20. बंदिवास नी परातना
इस्राएलचा राज्य नी यहुद्यांचा राज्य दोघांनीव परमेश्वराइरुद्ध पाप केल्यानी. तेंनी ता वचन तोडल्यानी जा परमेश्वरान तेंच्याबरोबर सिनाय पर्वतार बांधलल्यान. परमेश्वरान पश्चात्ताप करूक नी परत तेची आराधना करूक बजावूक आपले भविष्यवक्ते पाठयल्यान, पण तेंनी तेंचाव सांगलला आयकाक नकार दिल्यानी.
अशाप्रकारान परमेश्वरान तेंच्या दुश्मनांका तेंचो नाश करूक सक्षम करून दोनव राज्यांका शिक्षा दिल्यान. अश्शूर म्हणान येक दुसरो देश व्हतो जो लय शक्तिशाली झाललो. ते दुसऱ्या देशांबरोबर लय निर्दयपणान वागत. तेंनी येवन इस्राएलचा राज्य नाश करून टाकल्यानी. अश्शूरच्या लॉकांनी येवन इस्राएलच्या राज्यात जास्तश्या लॉकांका मारून टाकल्यानी, जेका वाटला तेका लुटल्यानी नी देशाचे काय भाग जाळून टाकल्यानी.
अशशूरच्या लॉकांनी सगळ्या पुढाऱ्यांका, धनवानांका नी अश्या लॉकांका जे मौल्यवान वस्तू बनव शकत व्हते तेंका येकत्र केल्यानी नी ते अश्शूर देशाक घेवन गेले. इस्राएलात फक्त काय गरीब लॉकच उरले.
मगे अश्शूरचे लॉक त्या देशात ऱ्हवाक विदेशी लोक घेवन इले. त्या विदेशी लॉकांनी त्या नगरांका परत बांधल्यानी. जे इस्राएली थय वाचलले तेंच्याबरोबर तेंनी लगना केल्यानी. त्या लॉकांचे अवलादी शोमरोनी म्हणान ओळखले जावक लागले.
यहुदा राज्याच्या लॉकांनी बघल्यानी की कसो परमेश्वरान तेच्यार इश्वास न ठेयणाऱ्या नी तेची वचना न पाळणाऱ्या इस्राएली राज्यातल्या लॉकांका शिक्षा दिलल्यान. पण तरीव तेंनी कनान्यांच्या देवांचे मूर्तेची पूजा केल्यानी. परमेश्वरान तेंका बजावक भविष्यवक्ते पाठयल्यान, पण तेंनी आयकाक नकार दिल्यानी.
जवळजवळ १०० वर्सांनंतर अश्शुरी लॉकांनी इस्राएलच्या राज्याचो नाश केल्यानी. परमेश्वरान बाबेलचो राजा, नबुखदनेस्सराक यहुद्यांच्या राज्यार हमलो करूक पाठयल्यान. बाबेल येक शक्तिशाली देश व्हतो. यहुद्यांचो राजा नबूकदनेस्सरचो दास होवक नी दर वर्साक तेका मॉपसा धन देवक तयार झालो.
पण काय वर्सानंतर, यहूद्यांच्या राजान बाबेलइरुद्ध बंड केल्यान. शेवटाक बाबेलच्या लॉकांनी परत येवन यहूद्यांच्या राज्यार हमलो केल्यानी. तेंनी यरुशलेम नगरार कब्जो मिळवल्यानी, मंदिराक नष्ट करून टाकल्यानी नी नगर नी मंदिराचो खजानो लुटून घेवन गेले.
बंड केल्यामुळा यहूद्यांच्या राजाक शिक्षा देवक म्हणान नबूखदनेस्सराच्या सैनिकांनी राजाचो झिल तेच्याच समोर मारून टाकल्यानी नी मगे तेका आंधळो करून टाकल्यानी. हेच्यानंतर, ते राजाक घेवन गेले म्हणजे तो बाबेलच्या तुरुंगात मरान जायत.
नबूखदनेस्सर नी तेची सेना यहूद्यांच्या राज्याचे जवळपास सगळेच लॉक बाबेलाक घेवन गेले, फक्त अति गरीब लॉकांकाच पाठी सोडून गेले म्हणजे ते शेतात धान्य उगवतीत. ह्या काळाक बंदिवास म्हटला गेला जेच्यात परमेश्वराच्या लॉकांका वचनदत्त देशातना पाडाव करून न्हेण्यात इला.
जरी परमेश्वरान आपल्या लॉकांका तेंच्या पापांमुळाक बंदिवासात पाठवन शिक्षा दिल्यान, तरीव तो तेंका नी आपल्या वचनाक इसारलो नाय व्हतो. परमेश्वरान आपल्या लॉकांचा संरक्षण करूचा सुरूच ठेयल्यान नी आपल्या भविष्यवक्त्यांकडना तो तेंच्याबरोबर बोलत ऱ्हवा. तेना वचन दिल्यान की सत्तर वर्सांनंतर ते परत वचनदत्त देशात जातले.
जवळपास सत्तर वर्सांनंतर, पारसाचो राजा कुस्रून बाबेलाक हरवल्यान, म्हणान बाबेलचा राज्य सोडून पारसाच्या साम्राज्यान मॉप देशांर राज्य केल्यान. इस्राएली लॉक आता यहुदी म्हणान वळाखले जायत. तेंच्यातल्या मॉप जणांनी आपला सगळा आयुष्य बाबेलात घालयलल्यानी. फक्त काय म्हाताऱ्या यहुद्यांकाच यहुदी देश लक्षात व्हतो.
पारशी लॉक लय शक्तिमान व्हते, पण तेंनी आपल्या आयुष्यात लॉकांच्यार दया केलल्यानी. पारशी लॉकांचो राजा झाल्यार काय येळान कुस्रून येक हुकूम केल्यान की कोणव यहुदी जो यहुदी देशाक परत जावक बघी व्हतो, तो पारसातना निघान परत यहुदी देशाक जाव शकता. ह्यापर्यात की तेना तेंका मंदिर परत बनवक धनव दिल्यान. अशाप्रकारान बंदिवासाच्या सत्तर वर्सांनंतर, यहुद्यांचो येक बारको घोळको यहुदी देशात यरुशलेम नगरात परत इलो.
जेळाक ते लॉक यरुशलेमेत पोचले तेळाक मंदिर नी नगराच्या चारव बाजूचे भिंती दुरुस्त केल्यानी. पारसी लॉक आजूनव तेंच्यार राज्य करायचे, पण परत येकदा ते वचनदत्त देशात ऱ्हवत व्हते नी मंदिरात आराधना करायचे.
बायबलातली गोष्ट : 2 राजे अध्याय 17; 24-25; 2 इतिहास 36; एज़्रा 1-10; नहेम्या 1-13
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।