26. येशू आपली सेवा सुरू करता
सैतानाचे परीक्षा नाकारून झाल्यार, येशू परत गालीलात इलो. ही तीच जागा हा जय तो ऱ्हवायचो. पवित्र आत्मा तेका लय सामर्थ्य देयत व्हतो नी येशू येका जागेरना दुसऱ्या जागेर जाय नी लॉकांका शिक्षणव देय. सगळ्यांनी तेच्याविषय चांगले गोष्टी बोलल्यानी.
येशू नासरेथ नगरात गेलो. ह्यो तोच गाव आसा जय तो बालपणापासना ऱ्हवत व्हतो. शब्बाथाच्या दिवशी, तो आराधना करूच्या जागेर गेलो. पुढाऱ्यांनी तेका यशया संदेष्ट्याचा याक पुस्तक दिल्यानी. तेंची इच्छा व्हती की तेना तेच्यातला वाचायचा. म्हणान येशून ता पुस्तक उघडून तेच्यातलो येक शास्त्रभाग लोकांसाठी वाचल्यान.
येशून वाचल्यान, "परमेश्वरान माका आपलो आत्मो दिल्यान हा म्हणजे मीया दीनांका सुवार्ता प्रचार करू शकान. तेना माका ह्यामुळाक पाठयल्यान हा की बंदीवानांका मोकळो करू शकान, आंधळ्यांका परत नजर देव शकान नी जेंका ठेचला जाता तेंका सोडून पाठयन. ही तीच येळ आसा जेळाक परमेश्वर आमच्यार कृपा करतलो नी आमची मदत करतलो."
मगे येशू खाली बसलो. सगळे लॉक तेका घोरान बघी व्हते.ते जाणून व्हते की, पवित्रशास्त्रातलो जो भाग तेना वाचल्यान तो मसीहाविषय व्हतो. येशून म्हटल्यान, "जे गोष्टी मीया तुमच्यासाठी वाचलय, ते गोष्टी तुम्ही आयकत आसतना आता पुरे व्हतत." सगळे लॉक चकित झालले. तेंनी म्हटल्यानी, "ह्यो योसेफाचो झिल हा ना?"
तेळाक येशून म्हटल्यान, "ह्या खरा हा की लॉका कधी असल्या संदेष्ट्याक कधीच स्वीकारीत नाय जो तेंच्या नगरात लहानाचो मोठो झालो आसात. एलिया संदेष्ट्याच्या येळेक इस्राएलात मॉपशे विधवा व्हते. पण जेळाक साडेतीन वर्सांपर्यात पावस पडाक नाय तेळाक परमेश्वरान एलियाक इस्राएलात खयच्याच विधवेच्या घराक नाय पाठयल्यान. तर तेना एलियाक येका दुसऱ्या देशातल्या विधवेकडे पाठयल्यान.
येशून सांगूचा चालू ठेयल्यान, "नी अलिशा संदेष्ट्याच्या वेळेक इस्राएलात मॉपशे लॉक त्वचेच्या रोगान पीडलले. पण अलिशान तेंच्यापैकी कोणाकच आजारातना बरो करूक नाय. तेना फक्त इस्राएलच्या दुश्मनाचो सेनापती नामानाक बरो केल्यान." पण जे लॉक येशूक आयकत व्हते ते यहुदी व्हते. म्हणान जेळाक तेंनी तेका ह्या बोलताना आयकल्यानी तेळाक ते तेच्यार रागावले.
नासरेथाच्या लॉकांनी येशूक पकडल्यानी नी तेका आराधानेच्या जागेरना वढीत भायर घेवन गेले. ते तेका मारून टाकूक खाली फेकून देवक येका खडकाच्या टोकार घेवन गेले. पण येशू गर्दीतना सटाकलो नी नासरेथ नगराक सोडून निघान गेलो.
मगे येशू सगळ्या गालीलाच्या भागात गेलो नी लॉकांची मोठी गर्दी तेच्याकडे जमली. ते मॉपशे लॉक घेवन इले जे आजारी नी अपंग व्हते. तेच्यातले काय जण बघूक, चलाक, आयकाक नाय येणारे व्हते नी येशून तेंका बरो केल्यान.
ह्याशिवाय, मोपशे लॉक येशुकडे आणण्यात इले जेंच्यात दुष्टात्मे व्हते. येशून दुष्टात्म्यांका तेंच्यातना निघान जावक धमकावल्यान. ते दुष्टात्मे नुसते वरडत, "तू परमेश्वराचो झिल आसस!" गर्दीतले लॉक आश्चर्य करीत नी तेंनी परमेश्वराची स्तुति केल्यानी.
मगे येशून बारा बापयांका निवडल्यान जेंका तेना आपले प्रेषित म्हटल्यान. त्या प्रेषितांनी तेच्याबरोबर प्रवास केल्यानी नी तेच्याकडना शिकवण घेतल्यानी.
बायबलातली गोष्ट : मत्तय अध्याय 4:12-25; मार्क 1:14-15, 35-39; 3:13-21; लूक 4:14-30, 38-44
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।