23. येशूचो जन्म
योसेफ नावाच्या येका धार्मिक व्यक्तीबरोबर मरियाचो साखरपुडो झाललो. जेळाक तेना आयकल्यान की मरिया गरोदर आसा तेळाक तो समजान गेलो की तो तेचो झिल नाया. पण मरियाक बदनाम करूची तेची इच्छा नाय व्हती, म्हणान तेना तिच्यार कृपा करूची नी तिका गपचूप सोडचिठ्ठी देवचा ठरयल्यान. पण हेच्या आधी तो असा करीत, येक देवदूत तेच्या स्वप्नात येवन तेच्याबरोबर बोललो.
त्या देवदूतान सांगल्यान, "अरे योसेफा, मरियाक आपली बायल म्हणान स्विकारूक घाबरा नको. तेच्या पोटात जो पोरगो हा तो पवित्र आत्म्याकडना हा. ता येका झिलाक जन्म देतला. तेचा नाव येशू ठेव (जेचो अर्थ - यहोवा वाचवनारो हा), कारण तो लॉकांका तेंच्या पापांपासना वाचवतलो.
अशा रितीन योसेफान मरियेबरोबर लगीन केल्यान नी तेका आपली बायल म्हणान घराक घेवन इलो, पण तेच्या पोराक जन्म देयपर्यात तो तेच्याबरोबर झोपाक नाय.
जेळाक मरियान येशूक जन्म देवचो येळ जवळ इलो, तेळाक तिना नी योसेफान बेथलेहेमाक जावचो येक लांबचो प्रवास केल्यानी. तेंका थय जावचाच व्हता कारण रोमी अधिकारी इस्राएलात ऱ्हवणाऱ्या सगळ्या लॉकांची गणती करूचा ठरय व्हते. ते म्हणत व्हते सगळ्या लॉकांनी थय जायचा जय तेंचे पूर्वज ऱ्हवत व्हते. दाविद राजाचो जन्म बेथलेहेमात झाललो नी तो मरिया नी योसेफाचो पूर्वज व्हतो.
मरिया नी योसेफ बेथलेहेमात गेले, पण थय ढोरांका बांधूची जागा सोडून तेंका थांबाक खयचीच जागा मिळाक नाय. तीच जागा व्हती जय मरियान आपल्या पोराक जन्म दिल्यान. तिना तेका गवानेत झोपयल्यान कारण थय तेच्यासाठी कसलाच अंथरून नाय व्हता. तेंनी तेचा नाव येशू ठेवल्यानी.
त्या रात्री, थय जवळच्या शेतात काय राखणे आपल्या मेंढरांची राखण करीत व्हते. अचानक येक चमकनारो देवदूत तेंच्यार प्रकट झालो नी ते घाबारले. त्या देवदूतान सांगल्यान, "भिया नको, कारण माझ्याकडे तुमका देवक चांगलो संदेश हा. बेथलेहेमात मसीहाचो, प्रभूचो जन्म झालो हा!"
"जावन त्या बाळाक शोधा म्हणजे तुम्ही तेका कपड्यात लपेटललो नी गवानेत झोपललो बघशात." अचानक आकाश देवदूतांनी भरान गेला. ते परमेश्वराची स्तुति करी व्हते. तेंनी म्हटल्यानी, "सगळी महिमा स्वर्गात विराजमान आसलल्या परमेश्वराक मिळादे. पृथ्वीरल्या लॉकांतूर शांति येवदे, जेंची तो काळजी करता!"
तेळाक देवदूत निघान गेले. ते राखनेव आपली मेंढरा सोडून बाळाक बघुक गेले. लगेच ते त्या जागेर पोचले जय येशू व्हतो नी तेनी तेका गवानेत झोपललो बघल्यानी, जसो की त्या देवदूतान सांगलल्यान. ते लय उत्साहित झाले. मगे ते राखणे परत थय इले जय तेंची मेंढरा व्हती. तेंनी जा काय आयल्यानी नी बघल्यानी त्यामुळाक ते परमेश्वराची स्तुति करीत व्हते.
पूर्वेक लांब येका देशात काय बापये व्हते. ते ताऱ्यांचो अभ्यास केलले नी लय बुद्धिमानव व्हते. तेंनी येका असामान्य ताऱ्याक आकाशात बघल्यानी. तेंनी म्हटल्यानी की हेचो अर्थ असो हा की, यहुद्यांच्या येका नइन राजाचो जन्म झालो हा. म्हणान तेंनी त्या बाळाक बघुक जावक त्या देशात प्रवास करुचो निर्णय घेतल्यानी. येका मोठ्या प्रवासानंतर, ते बेथलेहेमात इले नी त्या घराक बघल्यानी जेच्यात येशू नी तेचे आवस-बापुस थांबलले.
जेळाक त्या बापयांनी येशूक आपल्या आवशीबरोबर बघल्यानी तेळाक तेंनी गुडघे टेकून तेची आराधना केल्यानी. तेंनी येशूक मौल्यवान भेट दिल्यानी. मगे ते परत घराक जावक गेले.
बायबलातली गोष्ट : मत्तय अध्याय 1; लूक 2
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।