25. येशूची सैतानाकडना परीक्षा
बाप्तिस्म्यानंतर लगेच पवित्र आत्म्यान येशूक जंगलात न्हील्यान. थय येशू चाळीस दिवस नी चाळीस रात्री उपास करता. तेळाक सैतानान थय जावन येशूची परीक्षा बघल्यान.
सैतानान येशूक मोहात पाडल्यान, "जर तू खरोखर देवाचो झिल आसशीत, तर ह्या दगडाक भाकरी होवची आज्ञा कर म्हणजे तुका जेवान मिळात!"
येशून उत्तर दिल्यान, "देवाच्या वचनात असा लिवलला हा की, 'लॉकांका जगाक फक्त भाकरीची गरज नाया, तर परमेश्वराच्या तोंडातना निघनाऱ्या प्रत्येक वचनाची गरज हा!"
मगे सैतानान येशूक घेवन देवळाच्या टोकार उभो केल्यान नी तेका म्हटल्यान, "तू देवाचो झिल आसस तर खाली उडी टाक, कारण असा लिवलला हा की, "देव आपल्या दूतांका तुझ्याविषय आज्ञा करीत नी तुझो पाय धोंड्यार आपाटता नये म्हणान तो तुका हातार झेलून धरतीत."
पण येशून सैतानाक नियमशास्त्रातना उत्तर दिल्यान. तो म्हणालो, "देव आपल्या वचनातना आपल्या लॉकांका आज्ञा देता, 'तू आपलो देव परमेश्वर हेची परीक्षा बघू नको'."
मगे सैतानान येशूक जगातली सगळी राज्या नी वैभव दाखयल्यान नी म्हटल्यान, "जर तुया पाया पडान माका नमन करशीत तर मीया ह्या सगळा तुका देयन."
येशून म्हटल्यान, "अरे सैताना, चलतो हो! देव आपल्या वचनात आपल्या लॉकांका आज्ञा करता, परमेश्वर तुझो देव हेका नमन कर नी फक्त तेचीच उपासना कर!"
ह्याप्रकारान येशू सैतानाच्या मोहाक बळी पडाक नाय, म्हणान सैतान तेका सोडून थयना निघान गेलो. मगे देवदूतांनी येवन येशूची सेवा केल्यानी.
बायबलातली गोष्ट : मत्तय 4:1 - 11; मार्क 1 : 12 -13 1; लूक 4 : 1-13
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।