27. चांगल्या शोमरोन्याची गोष्ट
येके दिवशी, यहुदी धर्मशास्त्रात पारंगत आसललो येक माणूस येशूची परीक्षा घेवक येवन म्हणाक लागलो, "गुरुजी सार्वकालिक जीवन मिळवक मीया काय करू?" येशून उत्तर दिल्यान, "परमेश्वराच्या नियमशास्त्रात काय लिवलला हा?"
तेना म्हटल्यान, "तू आपलो देव परमेश्वर हेच्यार संपूर्ण मनान, संपूर्ण जीवान नी संपूर्ण शक्तीन प्रीती कर. नी जशी आपल्यार तशी शेजाऱ्यार प्रीती कर!" येशून म्हटल्यान, "अगदी बरोबर उत्तर दिलस! ह्या कर म्हणजे तू कायमचो जगशीत."
पण धर्मशास्त्रात पारंगत असल्या कारणान तो स्वतःक धार्मिक ठरवूक बघी व्हतो म्हणान तेना इचारल्यान, "माझो शेजारी कोण हा?"
येशून येक गोष्ट सांगून त्या धर्मशास्त्र पंडिताक उत्तर दिल्यान, "येक यहुदी माणूस यरुशलेमेतना यरीहो नगराक रस्त्यान जाय व्हतो."
"तो माणूस रस्त्यान जायत असताना, चोरांनी तेच्यार हल्लो केल्यानी. तेंनी तेच्याकडे आसलली सगळी मालमत्ता घेवन तेका मारल्यानी नी अर्धमेल्या अवस्थेत सोडून थयना निघान गेले."
"तेच्यानंतर लगेच, येक यहुदी याजक त्याच रस्त्यान खाली चलत इलो. जेळाक ह्या धार्मिक पुढाऱ्यान बघल्यान की ह्या माणूसाक चोरांनी लुटल्यानी हा, नी तो अर्धमेल्या अवस्थेत हा, तेळाक तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजून गेलो. तेना मदतीची गरज आसलल्या माणसाकडे दुर्लक्ष केल्यान नी पुढे निघान गेलो."
"तेच्यानंतर थोड्याच येळेत, येक लेवी तेळाक त्या रस्त्यान इलो.(लेवी ह्या यहुदी लॉकांचा याक कुळ आसा जा मंदिराच्या सेवेत याजकांची मदत करीत.) लेवीनव त्या माणसाक, जेका चोरांनी लुटलल्यानी, मारलल्यानी तेच्याकडे दुर्लक्ष केल्यान नी दुसऱ्या वाटेन निघान गेलो."
"तेच्यामागना येनारो तिसरो माणूस येक शोमरोनी व्हतो (शोमरोनी हे यहुदी वंशातले परराष्ट्रीयांशी लगीन केलले लॉक व्हते. शोमरोनी नी यहुदी येकमेकांचो द्वेष करीत). पण ह्या शोमरोन्यान त्या यहुदी माणसाक बघल्यान, तेळाक तेका तेची दया इली. मगे तेना तेची काळजी घेतल्यान नी तेच्या जखमेर पट्टी बांधल्यान."
"मगे त्या शोमरोन्यान त्या मानसाक उचलून आपल्या गाढवार बसवल्यान नी तेना तेका वाटेत असलल्या यका उतारशाळेत आणल्यान नी तेची काळजी घेतल्यान."
"दुसऱ्या दिवशी, शोमरोन्याक पुढच्या प्रवासाक जावचा व्हता, म्हणान तेना उतारशाळेच्या रक्षकाक काय पैशे देवन म्हटल्यान, 'हेची काळजी घी नी हेच्यापेक्षा जो काय आजून खर्च लागात तो मीया परत इल्यार तुका देयन'."
तेळाक येशून त्या धर्मशास्त्रातल्या पंडिताक इचारल्यान, "तुका काय वाटता? त्या तिघांपैकी त्या लुटून मारलल्या अवस्थेत असलल्या माणसाचो शेजारी कोण झालो?" तेना उत्तर दिल्यान, "जेना तेच्यार दया दाखयल्यान तो." येशून तेका म्हटल्यान, "तूव जावन तसाच कर."
बायबलातली गोष्ट : लूक 10 : 25 - 37
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।