्या लॉकांनी परमेश्वराचा आज्ञापालन करूक नाय. कायम तेंनी भविष्यवक्त्यांबरोबर वायट व्यवहार केल्यानी नी कधीकधी तर तेंका ठार मारल्यानी. येकदा तेनी यिर्मया भविष्यवक्त्याक सुक्या बावडेत टाकून दिल्यानी नी तेका थय मरासाठी सोडून दिल्यानी. तो बावडेच्या तळाक चिखलात रुपलो. पण तेळाक राजाक तेच्यार दया इली नी तेना आपल्या सैनिकांका आदेश दिल्यान की यिर्मया मराच्या आधी तेका बावडेतना भायर काढा.

19. भविष्यवक्ते — चित्र 18

भविष्यवक्त्यांनी परमेश्वराच्या वतीन बोलाचा चालू ठेयलल्यानी, जरी लॉकांनी तेचो द्वेष केल्यानी. तेनी लॉकांका बजावल्यानी की तेनी जर पश्चात्ताप करूक नाय तर परमेश्वर तेंचो नाश करतलो. तेनी लॉकांका ह्याव आठवण करून दिल्यानी की परमेश्वरान तेंच्याकडे मसीहा पाठवची प्रतिज्ञा केल्यान हा.

बायबलातली गोष्ट : 1 राजे अध्याय 16-18; 2 राजे 5; यिर्मया 38

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।